Food - Kitchen Affairs - २. शिरा

गणेशा's picture
गणेशा in पाककृती
30 Aug 2020 - 3:58 pm

उशिरा का होईना, आमचा किचन मध्ये एकदाचा प्रवेश झाला. लग्नानंतर बायकोला, मी आधी स्वयपाक करत होतो असे सांगण्याची risk घेतली होती खरी, पण १-२ दा चहाच (ऑफकोर्स ती करते त्या पेक्षा भारीच) काय तो मी तिला करुन दिला बाकी किचन मध्ये मी शक्यतो कधी लुडबुडलो नाहीच.
तशी बायकांपेक्षा पुरुषांच्या हाताला चव जास्त असते, असे माझे ठाम मत आहे.
असे का ? हे मी माझाच विचार करत असताना लक्षात आले की, पुरुष हे कुठलीही गोष्ट करताना त्यातल्या वस्तु /जिन्नस मनसोक्त टाकतात, त्यात कंजूस पणा नसतो.. शिवाय त्यांचे लक्ष कदाचीत सासु सुनेच्या टीव्ही सिरिअल कडे नसते हे कारण पण असु शकते. शिवाय आज तू हे बनवले होते का? मग मी बघ आता काय/कसे बनवून फोटो देते ते.. असला जळका पणा पण त्यांच्याकडे नसतो.

शिरा हा गोड पदार्थ.. बर्याच जनांना गोड पदार्थ जास्त आवडत नाहीत, मला मात्र अती गोड आणि अती तिखट असे दोन्ही टोकाचे पदार्थ आवडतात. सपक ह्या गोष्टीला स्थान नाहीच. गोड पदार्थांमध्ये आमरस, पुरण पोळ्या, आम्रखंड, श्रीखंड, मोदक, शिरा असे गोड पदार्थ मी खुपच आवडीने खातो.

तस बघितलं तर शिरा लहानपणी मी जास्त खात नव्हतो. कदाचीत पांढरा आणि सुक्का सुक्का शिरा निट लागत नाही आणि मला तसला शिरा आवडत नव्हता...
नंतर अचानक मात्र मला शिरा जास्त आवडु लागला, कारण मला कळाले की, लालसर तांबुस भाजलेला शिरा , घरचे तुप , आणि एकसंध शिरा म्हणजे जन्नत.. त्या नंतर शिरा मला खुप आवडतो, आजतगायत.. म्हणुन आज मग शिरा करु म्हंटले.

चला तर आपण आता शिरा करण्याचे साहित्य पाहु (३ माणसांसाठी) :

१. घरचे साजुक तुप ( मोठे ५-७ चमचे)
२. बारीक रवा (२ वाट्या)
३. एक कप दुध
४. १ १/२ कप पाणी
५. जास्त मोठे ५ चमचे साखर
६. १ किंवा २ टीस्पून वेलची पुड.

कृती :

आता किचन मध्ये गेलो तर किचन च्या कपाटाचा एक कप्पा उघडुन कोठे काय काय आहे हे ऐकुण घेतले . हो, घरात ऐकुनच घ्यायचे असते, जरी आपल्या देशात पंतप्रधान इतर दुसर्‍या मंत्र्यांपेक्षा मोठा असला , तरी घरात गृहमंत्री हेच सर्वोच्च पद असते. आणि गृहमंत्री हाच आमचा पंतप्रधान आणि हाच आमचा फायनान्स मिनिस्टर असेच म्हणावे लागते. तुम्ही घरात कितीही मिरवले तरी गृहमंत्री म्हणेल तीच पुर्व दिशा.. हे ज्याला समजले तोच घर निट चालवु शकतो, तुम्ही याला Act of God पण म्हणु शकता.
हा तर ह्या फोटो मध्ये दिसतात, त्या कप्प्यातून रवा कुठे आहे, साखर कश्यात आहे, तुप कुठे ठेवले आहे, आणि इतर सगळे ऐकुन घेतले.

नवख्या माणसाने काही करायचे असल्यास लागणार्‍या वस्तु सरळ किचन वट्यावरती पुढे घ्याव्यात आणि जस जसे वापरल्या तसे होते तिथे ती वस्तु ठेवुन द्यावी. माझी हीच पद्धत आहे, त्यामुळे मी बनवलेल्या पदार्थात कुठली वस्तु टाकायची राहिली असे होत नाही..
गृहमंत्री कायम कपाटातील भरण्याची जागा बदलुन आपली परिक्षा पाहत असतात, पण हरकत नाही.. कधी कधी तर आपणा काही करायला गेले की साखर संपलेली असते, चहा करायचा असल्यास चहापत्तीच संपलली असते. तरी आपण डोके शांत ठेवायचे. गृहमंत्र्यांना आपण उलट बोलायचे नाही.

