Skip to main content

वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 10/04/2017 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
डिअर ऑल, अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल. वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगा करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे. यात माझं आतापर्यंत झालेलं लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अ‍ॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल. साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल. जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन : १) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक) २) जवळजवळ सर्व डेटा टेक्स्ट्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ? ३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ? ४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.

वाचने 55771
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

लै म्हन्जे लैच बेक्क्क्क्कार लोका हायेत.

मला पण एक वेबसाईट सुरू करायची आहे पण इंटरेस्ट घेऊन काम करणारा कुणी भेटत नाही. चांगलं वेब डिझाईन करणारा माणूस हवा आहे. डोमेन घेतला आहे ३ वर्ष फक्त रिंन्यू करतोय. काम मनासारखं होत नाही. स्वतः शिकायचा प्रयत्न केला पण हे खूप कंटाळवाणं काम वाटलं. कुणी तरी मराठी वेब डिझाईन करणारा हवा आहे. इ. कॉमर्स साईट आहे त्यात कमिशन द्यायची तयारी आहे. कुणी असेल तर ९९८७६६२६२६ या नंबर वर फोन करावा.

In reply to by prasadranade

१. ठीकठाक वेबसाईट बनवून देणारे खुप लोक असतात. हे लोक साधारण चार पाच हजारास होम पेज आणि त्यापुढील प्रत्येक पेजला चार पाचशे रुपये या दराने वेबसाईट बनवून देतात. एक Contact Us पेज सोडले तर बाकी पेजेस static असतात. बहुतेक हौशी लोकांचे, छोट्या दुकानदारांचे अशा वेबसाईटने समाधान होते. २. Interactive आणि आकर्षक वेबसाईट बनवणे हे खर्चिक, मेहनतीचे आणि वेळखाऊ काम असते. बहुतेक वेळा वेब डिझायनर, फ्रंट एंड डेव्हलपर आणि वेब प्रोग्रामर अशा तीन व्यक्ती (किंवा वेब डिझाईन, वेब फ्रंट एन्ड डेव्हलपमेंट आणि वेब प्रोग्रामिंग यातील एक किंवा अधिक गोष्टी जमणाऱ्या व्यक्ती) अशा वेबसाईट बनवण्यासाठी एकत्र काम करतात. त्यामुळं अर्थातच आकर्षक वेबसाईटचे बजेट प्रचंड वाढते.

वेबसाईट डिझाईन करणे आणी पेपर मिडीयातील कोणतेही पँप्लेट, ब्रोशर, अ‍ॅड डिजाईन करणे जवळपास सारखेच आहे. गिर्‍हाईकाला २-४ वेगवेगळी डिझाईन्स बनवून द्यावी लागतात. डिझायनरचा मुड असला की तो चांगले खपून एक डिझाईन बनवतो. दोन-तीन दुसर्‍या प्रॉडक्टचे कॉपी मारतो. आता त्याला वाटतं की हे मनापासून खपून केलेले डिझाईन गिर्‍हाईकाला आवडणार आणि तो मनातल्या मनात खुश होतो. पण गिर्‍हाईकाला शेवटी कॉपी पेस्टवालं डिझाईनच पसंत पडतं. झक मारली आणि वेळ घालवला असं होतं कधीकधी. (अपवाद आहेच पण ते अपवादात्मकच). शेवटी कार्यक्षेत्र कुठलही असो, रट्टा मारावाच लागतो बॉस !

