पटकथेत फारसा दम नसला, दिग्दर्शक नवखा असला तरीही फक्त आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनुभवी नटांनी एखादा चित्रपट ओढून न्यावा तशीच ही एक पाककृती आहे.
यातले प्रमुख अभिनेते म्हणजे कोळंबी आणि नारळाचे दूध आणि बाकी बरेच सहाय्यक व चरित्र अभिनेते.
प्रमुख अभिनेते -
सात ते आठ मोठे प्रॉन्स
२००-३०० मिली नारळाचे दूध
सहाय्यक अभिनेते -
थोडा चिरलेला कांदा
अर्धा चमचा चवीपुरती आलं -लसणाची पेस्ट
हिरवी मिरची
कोथिंबीर
सेलरी (आवडत असल्यास...आज खूप दिवसांनी ही मिळाल्यामुळे "सॅलरी" मिळाल्यागत आनंद झालाय)
थोडे मीठ
चरित्र अभिनेते -
थोडी दालचिनी
१-२ तमालपत्रं
पाच-सहा अक्खे मिरे (मी स्वतःच्याच डोक्यावर वाटलेली मिरपूड घातली.)
तीन-चार चक्रफुलं.
(कढी-लिंब या सहाय्यक अभिनेत्याच्या तारखा मिळाल्या नाहीत आणि गाजर याचा रोल ऐन वेळेवर दिग्दर्शकाने कापला याची नोंद घ्यावी)
पटकथा अगदीच आटोपशीर आहे... (खाली दिलेल्या क्रमाने आणि वेळेनुसार पात्रांची एन्ट्री होते)
कांदा आणि आलं लसणाची पेस्ट - १० मिनिटे
मिर्ची आणि इतर सर्व चरित्र अभिनेते - ५-७ मिनिटे
प्रॉन्स - ५-७ मिनिटे
नारळाचे दूध - ५-७ मिनिटे (उकळी येईस्तोवर)
क्लायमॅक्सला मीठ, कोथिंबीर आणि सेलरी ची एन्ट्री
....बस्स....
तर हे असे "प्रॉन्स स्टू" भाताबरोबर खाऊ शकता. पातळ हवे असल्यास थोडे पाणी घाला. घट्ट-सर बनवले तर अप्पम बरोबर सुद्धा छान लागेल.
याबरोबर थोडी स्पायसी आणि लवंगीचा स्वाद असलेली "लेफ्फे" बिअर असेल तर क्या बात है !!! ब्रम्हानंदी टाळी लागलीच म्हणून समजा.
(आता लेफ्फे बिअर सगळीकडेच आणि नेहमीच मिळेल असे नाही. त्यामुळे उपलब्ध कच्च्या मालावर संशोधन करून "आत्मनिर्भर" बनण्याचे प्रयत्न चालू आहेत)

वाचने
19334
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
संकलन...
या नटाचे काय काम?
अगदी बरोबर...
In reply to या नटाचे काय काम? by चौकस२१२
थाई करी मध्ये सेलरी टाकत
In reply to अगदी बरोबर... by किल्लेदार
सेलरी
In reply to थाई करी मध्ये सेलरी टाकत by किल्लेदार
मोबाईल वरून प्रतिसाद देताना काहीतरी घोळ आहे...
In reply to या नटाचे काय काम? by चौकस२१२
मोबाईल मधली स्मायली
In reply to मोबाईल वरून प्रतिसाद देताना काहीतरी घोळ आहे... by किल्लेदार
मजेदार!
हा हा हा !!!
In reply to मजेदार! by सरनौबत
शॉर्ट फिल्म आवडल्या गेली आहे.
जरूर...
In reply to शॉर्ट फिल्म आवडल्या गेली आहे. by राघव
पटकथेत फारसा दम नसला,
पटकथेत फारसा दम नसला, दिग्दर्शक नवखा असला तरीही फक्त आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनुभवी नटांनी एखादा चित्रपट ओढून न्यावा..माझ्या एका अनुभवास हे वर्णन अगदी तंतोतंत लागू होईल.. अमेरिकेत एकदा श्रिंप कॉकटेल नावाची डिश मागवली तर थोड्यावेळाने समोर कच्चे प्रॉन्स आले, कांहीतरी डिप होते सोबत.. "ही डिश आमच्यायेथे अशीच देतात" म्हणून. मोठाले प्रॉन्स होते त्यामुळे परत पाठवणे जीवावर आले. मग ते सगळे टू गो करून घेतले आणि हाटेलवर आणले. दुसर्या दिवशी एके ठिकाणहून टॉम खा सूप आणले. गरमागरम बटर मध्ये ते प्रॉन्स गुलाबी होईपर्यंत झक्कास परतून घेतले आणि शेवटची दोन मिनीटे थोडे टॉम खा सूप पॅन मध्ये घालून त्यात ते प्रॉन्स शिजवले. कोकोनट करीमधले प्रॉन्स तयार झाले होते. :)कच्चे?
In reply to पटकथेत फारसा दम नसला, by मोदक
असेल ब्वा.. गार, पांढरे व मूळ
In reply to कच्चे? by चौकस२१२
:)
In reply to असेल ब्वा.. गार, पांढरे व मूळ by मोदक
शिनेमा आवडला!!
प्रतिसाद देताना काहीतरी घोळ आहे........शीर्षक डकवल्या जातेय..
स्मायल्या आहेत का प्रतिसादात.
In reply to प्रतिसाद देताना काहीतरी घोळ आहे........शीर्षक डकवल्या जातेय.. by किल्लेदार
वाह... मोदक!!! क्या पकडा है...
पुन्हा साखरेतले प्रॉन्स
In reply to वाह... मोदक!!! क्या पकडा है... by किल्लेदार
नको...
In reply to पुन्हा साखरेतले प्रॉन्स by मोदक
मस्त मजेदार रेसिपी!
:)
In reply to मस्त मजेदार रेसिपी! by मन्या ऽ