Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शरदिनी on Fri, 04/03/2009 - 15:13

Submitted by मराठमोळा on Fri, 04/03/2009 - 15:31

Permalink

तुमचे

तुमचे वय किती खरे सांगा शरदीनी बाई (स्त्रियाना वय विचारणे योग्य नव्हे पण..) त्यानंतर प्रतिसाद देईन. बाकी माझं डोकं काम करत नाहिये ही कविता वाचल्यानंतर. आपला मराठमोळा कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

Submitted by शरदिनी on Fri, 04/03/2009 - 15:36

Permalink

कवितेचा

कवितेचा वयाशी काय संबंध ? प्रतिक्रिया वाचून माझेच डोके काम करेनासे झाले आहे. ( ताप आणि कर्करोग तेही काही कळले नाही)
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Fri, 04/03/2009 - 15:47

In reply to कवितेचा by शरदिनी

Permalink

हममममम्

असे असेल तर मग सुंदर अतिशय सुंदर कविता!!!!! खुपच छान. कोणते सन्मान अन् कोणते पुरस्कार दिव्या दिव्या दीपत्कार... हे खासच... >>ताप आणि कर्करोग तेही काही कळले नाही याचा अर्थ असा कि एखादी गोष्ट आवडत असेल तर नक्की करावी पण तिच्या पुर्णपणे आहारी जाऊ नये, त्याने माणुस भरकटत जातो. यासाठीच मी आपले वय विचारले होते.. कृपया रागावु नका.. :) आपला मराठमोळा कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on Fri, 04/03/2009 - 15:42

Permalink

काही काही

काही काही शब्द ओळखीचे वाटतात... अवांतरः ताप आल्यासारखं झालयं. ;) ह.घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 04/03/2009 - 16:08

Permalink

जबरदस्त

जबरदस्त काव्य प्रतीभा. छंद,मात्रा इ. ची बंधने तडतडा तोडुन देउन, कवितेच्या चौकटी कडकडा मोडुन ह्या मुर्ख कवी शिरोमणींची नियमांची पुस्तके टरटरा फाडून मनातल्या भावनांचा आपण जो उन्मुक्त अविष्कार दर्शवला आहेत तो पाहुन मी सदगदीत झालो आहे. ह्या कवियत्रीची पहिली कवीता मी मीपावर वाचली तेंव्हाच मी प्राजुतै, जागु, क्रांतीबै ह्या सगळ्यांना सांगितले होते की आता तुमची सद्दी संपली. नव कवीतेच्या क्षीतीजावर एक नवा तारा उगवला आहे. आ हा हा शरदिनीबै तुमच्या कवितांनी एक वाचक म्हणुन आम्हाला फार समृद्ध केले आहे. मग ती 'पेपिनचे पाचकपात्र' असो अथवा 'तगमग' 'घोरपड' किंवा 'पुल'. तुमच्या कवीता वाचल्या की अंगात एक प्रकारचे वारेच संचारते. काही नालायक लोक त्या वेळी हि सगळी 'रेबीजची लक्षणे' आहेत वगैरे सांगुन माझा तेजोभंग करायचा प्रयत्न करतात, पण तुमच्या कवीता वाचुन उन्मक्त झालेला मी ह्या लोकांच्यात डोमकावळ्यांना बघायला शिकलेलो आहे. अरे बघा ... बघा... ह्याला म्हणतात प्रतिभा ! हल्लीच फुटलीय कोंडी अन् परतवलेत आरंभशूर हल्ले शब्दा शब्दात नुसता विखार माजलाय. फसव्या क्रांतीला झालीय बाधा यच्चयावतांची विचक्षण त्रेधा अरे कशाला पाहिजे तो मार्क्स आणी फर्नांडीस ... नुसत्या २ ओळीत क्रांतीची लक्तरे काढली आहेत आणी ह्या धनदांडग्यांची नेमकी अवस्था वर्णन केली आहे. जियो जियो !! पीटिकांना मसाज अन् मलम पण मनावर कोणते कलम? सांगा सांगा .... मनाला कोणते मलम ? "नाही मन निर्मळ .. काय करील साबण ??" आमचे तुकोबा तरी काय वेगळे सांगुन गेलेत ? आपल्या लेखनात तुकोबा दिसले शरदिनी माउली __/\__ भक्त पराडुंग ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 04/03/2009 - 16:16

In reply to जबरदस्त by परिकथेतील राजकुमार

Permalink

तुझा

तुझा प्रतिसाद पाहून डोळे भरुन आले रे परा... मला माहीत होतं तुच.. फक्त तुच एकटाच आहेस नवकविंचा पाठीराखा ! तुम आगे बढो परा... हम साथ है | Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Fri, 04/03/2009 - 16:40

