काही दिवसांपुर्वी व्हॉसॅप्पवर एका मित्राचा स्टेटस दिसला :
Coronavirus epidemic didn't break the system, it exposed already broken system.
प्रथमदर्शनी , "ह्यॅ , कैच्याकै" असे म्हणुन हसण्यावारी नेला तो संदेश. पण शांतपणे विचार केल्यावर थोडं थोडं पटायला लागलं आहे. कित्येक निरर्थक आणि अनाकलनीय गोष्टी आपल्या आजुबाजुला चालु होत्या आणि आपण त्या "नॉर्मल" म्हणुन स्विकारल्या होता. करोनामुळे अशा कित्येक गोष्टींवर गडांतर आले आहे आणि खरेच ह्या गोष्टी इतक्या आवष्यक होत्या का असे वाटायला लागले आहे. उदाहरणार्थ : १.ट्रेकिंग बिझनेस ( पर्यटन आणि काजवा मोहोत्सव वगैरे) विचार करायला लागलो तेव्हा सगळ्यात पहिला विचार आला तो हा. ट्रेकिंग बिजनेस. ट्रेकिंग ग्रुप्स चे अक्षरशः पेव फुटलेले पुण्या मुंबैत. थोडीथोडकी नाही तब्बल शे दोनशे टाळकी जमवुन गडकिल्ल्यांवर गर्दी जमवणारे हे लोकं. त्यांना ना इतिहासाची आत्मियता आहे ना सह्याद्रीचे प्रेम आहे. फोटो काढुन लोकांना दाखवणे आणि शनिवार रविवार उन्माद करणे हाच काय तो गहुतांश जणांचा उद्देश ! ( आणि ट्रेक ग्रुप्स त्यातुन अव्वाच्या सव्वा पैसा छापायचे ति बात तर अलहिदाच) गडकिल्ल्यांचे आणि पर्यावरणाचे नुकसान न झाल्यास च आश्चर्य ! (मिपावरील बरेच लोकं ट्रेकिंग करत नसावेत, पण त्यांना आमचा उद्वेग समजावा म्हणुन ही लिन्क देत आहे हरिहर गडावरील गर्दीची , जरुर पहा : http://thewandereryogi.com/worst-harihar-trek-experience/) ह्या कोरोना मुळे हे सगळे थांबेल किमान काही दिवस तरी प्रमाण कमी होईल अशी आशा आहे. २. फुटेपर्यंत फुगलेली आणि आजुबाजुची गावं खात चाललेल्ली शहरं, लोकल ट्रान्स्पोर्ट नुसती लोकं वाढत चाललीत , बघावं तिकडे गर्दी, लोकल मध्ये ३ च्ता सीट्वर ४ जण बसलेत मधलया गॅप मध्ये ४ जण उभे आहेत , दरवाज्यात २० लोकं उभी आहेत , स्टेशन आला कि आरडा ओरडा नुसता राडा. बोलाल तितकं कमी. खालील विदीओ मध्ये दाखवलं आहे ही १००% वस्तुस्थिति आहे , स्वतः दिल्ली मुंबई बंगलोर चेन्नई मध्ये स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे, सर्वत्र हीच कथा आहे. ( कलकत्ता मध्ये ह्याचाहुन वाईट आहे असे ऐकुन आहे.) आणि हिंजवडी झाल्यापासुन हे असलं पुण्यात अन पिंपरीचिंचवड मध्येही सुरु झालंय . :( बरं , शहरं तर शहरं पण आता शेजारचीही गावे खात सुटली आहे ही गर्दी. भिकार आणि भकास अन प्लॅन्ड आणि कॅन्सरर्च्या गाठी सारखे वाढलेले सब अर्बन भाग पाहिले की अक्षरशः किळस येते. पिंचिं मध्ये तर एके काळी ५०% पेक्षा जास्त बांधकामे अनधिकृत होती म्हणे. मुंबईचा ठाण्याचा तर विचारच करायला नको. आधी बोरिवली ते ठाणे हा प्रवास पवई मार्गे एकदम जंगल प्रवास होता आता तर घोडबंदर मार्गे गेलो तरी देखील सिमेंटच्यी जंगले सोडुन दुसरे काही दिसत नाही . ३. किडामुंगी सारखं आयुष्य जगणारी गर्दी बरं ह्या