[कविता' २०२०] - क्या उखाड़ लिया?

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
20 May 2020 - 11:54 pm

क्या उखाड़ लिया?

वेळ मिळाला आहे अनायसे, तर संपवूया
कितीतरी वाचायची राहिलेली पुस्तकं,
अर्धवट लिहिलेल्या कविता, काही लेख.
असंच खूप काही, मनापासून ठरवलं.
धावपळीत रोजच्या, बरंच काही हरवलं.
डायरीच्या पानांनी मग हक्काने खडसावलं,
क्या उखाड़ लिया?

अपूरी स्वप्नं दूरुनच खुणावत राहिली
दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली
वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली
झाडांची पानं गळून गेली,
धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली.
दग्ध पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला,
क्या उखाड़ लिया?

ज्यांच्या अंगा-खांद्यांवर खेळलो,
त्यांनाच खांदा देऊन आलो.
सरणावर थोडा, मीही जळून गेलो.
पोरकेपण नि पोक्तपण सोबत राहिले.
नकळत अशीच कित्येक सरलेली,
अन् थोडीफार उरलेली वर्षं खिजवतात,
क्या उखाड़ लिया?

क्या उखाड़ लिया?

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

कादंबरी...'s picture

21 May 2020 - 12:28 am | कादंबरी...

छान लिहिलंय. +१

"क्या उखाड लिया" हे शीर्षक मात्र चुकल्यासारखं वाटलं.

गणेशा's picture

21 May 2020 - 6:41 am | गणेशा

कवितेत छान विचार मांडलेत,
नाव मात्र मला आवडले नव्हते आधी..
पण काय उखाड लिया म्हणून लिहायला घेतले असेल आणि असे सुंदर विचार आपोआप लिहिल्या गेले असतील असे वाटते...
चांगलं आहे.. आवडले मला...

दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली
वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली
झाडांची पानं गळून गेली,
धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली.
दग्ध पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला,

वा निव्वळ अप्रतिम

चांदणे संदीप's picture

21 May 2020 - 7:25 am | चांदणे संदीप

अप्रतिम लिहिलंय.
फक्त ते "क्या उखाड लिया" ऐवजी वेगळा शब्दप्रयोग हवा होता. त्याने नाही म्हटलं तरी थोडा रसभंग झाला.

कवितेला + १

सं - दी - प

रातराणी's picture

21 May 2020 - 9:34 am | रातराणी

Apratim!!

जव्हेरगंज's picture

21 May 2020 - 9:47 am | जव्हेरगंज

बेहतरीन

+१

प्राची अश्विनी's picture

22 May 2020 - 11:33 am | प्राची अश्विनी

+1

सौन्दर्य's picture

22 May 2020 - 6:23 pm | सौन्दर्य

चांगली कविता शीर्षक मात्र थोडे खटकले कारण जनसामान्यात त्याचा अर्थ थोडा वाईट आहे. एक मात्र कळलं नाही, जी कामं करायची राहून गेली आहेत त्यामुळे काहीच बिघडलं नाही असं कवीला सुचवायचे आहे का ?

गणेशा's picture

22 May 2020 - 8:16 pm | गणेशा

नाही,
डायरीची पाने, पळस, आणि सरणारी सारी वर्षे कवीला म्हणतात
अरे हे एव्हडे तू नाय केले, हे राहिले अन ते राहिले.. तर सांग असे वेगळे काय गाजवले तू ते तरी सांग...

मनिष's picture

25 May 2020 - 8:26 pm | मनिष

मर्म गवसले तुला... (मला अहो जाहो नाही जमत/आवडत)

मन्या ऽ's picture

23 May 2020 - 12:52 am | मन्या ऽ

आवडलीच!

साहित्य संपादक's picture

23 May 2020 - 10:14 am | साहित्य संपादक

लेखकाडून आलेला संदेश:

शीर्षकाविषयी थोडेसे...

कविता लिहितांना शीर्षक काय असावे असा विचार करत होतो, तेंव्हा जो रांगड्या मैत्रीचा, रोखठोक पंच "क्या उखाड़ लिया?" मधे आहे,"तो मराठीत 'काय कमवलं, काय गमवलं" किंवा "तू काय करून घेतलंस रे?" ह्यात मला जाणवला नाही (किंवा, तसाच चपखल शब्दप्रयोग तेंव्हा सुचला नाही). शिवाय मुला-मुलांमधे बोलतांना "क्या उखाड़ लिया?" हे अगदी सामान्य अर्थाने वपरले जाते, वाईट अर्थाने नाही. जसं - "अबे, engineering करके क्या उखाड़ लिया हमने?" लिहितांना माझ्या मनात 'वज़ीर' मधला अमिताभचा हा डायलॉग होता -

ऊपरवाला पुछेगा मुझसे इतनी लंबी जिंदगी दी, क्या उखाड़ लिया तुमने?
मै कहुंगा मैने एक यार को हंसना सिखा दिया.