In reply to जबरदस्त by परिकथेतील राजकुमार

Permalink

परा भौ

>>तुमच्या कवीता वाचल्या की अंगात एक प्रकारचे वारेच संचारते. काही नालायक लोक त्या वेळी हि सगळी 'रेबीजची लक्षणे' आहेत वगैरे सांगुन माझा तेजोभंग करायचा प्रयत्न करतात, =)) =)) =)) आपला मराठमोळा कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 04/03/2009 - 16:42

In reply to जबरदस्त by परिकथेतील राजकुमार

Permalink

पीटिकांना

पीटिकांना मसाज अन् मलम पण मनावर कोणते कलम? सांगा सांगा .... मनाला कोणते मलम ? "नाही मन निर्मळ .. काय करील साबण ??" आमचे तुकोबा तरी काय वेगळे सांगुन गेलेत ? साने गुरूजींनी, खरंतर त्यांच्या मातुश्रींनी उत्तर दिलं आहेच, "पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस शाम, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो." असो. नेहेमीप्रमाणे कविता कळली नाही. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on Fri, 04/03/2009 - 16:13

Permalink

भयानक आवडली

कौशल्याचे कुवलयापीड,काजळावर कृष्ण पुटे,यच्चयावतांची विचक्षण त्रेधा या कल्पना नवीन वाटल्या. मी इतरत्र उल्लेखलेला 'दिव्या दिव्या दीपत्कार' आपण इतक्या लवकर कवितेत वापरलेला पाहून तर गहिवरून आले. हल्ली तो कुणाच्या लक्षातच येत नाही. :( कविता योग्य ठिकाणी (पक्षी - या पातळीवर - दहापैकी दहा) पोचते आहे. अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by पहाटवारा on Fri, 04/03/2009 - 16:24

Permalink

रसग्रहण

कवयित्रीने येथे अंतर्बाह्य सौंदर्याची काळजी वाहणार्‍या एका परिस्थीतिवश क्रूर स्री ची मनमनोल द्वीधीतांका ऊलगडण्याचा प्रयत्न करित असतानाच एकिकडे वाचकाना एक टिबांव्हान दिले आहे. पीटिकांना मसाज अन् मलम पण मनावर कोणते कलम? वरिल ओळी अंतर्बाह्य शब्दाचा काव्यनमुनाच नव्हेत काय?? मन जळे जीव उरे काजळावर कृष्ण पुटे ज्या व्यक्तीचे मन जळल्ल्यावर काजळवरही काळी पुटे चढ्वु शकते, ती स्री क्रूरच नव्हे काय?? हल्लीच फुटलीय कोंडी अन् परतवलेत आरंभशूर हल्ले या ओळी क्रूर पणाच्या परिस्थीतिवशतेवर झणत्कार करित नाहित काय? कोणते सन्मान अन् कोणते पुरस्कार दिव्या दिव्या दीपत्कार... या ओळी जेव्हा एका पाठोपाठ येतात तेव्हा त्या मनाच्या द्वीधा स्थीतिचा ऊद्घोष करित नाहित काय? दर कड्व्याखालील टिंबे ही वाचकांना (कोण म्हणाले रे विडंबकांना??) आव्हानच नव्हे काय? अवांतरः रसग्रहणाचार्य लिखाळ यांना डाव्या पायाची करंगळी अर्पून केलेल्या साधनेचा हा रसाविष्कार सादर समर्पीत
  • Log in or register to post comments

Submitted by संजा on Fri, 04/03/2009 - 18:43

Permalink

यौवनफुफाट

यौवनफुफाटा आज आपन फुट गया टूट गया लुट गया मीट गया आजसे आपन शरदीनी बै का फ्यान होगया. रोज सुबा उनका कवीता वाचेगा. वाच वाच के पारायण करेगा. बाल्या फ्राम बानकोट
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 04/09/2009 - 11:02

Permalink

कविता

कवियत्रीने काव्य लिहून आपल्या प्रतीभेचा दाखला दिला आहे. त्याउप्पर प्रतिक्रीयां वाचुन मनास मोहित केले. या आंतरजाळावर याच्यवत सारे प्रतीभावान मुर्छीत होतील यास्तव त्यांनी काळजी ल्हाहावी. भगवंत आपणास असे वारंवार लिहीण्याची सद्बूध्धी देवो. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 04/06/2009 - 13:49

Permalink

दिव्या

दिव्या दिव्या दीपत्कार...
ही दिव्या कोण? अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by सुवर्णमयी on Fri, 05/29/2009 - 18:11

Permalink

जोरदार

अप्रतिम
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sat, 05/16/2015 - 00:42

Permalink

डुर्र... डुर्र्र....!

