Skip to main content

पालक मसाला डोसा

लेखक मृगतृष्णा यांनी रविवार, 23/08/2020 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
" पालक " ही पालेभाजी घरातील सर्व सदस्यांनी खावी अशी इच्छा एकंदरीत सगळ्या "पालकांची " असते , सगळ्या पालकांची म्हणजे अगदी आजी - पणजी पासून सगळे आपापल्या मुलांना सांगताना आपण ऐकतो, कारण सगळ्यांना ही पालेभाजी आवडेलच असे नाही . आजकाल "पालक - पनीर " या हॉटेल मध्ये मिळणाऱ्या आणि त्यात पनीर आहे म्हणून खाणाऱ्यांचं प्रमाण थोडे बहुत अधिक आहे. असो आज एक नवीन रेसिपी लिहीत आहे जी पौष्टिक , झटपट नाही जरा वेळ लागतोच, खमंग, चटपटीत आहे .... शिवाय ज्यांना पालकाची चव विचित्र, मातकट इत्यादि वाटते त्यांना ती ठराविक चव लागणारच नाही पण पौष्टिकता भरपूर... साहित्य - -हिरवे मूग - १ वाटी -हरभरा डाळ, तूरडाळ , उडीद डाळ- 2 मोठे चमचे प्रत्येकी ( या शिवाय ज्या हव्या त्या डाळी चालतील) - १/२ वाटी तांदूळ - लसूण पाकळ्या ३-४ - हिरव्या मिरच्या ( चवीनुसार) - पालकाची १५-२० पाने - जिरं - हिंग - हळद - 2-3 उकडून घेतलेले बटाटे - १/२ वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची, -१/२ वाटी किसलेले गाजर - आमचूर पावडर - चाट मसाला - मीठ - तूप अथवा बटर -२-३ चमचे - लाल मिरची पावडर - चीज (आवडत असल्यास) कृती - -हिरवे मूग, सर्व डाळी, तांदूळ ६-८ तास भिजवून घेणे भिजवलेल्या डाळी साहित्य साहित्य - नंतर मिक्सर मध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं , पालकाची पाने, भिजवलेले डाळींचे मिश्रण एकत्र वाटून घ्यावे. - त्यात मीठ घालून डोश्याचे पीठ तयार होते. - एका पॅन मध्ये तूप घ्यावे , त्यात जिरं, हिंग, हळद घालावे, त्यात किसलेले गाजर, बारिक चिरलेली शिमला मिरची घालून परतून घ्यावे . - १वाफ येऊ द्यावी, त्यात उकडलेला बटाटा कुस्कुरऊन घालावा. - या नंतर त्यात मीठ, आमचूर पावडर, चाट मसाला , लाल मिरची पावडर मिसळून छान वाफ आणावी. - डोश्याच्या आत भरण्यासाठी मसाला तयार आहे. मिश्रण -तव्यावर डोसा तयार करून घ्यावा , कडेने मोकळा करून घ्यावा . - तयार मसाला त्यात मध्यभागी भरावा, वरून पाहिजे असल्यास चीज किसून भुरभुरावे, दोन्ही बाजूंनी डोसा बंद करून त्याचा रोल बनवावा. डोसा  -याला कोणत्याही चटणी सोबत, टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकतो. चीज घातल्याने ही रेसिपी मुलांना आवडते, त्यासोबत बाकीच्यांना चीज आवडत असेल तर घशात अडकणार तर नक्कीच नाही. डोसा

वाचने 4076
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

वाचायला, फोटो बघायला एकदम सोप्प्या! बनवताना मात्र काहीतरी गफलत होते. डोसा तुटतो. भाजी तिखट होते, पालक करपतो. -( हाटील चालू झाल्यावर वाफाळत्या सांबारात डोसा बुडवून खायची वाट बघणारा) पैलवान