Skip to main content

[कविता' २०२०] - उचकी

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 14/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.

उचकी




आय म्हनायची, “उचकी आली, कोन बरं आठवन काडत आसंल?” झूट है सब, आटवनीने पोट भरत नाय, अन आपल्याला कदीबी उचकी येत नाय. कसल्या आटवनी अन कोनाच्या आटवनी ? आपल्याला कुनाचिबी आटवन येत नाय, अन आपली कोनबी आटवन काडत नाय. बां मेला, काबाड-कष्टानं आय गेली, भैनिनी त्वान्डाला काळ फासलं, चुलत्यानं घर घशात घातलं, येकलेपनाला आपन भीत नाय. “कस्मे, वादे, प्यार, वफा, सब बाते है, बातोंका क्या? कोई किसीका नही है झूठे नाते है, नातोंका क्या?” मन्नादा खोटा बोलत नाय. शिक्षान सोडलं, रिक्षा धरली, रिक्षा चालवताना कदीबी आपन पित नाय, आन पोलिसाच्या तर बापाला बी भीत नाय. समुर दारूचा गलास, हातात शिग्रेट, बशीत चनं आन चाकायाला मिट, बस आनकी काय बी लागत नाय. बार फुडल्या भिकार्‍याला न इसरता दोन-पाच रुपये देतो, तो बी हासून राम-राम करतो, रामरामासाटी आनकी काय बी लागत नाय. ………………………………….. ……………………………………….. भिकार्‍याला आज मुद्दाम काय दिलं नाय, आशेने बगत व्हता पन मुद्दाम लक्षच दिलं नाय. म्हनलं आज तरी उचकी यील काय ? आज तरी उचकी यील काय?


वाचने 12705
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

In reply to by मन्या ऽ

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


झूट है सब, आटवनीने पोट भरत नाय, अन आपल्याला कदीबी उचकी येत नाय. लय भारी लिहलंय राव.. मज्जा आलीय वाचून..

+१

+1

क ड क!

+1

आवडली..

दंडवत स्वीकारा माउली

पण कविता कमी आणि कथा जास्त वाटली. सं - दी - प

छान लिहिले आहे