१) मैदा - २ वाट्या
२) मोहनासाठी तूप
३) सुके खोबरे किसून - २ वाट्या
४) सुका मेवा (काजू, बदाम, मनुका)
५) पिठीसाखर - १ १/२ वाटी ( तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता)
कृती : मैदा चाळून घेऊन त्यात मोहनासाठी तूप घालून घेणे. येथे जोपर्यंत पिठाचा मुटका होत नाही, तोपर्यंत मोहन घालणे आवश्यक आहे. साधारण ३-४ चमचे तूप लागेल. आता पाणी घालून पीठ मळून घेणे. पीठ जास्त सैल किंवा घट्ट नसावे, मध्यमच असावे. आता मळलेल्या पिठाला १०-१५ मिनिटांसाठी आराम द्यावा - अर्थात झाकून ठेवावे.
दुसरीकडे मंद आचेवर किसलेले खोबरे भाजून घ्यावे, जास्त करपू देऊ नये. खोबरे भाजल्यामुळे ते खुसखुशीत होते. सुका मेव्याचे बारीक काप करून घ्यावेत. आता पिठीसाखर, खोबरे व सुका मेवा एकत्र करून त्याचे सारण करून घ्यावे. साठ्याकरिता - ४ चमचे तूप (वितळलेले नको) व ४ चमचे तांदळाची पिठी एकत्र करून फेटून घ्यावे. मिश्रण अगदी हलके होईपर्यंत फेटणे आवश्यक आहे. पिठी नसेल, तर कॉर्नफ्लॉवर चालेल. आता मैद्याच्या पोळी लाटतो तशी पोळी लाटून घेणे व त्यावर साठा पसरवून दुसरी पोळी ठेवणे. पुन्हा त्यावर साठा लावून तिसरी पोळी ठेवून व वर परत साठा लावून त्याची गुंडाळी करत जाणे. ह्या गुंडाळीचे समान काप करून त्याच्या पुर्या लाटून सारण भरून करंजी करून घेणे आणि तेलात मध्यम आचेवर तळून घेणे. फोटोमुळे समजणे सोप्पे जाईल, म्हणून स्टेप बाय स्टेप फोटो दिले आहेत. आणि हे फायनल बघा किती लेअर्स आहेत छान व खुस्खुशीत :)
विशेष
वाचने
25283
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम..
करंजी हा आवडता प्रकार असल्याने
+१
In reply to करंजी हा आवडता प्रकार असल्याने by टर्मीनेटर
छान.
पिवशी अगदी सुगरण आहे.
हो, :-)
In reply to पिवशी अगदी सुगरण आहे. by प्रचेतस
https://twitter.com/misalpav
यम्मी!! मस्त!!
व्वा, एकदम भारी,
अप्रतिम!!
Awesome
करंजी आवडली.
वाह!
@ राघव जी , आपण जे तूप न
साठ्याच्या म्हणजे ...
एयर टाइट डब्यात भरून 10 ते 15
वाः