चला आपण कृती कडे वळु यात असा बोलण्याचा टाईमपास होत राहिला तर शिरा करण्यास खुप उशिर होईल.
हा तर गॅस बारीक करुन नॉनस्टिक कडई त्यावर ठेवा. आणी त्यात घरचे साजुक तुप मोठे ३-४ चमचे टाका.


म्हशीच्या दुधा पासुन घरीच बनवलेले मस्त साजुक तुप.

नंतर तुपा मध्ये २ वाटी बारीक रवा टाका.

बारीक रवा ह्या साठी की, शिरा एकसंध झाल्याने खायला छान वाटतो. तुम्हाला मोठा रवा टाकायचा असल्यास तो ही टाकु शकता.

रव्याला असे १२-१५ मिनिटे चांगले भाजुन घ्या. तो लालसर दिसला पाहिजे.. घरात सुंदर सुवास सुटलेला असतो.


आमच्या घरातील उत्साही मेंबर, पप्पांचे शेपुट, साखरेचा तुकडा लगेच हे काम करायला आलाच.

त्याच वेळेस बाजुला दुध आणि पाणी गरम करायला ठेवा..

१०-१२ मिनिटां नंतर , १ मोठा चमचा साजुक तुप,  मोठे ५ चमचे साखर आणि नंतर उकळलेले १ कप दुध मिक्स करा..
आणि पुन्हा थोडा वेळ हलवत रहा..


लालसर तांबुस भाजलेला रवा.


साखर ४-५ चमचे.


गरम दुध १ कप

त्या नंतर पुन्हा २ चमचे साजुक तुप टाकुन शिरा हलवत रहा, असे मध्ये मध्ये तुप टाकत गेल्याने शिरा खुप्पच भारी लागतो..आणि नंतर १ १/२ कप उकळलेले पाणी आणि १-२ टीस्पून वेलची पुड त्यामध्ये टाका.
आणी १-२ मिनिटे हलवल्यानंतर सुंदर लालसर सुगंधी शिरा तुमचा बनत आला आहे हे दिसते.
त्यावर वाफेसाठी असे झाकण ५ -७ मिनिटे ठेवून द्या.


उकळलेले पाणी, अंदाजे १ १/२ कप.


वेलची पुड.


तयार होत आलेला शिरा.


वाफेवर असा तो ७-८ मिनिटे ठेवून द्या.

नंतर शिरा गॅस वरुन खाली घेवून , ताटात घेण्यासाठी तयार.

माझी मुलगी,  जास्त गोड आणि त्यातल्या त्यात शिरा खात नाही, पण यावेळेस शिरा इतका मस्त झाला आहे असे म्हणुन तिने ही खाल्ला..

- गणेशा

प्रतिक्रिया

बेकार तरुण's picture

30 Aug 2020 - 4:03 pm | बेकार तरुण

कमाल....
मस्त आहे शिरा... तोंपासु !!

मस्तच झालाय शिरा..मुलीला आवडला आहे मग छानच!
गुळाचा शिरा पाहा करून ..लोह घटकासाठी .

-एक वाटी रवा
-एक वाटी गूळ
-बाकी सर्व प्रक्रिया तीच आहे फक्त दुधा+साखर ऐवजी गूळ वापरायचा
-२ वाटी पाणी उकळावे त्यात गूळ टाकावा विरघळला की गाळून रव्यात टाकावा.
-बदाम आदल्या दिवशी भिजवून शिरा करायच्या वेळेस मिक्सरमधून ओबड धोबड फिरवून शिर्यात घालावा.

बाकी शिरा अप्रतिम दिसतोय गणेशा.

शा वि कु's picture

30 Aug 2020 - 7:29 pm | शा वि कु

एकदम खमंग भाजलाय.

बायकांपेक्षा पुरुषांच्या हाताला चव जास्त असते, असे माझे ठाम मत आहे.

हम्म. पुरुष जास्त करून हौशी खेळाडू असतात म्हणून असावे.

