Skip to main content

[कविता' २०२०] - कळ

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 10/05/2020 13:58 या दिवशी प्रकाशित केले.

कळ




कळ ,कुठूनशी उठणारी खोल खोल रुतणारी. एकांताची सोबतीण गर्दीतही एकांतात लोटणारी क्षणिक,हवीशी , नकोशी. बहुतेकदा नकोशीच . काळाची पुटं चढवूनही नेमाने येणारी डोळ्याच्या कडा ओलावणारी भिजक्या कडा चुकवताना जिव्हारी वेदना नोंदवणारी कितीशे हिशेब मांडणारी हिशेब मांडता मांडता काहीच शिल्लक नसणारी शुन्याच्या भोवऱ्यात अजूनच गुरफटणारी आणि मग त्यातच विरणारी काळासोबत अजूनच गहिरी होणारी अंतापर्यंत साथ देणारी , एकटी सोबतीण म्हणूनच कदाचित आपलीशी वाटणारी ,कळ


वाचने 6685
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

कविता आवडली.. कळ..आनंद देणारी ही , कळ हुरहुर वाढवणारी... मातृदिनाच्या शुभेच्छा ... +१

+१

+1

छान आहे कविता !

In reply to by आवडाबाई

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


ठीक. पुलेशु! सं - दी - प

छान