शहरांमध्ये येणारी लोकंही व्यवस्थित जगत असती , एक स्टँडर्ड मेन्टेन करत असती तर चांगले होते पण तेही नाही. अॅबन पॉप्युलेशन प्लॅनिंग चे कडक नियम का नसावेत ह्याला एकमेव कारण म्हणजे लोकशाही. कोठेही या , कोठेही पथारी पसरा, आमच्या वॉर्डात आलात तर आम्ही रेशन्कार्ड अन आधार काढुन देतो म्हणजे आम्हाला मते फिक्स ! लोकल इन्फ्रास्ट्रक्चर वर लोड पडतोय त्याची कोणाला काय पडलीये ? दिसली मोकळी जागा की टाका झोपडी, चार अजुन झाल्या की लावा बोर्ड झोपडपट्टी बचाव समीती अन लावा लोकल खासदार / आमदाराचे नाव , मग कोण कुठला जिल्हाधीकारी अन कोण पोलीस आयुक्त ! आणि त्यातुन पुढे जाऊन विषिष्ठ रंगाचा झेडा लावला कि कामच तमाम . बोलायचा विषयच येत नाही ! बरं आपण काय दर्जाचं आयुष्य जगतोय ह्याचा विचारच नाही , काढा पोरं अन वाढवा मतदार ! ४.जिम , सलून आणि मेकप बिझनेस ह्या जीम बिझनेस चं पेव अचानक कधी फुटलं कळलं ही नाही. खरंतर शरीराला व्यायाम आवश्यक च . पण दर गल्लीत जीम , मग शाळा कोलेज सोडुन तितं चकाट्या पिटत बसणार्यांचे अड्डे , अन व्यायाम सोडुन गाड्या फिरवणे अन पार्ट्या करणे ह्यासठी ग्रुप जमला की पैसा वसुल. शिवाय त्या जीम च्या निमित्ताने फूड सप्लीमेन्ट्स चाही एक साईड बिजनेस जोरात वाढला. ह्या प्रोटीन पावडर्स चे कोणीतरी क्वालिटी टेस्टिंग किंव्वा क्लिनिकल ट्रायल्स केले आहेत का ? सरकार हे विकायची परवानगी कशी देते हे मला तरी अनाकलनीय आहे. सलुन विषयी जास्त हरकत नाही पण दाढी कटिंग ला ५०० अन् १००० रुपये ??? आर यु किडिंग मी ? काय गरज काये सलुन मध्ये एसीची ? नुसते कैच्याकै दिखाऊ पणा करुन कस्टमर्स ना गंडवा. ह्याही विषयावर बोलायचं नाही - परत विषिष्ठ समाज अन त्यांचे नेते दुखावले जातात. जाल तिथे नुसतं राजकारण ! जी कथा जीम आणि सलुन ची तीच मेकप अन ब्युटीपर्लर बिझनएसची. समजा एखाद्या ठिकाणी ४ ५ टाळकी जमुन बँन्क लुटायची प्लॅनिंग करत असतील तर त्यांच्यावर पोलिस कारवाई करतील की बॅन्क लुटली जाण्याची वाट पहातील? =)))) एका मुलीला साखरपुड्याला पसंत केले अन नंतर लग्नाच्यावेळेला तिने मेकप आर्टिस्ट बदलला, नवरा भर लग्नमांडपात " ही ती मुलगी नाहीच, ही दुसरीच कोणतरी आहे " असे म्हणुन निघुन गेलेला अशी स्टोरी ऐकली आहे. =)))) अतिषयोक्ती असेल कदाचित पण थोडेसें तरी तथ्य आहे त्यात. Women put on make-up and men lie. Just to look better than what they actually are. Both are philosophically similar things! ५.