Skip to main content

बहुतेक हा स्वतःला गालीब समजतो पण....

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 30/03/2009 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा भुषण कटककर यांची कविता जो जो प्रवेशला तो गालीब होत गेला.... झाले रवंथ चालू वाचक बरा निघाला अंदाज आमचा हा भलता खरा निघाला पाडा रटाळ, गझला, बकवास शब्द चोथा नाचा जणू रसाचा मोठा झरा निघाला बहुतेक हा स्वतःला गालीब समजतो पण ठाण्यामधील वेडा जो आगरा निघाला वाटे कवी मला हा आहे बराच मोठा चिरता फणस निराशा, फुसका गरा निघाला जुळवून ठेवतो हा यमके मुळात सारी होता प्रसूत हा अमुचा घाबरा निघाला ओळी प्रचंड असती , कोणा न अर्थ लागे ऐकून अर्थ कळले साधा चरा निघाला आवाज हा दुदंभी मी घाबरून उठलो जवळून पाहिले तर हा पादरा निघाला विद्वान "केशवा"ला म्हणती उगाच नाही? अपुलाच फेडण्याला हा कासरा निघाला
लेखनविषय:

वाचने 3755
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

कोण म्हणतं गुर्जी फक्त दारू, बाई बाटलीवरच इडंबने करतात...?? हे वरचे वाचा... विडंबनाचा उत्तम नमुनाच आहे. जय हो गुर्जी!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

कोण म्हणतं गुर्जी फक्त दारू, बाई बाटलीवरच इडंबने करतात...?? मान्य. असेच दर्जेदार विडंबन येत राहू द्या. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

असेच दर्जेदार विडंबन येत राहू द्या. हेच म्हणतो.

ओळी प्रचंड असती , कोणा न अर्थ लागे ऐकून अर्थ कळले साधा चरा निघाला आवाज हा दुदंभी मी घाबरून उठलो जवळून पाहिले तर हा पादरा निघाला लई खास!! ;) चतुरंग

हा हा हा हा हा :)) ऋषिकेश

झक्कास विडंबन.. सुंदर. बाई, बाटली, ती, तिचा बाप या सर्वांशिवायही विडंबन खास जमले आहे. केसुंना दंडवत. सकस विडंबने पाडणार्‍यांचे आणि न पाडणार्‍यांचे सर्वांचे आभार. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

=)) ज ब रा ! जय हो ! ओळी प्रचंड असती , कोणा न अर्थ लागे ऐकून अर्थ कळले साधा चरा निघाला एकदम सही !

झबरदस्त झांटम्याटीक! :-D अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

केशवसुमारांमुळे आमच्या सारख्यांना भूषण कटककर, पुलस्ति वगैरेंच्या मनोगतावरील उत्तम कवितांचा आस्वाद घेता येतो (म्हणजे सर्व कविता वाचून चांगल्या कोणत्या ते ठरवावे लागत नाही). त्याबद्दल केसुंचे आभार. खराटा (रंग माझा वेगळा)

केसुंचे शब्द नेहमीच बरोबर असतात. पण यावेळी मात्र 'कासरा' हा शब्द चुकीचा आहे असे वाटले. शिवाय तो मक्त्याच्या काफियाच्या जागी असल्याने फारच महत्त्वाचा आहे. चु.भू.द्या. घ्या. कासरा = दोरखंड (विषेशतः पोहरा विहिरीत सोडण्यासाठी) कासटा = कासोटा (धोतर अथवा नऊवारी साडी यांचे पार्श्वभागावरील 'कुलुप' :)) 'कासोटा फेडणे' म्हणजे एखाद्याची लाज काढणे अशा अर्थी वाक्प्रचार आहे. (ताई तेलीण मारिल सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा - एक ऐतिहासिक काव्य!) अर्थातच केसुंना हा अर्थ अभिप्रेत नसेल तर माझा आरोप मी बिनशर्त मागे घेतो. बाकी हझल/विडंबन आवडली हे नेहमीप्रमाणे वे.सां.न.ल.... (म्हणजे तसे मी क्वचितच सांगितले आहे. ;))

खतरनाक विडंबन गुरुजी ---^---- चेतन अवांतर : हा ठाण्यातील वेडा कोण :?

दंडवत हो गुरुजी.....!! तुमके विडंबन मे बहोत दम है.... ;)

खासच विडम्बन! केशवसुमारांनी केशवकुमारांची आठवण करून दिली! =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

मस्त विडंबन. आगरा या शब्दाचा वापर लै भारी. दुदंभी आवाज पण मस्त :) मूळ कवितेत आणि इथेही चरा शब्द समजला नाही. नाचा या शब्दाचे तसेच. त्या नंतर उद्गारवाचक चिन्ह असते तर मला थोडा अर्थ लागला असता. -- लिखाळ.

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)केशवसुमार