नमस्कार म पा, चर्चा फार चांगली वाटली. चर्चे मध्ये ssrf.org चा संधर्भ वाचला त्याबद्धल व अधात्मा बद्धल थोडेसे. “ अध्यात्माचे प्रस्थाविक विवेचन” हा छोटा ग्रंथ आपल्याला अध्यात्माचे महत्व नावाप्रमाणे विवेचानात्माक कथन करतो. दुसरा छोटा ग्रंथ “ अध्यात्म ” ह्यातही आपल्याला अध्यात्माची चांगली माहिती मिळते. एस एस आर एफ डॉट ओआरजी हि वेब जागतिक दर्जाची असून सहा लाखाहून जास्त जगभरातील जिज्ञासू वेब ला भेट देतात. वेब चे घोष वाक्य आहे “ Bridging the known and unknown world “ या वेब वर अतिशय सविस्तरपणे वेगवेगळे अध्यात्मिक विषय सविस्तरपणे मांडले आहेत. वेब पूर्णपणे मोफत आहे. आपला एखादा अध्यात्मिक प्रश्न आपल्याला मांडता येतो व त्याचे उत्तर अत्ठेचालीस तासात आपल्याला मिळते. या वेब ला जगभरातील सामान्य लोकापासून ते scientist सुध्दा भेट देतात. “ Science has limitations, it can not see before birth or after death of human being, spirituality can.” Says Dr Vijay Bhatkar world renowned scientist from Pune. खाली काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पण दिलेली आहेत कृपया वाचावी. For beginners I have no background knowledge on this topic, where do I begin? The Take a Tour section will provide you with an overview of the main sections on our website depending on your primary interest. From where have you obtained this knowledge? Who is the source of the information on the website? The source of the knowledge is the Universal Mind and Intellect, an aspect of God. Some of the SSRF seekers, through their developed sixth sense, are able to tap into the Universal Mind and Intellect. All knowledge received by them is also verified by His Holiness Dr. Athavale through His highly activated sixth sense. Spirituality and Science Why do you term Spirituality as a science? We call the Spiritual Science (i.e. Spirituality) a ‘science’ because of the following: The study of the spiritual dimension is just as systematic and logical as that of the physical world. The reason for everything that happens in the spiritual or subtle-dimension is discernible just as in the physical or gross world. The principles concerning the spiritual dimension can be tested again and again with the requisite tools. Just as the research tools are different for physics and architecture, so also are they for Spiritual Science. Here the main tool required is developed subtle-perception ability or an activated sixth sense. How come other research studies do not reach the same conclusions? Most research studies explore the spiritual dimension and its effects on man, with conventional tools of research while SSRF uses the medium of the activated sixth sense. Using conventional research methodologies to explore the spiritual realm is like trying to measure intelligence with a foot ruler. At best, this type of research can only be corroborative in nature rather than first hand research into the etiology of phenomena in the spiritual realm. What the mind/brain does not know, it will not seek to corroborate. Since all research conducted by SSRF is through the medium of the activated sixth sense, it does not face the restrictions of conventional research methodologies. Hence, the research conclusions are bound to be different. Spiritual Science the same as Scientology? Spiritual Science and Scientology both study about the Truth, but they differ in many aspects. For example, Scientology says the goal of life is to survive whereas Spiritual Science states that the goal of life is to merge with God. My life is really good; can I still gain from this website? Yes, you can still gain from this website A deeper understanding about our life: This website provides a deeper perspective into our life and the factors that affect it. This includes the basic purpose of life, why we do the things we do even when sometimes they are contrary to our nature, the root causes of difficulties in life and how to deal with them, etc. Change is the only constant: Everything around us changes, and the status of our life at this moment is no guarantee of the future. 35% of our life events are decided by our willful actions and 65% are pre-destined. One can overcome mild to moderate destiny by doing spiritual practice. One cannot escape severe destiny, but one can get the ability to bear it by doing spiritual practice. नारायण नाडकर्णी.

ही साईट बनली का ? तीन वर्षात बहुदा बरेच लोक मिळाले असतील , कसं प्रतिसाद आहे ? डोमेन इकडे दिल्यास सर्वांना कळेल पण !

In reply to by रानरेडा

होय, या वेबसाईटचे काय झाले हे जाणून घेण्यास मी ही उत्सुक आहे. आज हा धागा वर येण्याआधीच्या शेवटच्या तीन प्रतिसादात माझा प्रतिसाद आहे. :)

मराठी साइट्सपैकी १) https://avakashvedh.com/ २) app हिंदू क्यालिंडर, ( https://play.google.com/store/apps/details?id=com.alokmandavgane.hinduc… ) आणि त्यांचेच ३) इंडिअन स्काइ म्याप ( app ) ( https://play.google.com/store/apps/details?id=com.alokm.android.stardro… ) फार आवडतात.

मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या. एक अत्यंत जवळचा मित्र जो या कामासाठी सतत माझा पाठपुरावा करत होता तो गेला. त्यामुळे हे काम मागे पडलं. दुसरा एक मित्र जो स्वतःची वेबसाईट चालवतो त्याचं काम बघून माझा वेबसाईटमधला इंटरेस्ट जवळजवळ संपला. आता पुन्हा मूड आला की अध्यात्मावर एक सरळ आणि सोपं पुस्तक लिहून प्रकाशित करीन. हे पिओडी (प्रिंट ऑन डिमांड) पुस्तक असेल. साधारण दहाएक ऑर्डर्स बुक झाल्यावर एक बॅच प्रिंट होऊन ती कस्टमर्सना घरपोच पाठवली जाईल. या प्रकारात प्रिंटींगचा खर्च थोडा जास्त असला तरी स्टोरेजची भानगड रहात नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या. काळ ? कोणता काळ ? कोणाचा काळ ? पण जगातल्या कोणत्याही व्यक्तीनं (पार नोबेल लॉरेटपासून कुणीही), वाट्टेल त्या फोरमवर काल वास्तविक आहे हे सिद्ध करुन दाखवावं ! हे तुमचच वाक्य आहे ! अस्तित्वात केवळ प्रक्रिया आहे पण काल हा निव्वळ भास आहे हे देखील तुम्हीच म्हणालात. मग वरती तुम्ही म्हणालात मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या त्या कोणत्या काळात झाल्या ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Cheeni Kum Title Track... :- Cheeni Kum