लग्न बिजनेस लग्न हा एक अवाढव्य बिझनेस झालाय . केवळ लग्नच नव्हे तर सगळेच समारंभ बिझनेस झालेत. इतकी मांणसे आली कुठुन असा प्रश्न अजुनही पडतो कधी कधी. असेच घरातील एका कार्यक्रमाविषयी बोलत होतो- ठणकाऊन सांगितलं की " मला अगदी जवळची मोजकी १० -२० लोकं हवी आहेत, गर्दी अजिबात चालणार नाही," तेव्हा उत्तर मिळाले की "माहेरकडचा आणि सासरकडचा असे दोन व्हॉट्सप्प ग्रुप पकडुनच ५० च्या वर जातोय आकडा" . मी खुर्ची वरुन खाली पडायचा बाकी होतो फक्त. ( त्यातही मग "माहेरकडच्या व्हॉट्सप्प ग्रुपला निमंत्रण नको द्यायला" असे बोलायची खुमखुमी आलेली पण सध्या बाहेर रेस्टॉरंट्स बंद आहेत म्हणुन बोललो नाही. =)))) ) बघावं तिकडं गर्दी आणि खर्च. ६. अध्यात्माचा उन्माद करणारी धर्मिक स्थळं आणि सण समारंभ आजकाल मंदिरात इतकी गर्दी असते की बोलायला नको. अचानक इतकी आस्तिकता अन श्रध्दा कशी काय वाढीस लागली बुवा ? देव सुध्दा विचारात पडला असेल. आणि त्यावर कहर म्हणजे अंधश्रध्दा निर्मुलन अन तस्तम निश्रध्द, श्रध्दाभंजक समित्या नास्तिक लोकांना मंदिरात प्रवेश ह्यावा म्हणुन अजुन आंदोलने करत आहेत =)))) अहो इथे आधीच देवभोळ्यांची गर्द्दी झाल्याने मंदिराच्या गाभार्यातील आर्द्रता वाढुन मंदिराची अन मुर्तीची झीज व्हायला लागलीये अन त्यात तुम्ही अजुन भर घाला . आला गणेशोत्स्तव काढा पावती पुस्तकं , पाडा रस्त्यात खड्डे अन उभारा मांडव, करा उभ्या डॉल्बीच्या भिंती. आणि हो ह्यातही राजकारण मिसळायला विसरु नका, काय तर म्हणे सार्वजनिक गणेशोत्सव देखील भटमान्य टिळकाने सुरु केला नाही. आपल्याला कसं मतं मिळ्याल्याशी मतलब. =)))) आता ह्या करोनाच्या निमित्ताने हे सारं थांबण्याची , किमान ह्यावर्षी तरी थांबण्याची चिन्हे आहेत, कायम स्वरुपी थांबेल असे काहीसे व्हायला हवे. पुर्वी वारीला ५ ५० माणसे जायची ते ठीक होते आता ५ लाखाच्यावर गर्दी असते म्हणे , मागे मिपावरच कोणीतरी लेख काढलेला की वारी बंद करावी काय , तेव्हा पटले नव्हते ( आजही पटत नाहीच) पण ह्यावर्शी कशी शिस्तित मोजक्या गर्दीत वारी आहे तशी दर वर्षी व्हायला लागले एतर कित्ती सहज सोप्पे होईल सगळं . अध्यात्माच ही तेच झालंय जे इतर क्षेत्रांचे झाले आहे , गर्दी वाढली सत्व डायल्युट झालं अन खिसेभरु गल्लाभरु गर्दीने त्याचा बिझनेस केला. काही काही जण तर कबुलही करतात की हो, आम्ही डोंबार्याचा खेळ मांडल्यासारखा अध्यात्माचा खेळ मांडतो, आमचा धंधा आहे हा =)))) उदाहरणे म्हणली तर कित्येक काढता येतील . पण मुळात थीम इतकीच खरेच ह्यातील कित्येक गोष्टी खरेच जीवनावश्यक आहेत आणि कित्येक केवळ चैन आहेत? खरेच ह्या आणि असल्या अनेक गोष्टी आयुष्यात नसल्या तर असा किती फरक पडेल? ह्या करोनाच्या निमित्ताने ही गर्दी आणि गर्दीवर अवलंबुन असलेली सरवच अर्थव्यवस्था कोसळावी अन सगळं परत बॅक टू बेसिक्स जावं असा विचार मनात येतो. मांणसांची गर्दी कमी झाली तर आणि तरच जंगलांवर चाललेली अतिक्रमणे थांबतील, पर्यावरणाचा र्हास कमी होईल , वन्यजीवसंपदेचे झालेले नुकसान भरुन काढता येईल असे वाटते. आणि हे सर्व जाणीव करवुन दिल्यामुळे करोना व्हायरसला इष्टापत्तीच - ब्लेसिंग इन डिसगाईज म्हणावे असे वाटायला लागले आहे. तुम्हाला काय वाटते?
