आपल्याला एकादी गोष्ट अर्थपूर्ण, महत्वपूर्ण वाटत असते, पण इतराना वाटत नाही...आपल्याला स्वतःलाच त्याच गोष्टी कालान्तराने तश्या वाटेनाश्या होतात.....
तर हे अर्थपूर्ण, महत्वपूर्ण वगैरे वाटणे म्हणजे काय गौडबन्गाल आहे बुवा?
खालील वाक्ये बघा :
१. पिकासो हा विसाव्या शतकातिल महत्वाचा चित्रकार होय...
२. मी पुष्कळ पैसा कमावला, पण त्याला काही अर्थ नाही......
३. तब्येत ठणठणीत असणे महत्वाचे.....
४. बाबारे, त्या पोरीच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे, त्यापेक्षा .....
५. मला त्यावेळी त्या गोष्टीच महत्व कळल नाही, पण आता पस्तावा होतो.....
६. या पुस्तकातला ( वा सिनेमातला वगैरे ) अमूक भाग महत्वाचा अहे........
७. आपल्या आयुष्यात खरोखर महत्वाचे काय आहे, हे जाणून घेणे महत्वाचे, त्यातूनच जीवन अर्थपूर्ण करता येइल.....
८. पैसा महत्वाचा, असे मानून त्याने एवढा पैसा मिळवला, पण आता तो अन्थरुणाला खिळून आहे, मग त्या पैश्याला काय अर्थ राहिला?......
९. आपल्याला सगळीकडे महत्व मिळावे, असे त्याला वाटत असते, त्याशिवाय त्याला कशातच अर्थ वाटत नही....
.........असो.......तर यावर काय म्हणता मण्डळी?
वाचने
3880
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरोबर
हा चक्रीय प्रश्न नाही का?
अर्थपूर्ण महत्वपूर्ण वगैरे
महत्वाचे अर्थकारण
दहा वर्षांपूर्वी या धाग्यात वाचकांना ....
वाचकांचे मनोगत शोधायला निघालात आहात ...