साहित्य:
- बिन स्प्राऊट
- कोंबडी ( लांबट काप करावे )
- कोरडी तांबडी मिरची
- ताजी मोठी तांबडी मिरची ( शक्यतो तिखट नसावी ...)
- पातीचा कांदा
- लसूण काप
- लांबट कापलेला कांदा
- काजू
- शेंगदाण्याचे तेल
- सोया सॉस
कोंबडी लसूण आणि थोडे सोया सॉस मध्ये भिजवूं १-२ तास ठेवावे
प्रथम मोठ्या वॊक मध्ये मध्यम आचेवर तेल तापवून त्यात कोरड्या मिरची चे तुकडे तळून घावेत व बाजूला काढून ठेवावे ( तेलास मिर्चांचा स्वाद लागेल )
नंतर या तेलात काजू तळून घायवेत व बाजूला काढून ठेवावे, जे थोडे तेल उरले आहे ते हि बाजूला काढावे
- आच चांगली मोठी करावी आणि वॊक चांगलाच तापवू द्यावा ..
एका पाठोपाठ एक तेल, कांदा , लसूण , ताजी मिरची आणि पातीचा कांदा भरभर परतवून घ्यावा .. व
थोड्या वेळाने यात बिन स्प्राऊट घालून आच मोठीच ठेवत सगळे चांगले परतावे ... आणि काढून घ्यावे ..
तेल थोडे वाढवून त्यात आधी तळलेली कोरड्या मिरच्या परत घालून लगेच कोंबडीचे तुकडे घालावे व भराभर परतावे झाकण ठेवून नये , तुकडे / काप बारीक आणि लांबट असल्यामुळे पटकन शिजतील ..
सर्व गोष्टीत एकावर एक घालून अर्ध एकत्र कराव्यात ( दाखवल्याप्रमाणे )
- वाढणे :
फडफडीत भाताबरोबर ( पाहिजे तर थोड्या नारळाच्या दुधात शिजवलेला ) याबरोबर हे वाढावे वरती उरलेली ना परतलेल्या बिन स्प्राऊट भुरभुरव्या
वाचने
7980
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक नंबर
घरगुती कढईतला स्टर फ्रायला
काहीतरी गडबड झाली वाटतं.
In reply to घरगुती कढईतला स्टर फ्रायला by विंजिनेर
वोक हेइ
In reply to घरगुती कढईतला स्टर फ्रायला by विंजिनेर
मस्तच पाकृ !!!
वाह!
कातील !!