आपलं तर रजनिष यांच्या १० टक्के वेळात अध्यात्म संगत होता ना ? मग ही वेळ का आली ? १० च्या ऑर्डर वरच पुस्तक छापणार हा तुमच्या आत्मविश्वासाचा अभाव किंवा न्यूनगंड दाखवत नाही ना ? खरेच ही अपेक्षा नव्हती .

In reply to by रानरेडा

मी जिथे राहतो तिथे जागेचे भाव अशक्यप्राय कोटीतले आहेत त्यामुळे भारंभार पुस्तकं छापून त्याचं स्टोरेज करणं त्रासदायक काम आहे. आज सुद्धा ओशोंच्या एक दशांश वेळेत मी कोणत्याही अध्यात्मिक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. त्यात काहीही फरक पडलेला नाही.

In reply to by रानरेडा

पांढरी पाच मध्ये गाणाऱ्याचं गाणं सामान्य माणसांना समजत नाही. मग त्यांचा त्यातील रस संपतो. He is only for classes and not masses. तुम्ही त्यांना आपल्या पातळीवरून जोखु नका.

In reply to by संजय क्षीरसागर

मी जड वैद्यकीय भाषेत medullary carcinoma thyroid वर प्रबंध लिहिला तर किती लोक वाचतील? कितीही सत्य असलं तरीही? लोकांना झेपायला पाहिजे. मी तुमची नाही लोकांची पातळी दाखवली आहे.

मला एक साधा प्रश्न आहे - वेश्यावस्तीत गेलेलं गिर्‍हाईक समोर आलेल्या १० वेश्यांपैकी अमूक एकाच वेश्येची भोगण्यासाठी निवड करतो त्यामागची त्याची अध्यात्मिक भूमिका काय असते?

एखाद्या गोष्टीत रस निर्माण होणं वा संपणं हे मनाचं कार्य आहे... पण मनाच्या इन्फ्लुएन्समधुन बाहेर पडायला शिकवणे हाच उद्देश होता ना या वेगसाईटचा ? मग शिक्षक स्वतःच मनाच्या प्रभावाखाली का आला? अवांतरः प्रश्न विचारावा कि नाहि याबद्दल कन्फ्युजन होतं. चर्चा भलत्याच वळणावर, किंबहुना नको त्या वळणावर जायला वेळ लागत नाहि. पण मग "प्रश्न विचारणे न विचरण्यापेक्षा चांगलं" हा महाजनी सल्ला आठवला. असो.

वेबसाईट तयार करण्याचा उत्साह दोन तीन घटनांनी संपला असं संक्षीना म्हणायचं आहे. -------- मराठी सिनेमा आणि नाटक कलाकारांनी मागे वेबसाईटी केल्या होत्या. पण पुढे त्यांचं काय झालं? प्रेक्षकांना आवडत्या कलाकाराबरोबरचा फोटो किंवा सही हवी असते. कधी कुठे भेटायलाही आवडत असते . हे वेबसाईटवर शक्य नसते. -------------- मला वाटतं ओडिओ क्लिप्स संग्रहीत केलेली साईट संक्षींनी करावी. Podcast हे उत्तम माध्यम आहे. त्यात एमपी३ डाउनलोड करण्याचीही सोय असते. अध्यात्म विषयिक भाष्य हे वाचण्यापेक्षा ऐकायला उत्तम आहे.

In reply to by कंजूस

अनन्य साधारण महत्त्व आहे. एकेक वाक्य पुन्हापुन्हा वाचणं, ओळी अधोरेखित करणं हे पुस्तकानीच शक्य होतं. त्यामुळे साधकांचा भर पुस्तकावर असतो. त्यामुळे पुस्तक हा योग्य पर्याय दिसतो.

In reply to by संजय क्षीरसागर

म्हणजे तुम्ही ३ वर्षात काहीही उखडू शकला नाहीत म्हणजे पोपट झाला आहे तर! मग ३ वर्षात पुस्तक पण नाही लिहू शकला ? पण तुम्ही ओशो च्या दहापट फास्ट होता ना ? मग ५/६ पुस्तके तरी अली पाहिजेत ना ? बाकी आपला आत्मविश्वास ( कि स्वतः बद्दल चा गॉड गैरसमज ) पाहून जाम हसायला आले होते खरे!