Skip to main content

[कविता' २०२०] - शोधू जरा (गझल)

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 16/05/2020 21:01 या दिवशी प्रकाशित केले.

शोधू जरा (गझल)




खिन्न रात्रींचे मुके आक्रंदणे शोधू जरा चांदण्याने भिजवलेली अंगणे शोधू जरा खिळखिळ्या खिडक्यांतुनी का रोज ही दिसती भुते? हरवलेले आपले बुजगावणे शोधू जरा... वाट चुकलो की नवा पथ पावलांना गवसला भेटलो इतके खरे, पण- कारणे शोधू जरा चांदण्यांची रोजची वर्दळ नभी आहे तरी आज चंद्राच्या मनीची धोरणे शोधू जरा निरनिराळे अर्थ शब्दांना जरी असले तरी फक्त त्यांचे रूप मोहक देखणे शोधू जरा एक घडते भेट, पडते एक उत्कट ती मिठी चल पुन: लाटेप्रमाणे विखुरणे शोधू जरा


वाचने 10059
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

+1

खिळखिळ्या खिडक्यांतुनी का रोज ही दिसती भुते? हरवलेले आपले बुजगावणे शोधू जरा...
हा शेर आवडला.

+१ गझलेचा आत्मा राखला त्यासाठी. देवप्रिया वृत्त आहे, हे लघुंचे गुरू अनेक ठिकाणी केल्याने लवकर समजुन येत नाही. त्यामूळे वृत्ताची लय वाचताना जाणवत नाही.

वाह!

+१

गझला झरती झरझर नित्य मिपांगणी हिच्याही झरण्याची कारणे शोधू जरा सं - दी - प

+1

सारे खयाल ही सुंदर!अधीक गहिरे करुन लिहिलेत पुढे,तर त्यात सूर मारुन तरंगत रहावेसे वाटेल! पुलेशु! अभिनंदन! अवांतर— मतल्याची पहिली ओळ... 'खिन्न रात्रींची मुकी आक्रंदणे...' अशी असावयास हवी,असे वाटते!