वाचने
22247
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
सवडीने लिहितो.. बर्याच
+१
हो. पटतंय. प्रश्नच नाही.
बेसिक्स ....
काही पटलं, काही नाही.
आपल्या मताचा आदर आहे
In reply to काही पटलं, काही नाही. by वीणा३
शहरातल्यांना गावकीची ओढ
In reply to आपल्या मताचा आदर आहे by प्रसाद गोडबोले
वीणा ३ च्या मुद्यांना +१
In reply to काही पटलं, काही नाही. by वीणा३
हा हा
In reply to वीणा ३ च्या मुद्यांना +१ by माहितगार
पण इतकं तितकं चालायचं.
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इष्टापत्ती नाही कारण
In reply to काही पटलं, काही नाही. by वीणा३
कडक नियम का नसावेत ह्याला एकमेव कारण म्हणजे लोकशाही
सगळ्या यादीला +१
+११
In reply to सगळ्या यादीला +१ by ज्ञानोबाचे पैजार
दरपत्रक अगदी सही आहे आणि हीच
In reply to सगळ्या यादीला +१ by ज्ञानोबाचे पैजार
येक बरे झाले .....
In reply to दरपत्रक अगदी सही आहे आणि हीच by अभ्या..
:-)
In reply to येक बरे झाले ..... by चौकटराजा
+१
In reply to सगळ्या यादीला +१ by ज्ञानोबाचे पैजार
मागचे चार महिने हॉटेल मधे न गेल्याने कोणालाही काहीही फरक पडला ना
In reply to सगळ्या यादीला +१ by ज्ञानोबाचे पैजार
कोरोना- एक इष्टापत्ती
कोरोना संकट अनेक लोकांसाठी
+१
In reply to कोरोना संकट अनेक लोकांसाठी by गवि
सहमत आहे गवि ...पण ....
In reply to कोरोना संकट अनेक लोकांसाठी by गवि
खरेच या अपेक्षा पूर्ण होवोत.
In reply to सहमत आहे गवि ...पण .... by प्रसाद गोडबोले
पण हे सगळं होण्यासाठी, देशावर
In reply to सहमत आहे गवि ...पण .... by प्रसाद गोडबोले
ह्म्म ...
+१ . करोना च्या संकटामुळे
सहमत
एक माझा अनुभव
ऐहिक व जैविक ...
वारी बद्दल मी लिहीलंहोतं हे
येस विजु भाऊ येस
In reply to वारी बद्दल मी लिहीलंहोतं हे by विजुभाऊ
बंगलोर शहरातले तलाव बरेच स्वच्छ झालेत असं ऐकलं
पंजाबमधुन हिमशिखरे दिसतात, पण
In reply to बंगलोर शहरातले तलाव बरेच स्वच्छ झालेत असं ऐकलं by अर्धवटराव
शहरातील परिस्थितीशी सहमत.
लोकसंख्येमुळे???
@ मार्कस : खूपच छान आहे लेख.
इतर देशातील परिणाम