भारी झालाय. मजा येते वाचायला.
------------
हल्ली मला उडुपी, मंगलोरकडचा शिरा आवडू लागला आहे. फार गोड नसतो, तुपकटही नसतो. हाटेलात गरम पाण्यातल्या पातेल्यात असतो तो हलवून देतात. पातळ असतो. काजू आणि लवंगा असतात.

तुषार काळभोर's picture

30 Aug 2020 - 10:04 pm | तुषार काळभोर

मला गोड पदार्थ प्रचंड आवडतात. पण कमी गोड असलेले. पदार्थ जास्त गोड असला अन जास्त प्रमाणात खाल्ला तर पोटात अन डोक्यात जडपणा येतो.

रवा लालबुंद होईपर्यंत तुपात भाजून घेणे, यात शिऱ्याचा सगळा आत्मा आहे.
त्यामुळे एकतर तूप रव्याच्या आत जाते, त्यामुळे शिरा कोराडाही होत नाही अन् तेलकट / तुपकट ही होत नाही.

आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या शिऱ्याची चव एरवी केलेल्या शिऱ्याला का येत नाही काय माहिती! तो पूजेचा शिरा मी तीर्थप्रसादसारखा खाण्याऐवजी महाप्रसादसारखा खातो.
गेल्या महिन्यात बहिणीच्या घरी शिरा खाल्ला होता. अप्रतिम बनलेला. घरी येऊन कौतुक केल्यावर बायकोने आवर्जून तिला फोन करून विचारलं. तर पद्धत साधारण अशीच. फक्त त्यात केळी कुस्करून टाकली होती.

ता. क. तो जो भाजलेला रवा आहे ना त्यात जरा साखर टाकून कोरडा खायला पण मज्जा येते.

गणेशा's picture

31 Aug 2020 - 11:10 pm | गणेशा

बेकार तरुन, कंजूस काका, शाविकु , पैलवान आणि भक्ती.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

@ पैलवान आणि कंजूस काका
सत्यनारायणचा शिरा थोड्या वेगळ्या पद्धतीने करतात, मला ही तो खुप आवडतो.

हा, पातळ शिरा खुपच छान लागतो. मला ही खुप आवडतो पातळा शिरा.
आता सायकल ट्रीप दरम्यान, हुबळी ला गेलो होतो,
हॉटेल नाव लक्शात नाही, पण होटेल अनंथ चेच व्हेज हॉटेल ओम असेल कदाचीत.
वा काय शिरा होता.. लाजवाब.

कपिलमुनी's picture

1 Sep 2020 - 12:31 pm | कपिलमुनी

फोटो लोड होईपर्यंत शिरा करतो !अर्धा तास तरी लागेलच ;)

गोंधळी's picture

1 Sep 2020 - 3:16 pm | गोंधळी

फोटो लोड नाही होत आहेत.
बाकी शिरा चहामधुन खायला खुप आवडतो.

किसन शिंदे's picture

1 Sep 2020 - 8:50 pm | किसन शिंदे

कधी येऊ घरी?

श्वेता२४'s picture

2 Sep 2020 - 2:35 pm | श्वेता२४

मला आधी शिरा करायला जमायचा नाही. पण प्रसादाचा शिरा आवडत असल्याने हट्टाने शिकले. आता छान जमतो. यात तुप टाकणे व रवा भाजणे हे मुख्य काम. प्रसादाच्या शिऱ्यात मी रवा भाजत आला की केळीच्या फोडी टाकून अजून थोडा वेळ भाजते. बाकी कृती सेम.मस्त लागतो चवीला.

Prajakta२१'s picture

2 Sep 2020 - 11:25 pm | Prajakta२१

छान
केळ घातल्याने अजूनच चव खुलते
प्रसादाच्या शिऱ्यात दूध ,केळ आणि प्रसाद यामुळे फरक पडतो

प्रचेतस's picture

3 Sep 2020 - 8:54 am | प्रचेतस

गणा गणा, शिरा करत बसलास आणि मला भेटला नाहीस :)

बाकी पाकृ मस्तच. कधी येऊ तुझ्याकडे बोल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Sep 2020 - 9:40 am | ज्ञानोबाचे पैजार

साधा शिराच पण काय ते डिटेलवार वर्णन काय ते कातील फोटू वा मजा आ गया

गणपाची कमतरता आता गणेशा भरुन काढणार असे वाटते आहे

पैजारबुवा,

सरिता बांदेकर's picture

18 Dec 2020 - 7:40 pm | सरिता बांदेकर

मस्त भट्टी जमलीय शिर्याची
पाणी सूटलं तोंडाला.