यांनी फक्त आणि फक्त कविताच लिहिल्या असतील तर मनापासून अरेरे!!! आख्खा महाराष्ट्र (बेळगाव, निपाणी, कारवार, हुबळी, मुंबई, डांग, झालंच तर मिनेसोटा आणि विस्कॉन्सिन-क्यालिफॉर्निया... सकट) शरदिनीतैंच्या महान साहित्याच्या विचक्षण वाचनाहुतीला (अनुभूती नाही, आहुतीच!) पिंपळ(ल)पारखा झाला आहे असे दुगाण्या झाडून म्हणावे लागेल. तूर्तास हे काव्य वाचून आमची झोप उडाल्यामुळे (पक्षी: जोराचा ठसका लागून जुना दमा उफाळून आल्यामुळे) आम्ही उर्वरीत रात्र खरडफळ्याच्या फांदीला लटकून काढायचे ठरवलेले आहे. (या रे कंपनी द्यायला..)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Sat, 05/16/2015 - 08:23

Permalink

:):):)

:):):) @स्वॅप्स, तुम्हाला कसे काय आठवले बुवा आज?
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sat, 05/16/2015 - 13:15

In reply to :):):) by प्राची अश्विनी

Permalink

ख्यिक!

'अलखपैंजणी परखडमोती' ह्या अजरामर कवितेची परत आठवण आली तेव्हा हे रत्नही वर आले! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Sat, 05/16/2015 - 08:38

Permalink

मास्तरांनी शरदिनी आयडी नवीन

मास्तरांनी शरदिनी आयडी नवीन घेतल्यानंतरच्या दिवसात ही कविता टाकली असावी.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 05/16/2015 - 16:59

Permalink

हा हा लै दिवसांनी

शरदिनी तैंचा फुफाटा वाचला आणि आमच्या या विडंबनाची आठवण झाली... (शरदिनीतैंचा फ्यान) रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Sat, 05/16/2015 - 17:25

Permalink

शरीदिनी ताई, कविता मला कळेल

शरीदिनी ताई, कविता मला कळेल असे वाटत नाही. आता पहा कौशल्याचे कुवलयापीड. ताई, कुवलयापीड हे हत्तीचे नाव आहे. मथुरेत रंगभूमीच्या दरवाज्यावर कंसाने कृष्णावर सोडला होता. कृष्णाने त्याचा वध केला होता. असो
  • Log in or register to post comments

Submitted by सदस्यनाम on Sat, 05/16/2015 - 17:50

In reply to शरीदिनी ताई, कविता मला कळेल by विवेकपटाईत

Permalink

विवेकराव ते रामाच्या आईचे

विवेकराव ते रामाच्या आईचे कुवलयापीड नाही ओ. ते कौसल्येचा कुवलयापीड झाले असते. हे म्हणजे कौशल्याने आवाक्यात न येणार्‍या, धुंद, अवजड अवजड वस्तू सोडणे याला म्हणलेय भौतेक. शरदिनीतैंचे कौशल्य आहे ते.
  • Log in or register to post comments

Submitted by चुकलामाकला on Sat, 05/16/2015 - 17:57

Permalink

कोण या शरदिनी ताई? मास्तर कोण

कोण या शरदिनी ताई? मास्तर कोण? आजकाल या लिहित नाहित का?
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sat, 05/16/2015 - 18:13

In reply to कोण या शरदिनी ताई? मास्तर कोण by चुकलामाकला

Permalink

या खूप मोठ्या कवयित्री आहेत.

या खूप मोठ्या कवयित्री आहेत. आपलं नशीब थोर म्हणून मिपावर लिहीत असत. त्यांची डुडुळगावचा गोलंदाज ही माझी ऑल टैम फेवरेट कविता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Sat, 04/14/2018 - 22:57

Permalink

कालच भेटल्या

रात्री दोन वाजेपर्यंत बरोबर होत्या. अजूनही भेट लांबली असती पण जाऊदे
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 04/15/2018 - 09:24

In reply to कालच भेटल्या by भीडस्त

Permalink

ओहोहो

मग अर्धवट झोपेत तुम्हाला असला एखादा काव्य फुफाटा नाही झाला का?
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Sun, 04/15/2018 - 10:21

In reply to ओहोहो by पैसा

Permalink

नाही नाही

एवढ्यात नाही. 'ती'ने अजून एवढा अनुग्रह नाही दिला. अजून अशा बऱ्याच 'अनुष्ठानांची' आवर्तने पूर्ण झाली की सिद्धी साधेल असं मला ती सांगत होती. मग येऊच की आम्हीही 'उत्तरात्रीचा यौवनफुफाटा' घेऊन
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 04/15/2018 - 10:46

In reply to नाही नाही by भीडस्त

Permalink

बाब्बौ

आयडी फुफाट्यात पडू देऊ नका म्हंजे झालं! =))
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Sun, 04/15/2018 - 14:05

In reply to बाब्बौ by पैसा

Permalink

आता काय सांगायचं

'यौवनफुफाटा' ह्या शब्दातल्याच पोटेन्शिअलकडे प्रतिसाद टंकताना महत्प्रयासाने दुर्लक्ष केलेले आहे. कसलं भारी शीर्षक झालं असतं कवितेचं
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 11308 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com