Skip to main content

आपल्याकडं मध्यानराती घरामधे चोर आला तर...

लेखक दवबिन्दु यांनी बुधवार, 01/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1195
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

तलवार आहे, काठी पण आहे, ढाल पण आहे... किचन मध्ये सुरी असावी... कल्पना नाही, पण चोराची हिंमत होईल का आमच्या घरात येण्याची ह्या बद्दल जरा त्याला विचारा ;)

अरे वा, अशी पार्शालीटी का? तुम्ही दुधारी खन्जीर उशाशी घेऊन झोपणार, अन आम्हाला तो पर्याय नाही दिला. सबब , आम्ही मत नाही देणार ज्जा :? जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

>>माझ्याकडं दुधारी खन्जीर आहे. तो मी उशाकडं ठेवुन झोपतो. चोरापेक्षा तुम्चीच काळ्जी घ्या! जपुन झोपत जा भौ! उगाच झोपेत 'जास्तच' इकडे तिकडे होऊ नका. नाहीतर हत्याराचा उपयोग नाही व्हायचा! =)) - उशाप्रेमी

आयला, कौन बनेगा करोडपती मधील १००० रु. साठीच्या प्रश्नाची आठवण आली. घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

त्याला दारू देईन.. :) थोडी मी पण घेईन त्याच्यासोबत! दारू पिता पिता त्याला या तात्याचं गाण्याविषयी, लाईफविषयी, नात्यागोत्यांविषयी, मराठी आंतरजालाविषयी, बाईबाटलीविषयी अफाट तत्वज्ञान ऐकवीन. तो ऐकून तो बापडा चोरच उलट माझं शिष्यत्व पत्करून मला त्याच्याकडचे पाचपन्नास रुपये देऊन जाईल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आप्शन तिसरा वापरनार तर तुमी. चान्गली आईडिया आहे.

In reply to by दवबिन्दु

चोराचे म(त/न) परीवर्तन झाले आहे. अचूक पणे सांगायचे झाले तर हा पर्याय #५ ठरतो. (गांधी/तात्या)बाबा की जय!

In reply to by महेश हतोळकर

हाहाहा. म्हणजे त्याखाली तात्याची सही 'तात्या गांधी' अशी यायला पाहीजे होती. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

काय राव इचारताय, सगळ्यात भारी हत्त्यार हाय आमच्याकडं ! २००० नवकवितांचा संग्रह आहे, त्यातली एक जरी फेकुन मारली तर हात जोडुन शरण येइल की तो >:) सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

चोर सुंदर स्त्री आहे का पुरुष यावर बरेच काही अवलंबुन आहे. ;) आपला मराठमोळा कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

In reply to by मराठमोळा

वा वा छान कल्पना आहे चालू द्या चालू द्या. जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

काठी : बाप रे अजुन म्हातारपण आले नाही काठी वापरायला. तलवार :दुधारी की एकधारी गोड गोड बोलुन त्याला कटवायच :हा हा हा हा ,माझ्या बापजन्मी शक्य नाही एअर रायफल : चोर हाय का पक्षी गांधीवाद : हल्लीच्या युगात किच्चनमधली सुरी : ती फक्त का॑देच कापायच्या लायकीची आहे .बोटा॑वर फिरली तरी काही होत नाही,का॑दे कापायला पण जोर द्यावा लागतो. अजुन कायतरी : अजुन कायतरी ,काय ?त्याच्या बरोबर आणखीन दोन घरात चोरी करायला जायच की काय !! इथं खुल्ला सांगनार नाय नायतर इतलाच कोनतरी येयील : काही कमी नाहीये,पण ईथले चोर साहित्य ढापतात ते पण कधी-कधी ,आमच्या घरात असल॑ काही मिळणार नाही. चोराला चिकन खायला घालनार : आणी तो शाकाहारी असला म्हणजे झाला त्याचा धर्म भ्रष्ट आणी पातक आमच्या नावाने.. तुर्तास तरी मला हेच वाटत की वरील सर्व न करता आपल पळुन जाण कि॑वा लपुन बसण बर,शिवाय मोबाईल आहेच. सुहास.. एरवी माकड सगळे सारखेच,फक्त माकडाच शेपुट उपटल की त्याचा माणुस होतो

काठी : बाप रे अजुन म्हातारपण आले नाही काठी वापरायला. चेहरा आसा करडा असायाल पाहिजे की काठी उगारली तरी चोराला शु होईल. तलवार :दुधारी की एकधारी धार नसल तरी चालल पण गंज नको. चोराला टिटनस होईल. गोड गोड बोलुन त्याला कटवायच :हा हा हा हा ,माझ्या बापजन्मी शक्य नाही विशालभावु म्हनतात तस नवकविता वाचुन दाखवा. एअर रायफल : चोर हाय का पक्षी चोराला गोळि नाय घालायची फक्त उलटी कडुन मारायच. गांधीवाद : हल्लीच्या युगात घरात लाल गुलाब तयार ठेवयाचे. किच्चनमधली सुरी : ती फक्त का॑देच कापायच्या लायकीची आहे .बोटा॑वर फिरली तरी काही होत नाही,का॑दे कापायला पण जोर द्यावा लागतो. मग बलेड वापरा. अजुन कायतरी : अजुन कायतरी ,काय ?त्याच्या बरोबर आणखीन दोन घरात चोरी करायला जायच की काय !! चोरलेल्या पैशाला इनकम ट्याक्स नसतो. इथं खुल्ला सांगनार नाय नायतर इतलाच कोनतरी येयील : काही कमी नाहीये,पण ईथले चोर साहित्य ढापतात ते पण कधी-कधी ,आमच्या घरात असल॑ काही मिळणार नाही. त्याच पाप त्याचाकडे. चोराला चिकन खायला घालनार : आणी तो शाकाहारी असला म्हणजे झाला त्याचा धर्म भ्रष्ट आणी पातक आमच्या नावाने.. बामणान कोंबडी खाली तर कोंबडीला स्वर्ग भेटतो अस बोलतात.