कविता अगदी शेवटच्या क्षणाला दिली. - त्यामुळे शेवटचा हात फिरवायला, फेररचना करायला वेळ मिळाला नाही. निकाल जाहिर झाल्यावर (नंतर सुचलेले) काही बदल करुन इथेच प्रसिध्द करेन. आत्ता ते बदल करणं उचित होणार नाही.

गणेशा's picture

23 May 2020 - 10:31 am | गणेशा

अशीच वाचली आहे कविता -:))

कवीला जो अर्थ अभिप्रेत आहे, त्यासाठी हिंदीत "कौनसे झण्डे गाड लिये ?" असा जास्त समर्पक शब्दप्रयोग आहे. (उदा. चंद्रावर झेंडा रोवणे ही फार विशेष कामगिरी आहे, त्या अर्थाने) बहुतेक मराठीत - कोणता मोठा झेंडा रोवला ? किंवा "कोणती मोठी तलवार गाजवली ?" असे आहेसे वाटते. असो.

रुपी's picture

23 May 2020 - 12:54 pm | रुपी

अप्रतिम.

तुषार काळभोर's picture

23 May 2020 - 1:03 pm | तुषार काळभोर

कविता छान..

शीर्षक -
स्पर्धकाशी सहमत. क्या उखाड लिया हे रुळले आहे आता बोली भाषेत. त्या कारणाने खटकण्या सारखं काही वाटलं नाही.

मनस्विता's picture

23 May 2020 - 8:52 pm | मनस्विता

+१
अर्थातच कवितेचे शीर्षक खटकले.

सचिन's picture

24 May 2020 - 1:59 am | सचिन

क्या उखाड लिया सारखे शब्द बोली भाषेत रुळले आहेत आणि त्यात खटकण्यासारखं काही नाही, हा एकंदरीत रोख पाहून प्रचंड खंत वाटली. काहींना अजूनही हा शब्दप्रयोग खटकला अन् ते इथे व्यक्त झालं तेव्हा बरं वाटलं होतं.

हातातून वाळू सरकून गेली की मग वाळूचे महत्व पटते. खेळायचे (जीवन जगायचे) कसे या विषयी एक पोकळी निर्माण होते. भकास वाटते.

मनिष's picture

25 May 2020 - 8:27 pm | मनिष

अगदी नेमके!!!

श्रीगणेशा's picture

24 May 2020 - 8:44 pm | श्रीगणेशा

कविता छान +१

मी कधीतरी कविता लिहितो, पण बऱ्याचदा सोबत कोणी चर्चा करायला असेल तर त्यातील उणीवा, बारकावे लगेच लक्षात येतात.

उदाहरणार्थ, माझ्या मते खालील दुसरी रचना मनाला जास्त भावते:

१)
अन् थोडीफार उरलेली वर्षं खिजवतात,
क्या उखाड़ लिया?

२)
अन् थोडीफार उरलेली वर्षं खिजवतात,
तू आयुष्य खरचं जगलास का रे?

प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांचेच आभार. शीर्षकाविषयी माझे स्प्ष्टीकरण मी 'साहित्य संपादक' ह्या आयडी तर्फे कळवले होतेच.
एक हात फिरवलेली कविता आज रात्री देतो.

मनिष's picture

25 May 2020 - 11:38 pm | मनिष

शीर्षक आणि थोडेफार इतर बदल केलेली कविता आज प्रसिध्द केली आहे. इथे वाचता येईल -

आत्तापर्यंत काय केलं?

इरामयी's picture

29 Jul 2020 - 12:02 pm | इरामयी

कविता छान जमली आहे. कोवळ्या वयात अंगात एक रग असते, काही करण्याची जिद्द / करून दाखवण्याची खुमखुमी असते. त्या काळात काहीच अशक्य वाटत नसतं. परंतु काळ जातो आणि सरती वर्षं माणसाला सत्याची जाणिव करून द्यायला लागतात.

क्या उखाड लिया?
हे शीर्षकसुद्धा आवडलं -- विशीच्या उंबरठयावर प्रत्येक तरुण / तरुणीला भावलेला हा शब्दप्रयोग आणि त्यातला भाव या ठिकाणी समर्पक वाटला. __/\__

इरामयी's picture

29 Jul 2020 - 3:51 pm | इरामयी

+१