Skip to main content

Coronaचे साईड इफेक्ट्स

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 12/05/2020 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात . कंपनी जर त्यांच्यासाठी 15000/- रुपये वेतन निश्चित करत असेल तर कंत्राटदार फक्त जेमतेम 8000/ ते 10000/- रुपये हातावर टेकवतात . त्यात राहणे खाणे याची व्यवस्था कामगारांनी स्वतः च करायची . मग मोठमोठ्या कंपन्यांच्या जवळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत भाड्याने किंवा झोपड्या बांधून हे लोक राहतात . फॅमिली आणणे परवडत नाही मग ग्रुपने जेवण करून पोटाची खळगी भरत असतात ... आज करोना मुळे स्थलांतर करणाऱ्या migrant workers मध्ये हे लोक बहुसंख्य असणार ... आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारे आणि हातावर पोट असणारे हे लोक पुढे काय करणार हा गहन प्रश्न असणार आहे कारण गावाकडे कुटुंब देखील यांच्यावरच अवलंबून असणार ..गावाकडे असलीच तर थोडीफार शेती आणि जमीन यांच्या आधारे भविष्याची आस लावून हजारो किलोमीटर चालत जाण्यासाठी निघालेले हे लोक पाहून खूप वाईट वाटतंय ... आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !! ''उत्तम चर्चा झाली आहे. चर्चेचा रोख पाहता आता धागा वाचनमात्र करणे आवश्यक . सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार'' संपादक मंडळ

वाचने 103423
प्रतिक्रिया 211

प्रतिक्रिया

हे खरेच भयाण वास्तव आहे. तुम्ही म्हणता तसे जर हे लोक
"खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात"
आणि तेही तुटपुंज्या पगारावर, तर आता हे काम कोण करणार हा प्रश्नच आहे.

वास्तवाचे छान वर्णन. अशा लोकान्च्या "कल्याणा"करता जरी अनेक सरकारी कायदेकानू बनवले गेले तरी शेवटी "कल्याण" दुसर्‍याच लोकान्चे होते. ज्या कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें, त्यान्चाही कोणीतरी "धनी" असतोच. सरकारी कायदेकानू बनवले जात असताना militant trade unions चा प्रभाव कदाचित पुरेसा विचारात घेतला गेला नसावा. militant trade unions ला उत्तर म्हणून "आपले लोक" (की जे वाटाघाटीमध्ये भान्डून किन्वा इतर प्रकारे आपल्याकरता जास्त पैसे मिळवून घेतात आणि ज्याना काढून टाकणे या करता अनेक सव्यापसव्य करणे जरूर असते) कमित कमी ठेवून जमेल तेव्ह्ढी कामे कंत्राटदाराच्या हाती सोपवणे हा प्रकार सुरू झाला. कदाचित अशा mass migration नन्तर कामाची नवीन पद्धत शोधावी लागेल. अशा परिस्थितीत AI/Robot अशा धर्तीवर कामे सुरू झाल्यास जी कामगारान्ची जरूर कमी होईल आणि/किन्वा required skill set जे बदलतील, त्यामुळे भविष्यकाळात "नोकरी" ची कल्पनाच बदलून जाईल. पाश्चात्य देशात असे थोड्याबहुत प्रमाणात आहेच - जसे gig-economy म्हणजे "महिन्याला/वर्षाला ठरवलेला मेहनताना" या ऐवजी "अमुकतमुक करणे/करवून घेणे" हे तुमचे काम आणि त्या करता तुम्हाला एकूण येव्हढी रक्कम मिळेल (त्यातील काही रक्कम based on success असू शकेल).

कोरोनाग्रस्तांपेक्षा लॉकडाउनग्रस्तांचे प्रश्न मोठे झाले आहेत / होणार आहेत

१९९४ सालची कुणीतरी जगताप (किंवा दुसरे नाव असेल) विरुद्ध मुंबई महापालिका अशी एक केस आठवते आहे. त्यात हा माणूस अत्यंत अकार्यक्षम आहे म्हणून त्याला कामावरन काढून टाकले होते. याविरुद्ध निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने लिहिले होते कि सद्य कायद्याप्रमाणे एखादा माणूसअकार्यक्षम आहे म्हणून त्याला कामावरुन काढून टाकता येणार नाही तेंव्हा त्याच्यासंपूर्ण ५ वर्षाचा पगार देऊन त्याला नोकरी वर घेण्यात यावे. टी सी एस च्या अहवालाप्रमाणे (१९९१) नौदलाच्या गोदीत ९ हजार कामगारांची गरज आहे. परंतु तेथे प्रत्यक्षात २० हजार कामगार होते. यानंतर नौदलाने तेथे भरती बंद केली होती. कारण एकही कामगाराला काढून टाकणे शक्य नव्हते. अशा तर्हेच्या कामगार कायद्यामुळे खाजगी उद्योजक आपल्याकडे कामगार कायमचे ठेवून घ्यायला तयार नसतात. कालच एका उद्योजकाशी बोलत असताना तो म्हणाला कि माझ्याकडे सध्या एकही ऑर्डर नाही गेल्या दोन महिन्यात काहीही काम झालेले नाही आणि महिना माझे वेतनावर ५ लाख रुपये जातात. दोन महिने मी कामगारांना घरी बसून पगार दिला आता मात्र मला एक दमडी देणें शक्य नाही. काय कायदेशीर कारवाई होईल ती होईल. कारखान्यात वरती पावसाळ्याच्या अगोदर छप्पर टाकणे आवश्यक आहे अन्यथा सर्व यंत्रे गंजून जातील. लोकडाऊनच्या अगोदर मी छप्पर काढले आहे आणि आता यंत्रे उघड्यावर आहेत. सरकारचे काय जाते सर्व कामगारांना पगार द्या सांगायला. हि स्थिती तीन महिने राहिली तर मला कारखाना विकून घरी बसावे लागेल. आपण औद्योगिक क्षेत्रात गेलात तर अशा अनेक करूण कहाण्या ऐकायला मिळतील

यासाठी मी मुक्त अर्थ्व्यवस्थेच्या विरूद्ध आहे. पण 90 टक्के जगाने ती मान्य केली आहे . आता माघार घेणार कशी? व 21 वे शतक बुद्धीचे आहे श्रमाचे नाही . ज्यावेळी " व्यवस्थापक" या प्राण्याविषयी मालक लोकांचे ज्ञान वास्तवाला धरून असेल त्यावेळी त्याना देखील 15000 वर काम करावे लागेल. आजतरी व्यावस्थापकामुळे आपला व्यवसाय वाढीस लागतो हा गैर समाज मालकांमध्ये आहे .

करोना हे एक थोतांड आहे. टाळेबंदी हे त्याहून थोरलं थोतांड आहे. सोशल डिस्टन्सिंग हा रोगापेक्षा भयंकर उपाय आहे. समाजात न मिसळल्यामुळे लोकांना हर्ड इम्युनिटी प्राप्त होण्यात अडथळा येतो. कुठूनतरी फक्त लोकांना त्रास द्यायचा इतकीच योजना आहे. लोकांनी बसायचं बोंबलंत. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

थोतांड? इटली / इंग्लंड आणि अमेरिकेतील मृत्यू तुम्ही pahilele दिसत नाहीयेत अमेरिका = ३०० मिलियन त्यात ८० हजार मृत्यू त्याचं १० टक्के साधारण लोकसंख्या असेलल्या ऑस्ट्रलयात एकूण मृत्यू १०० चाय आसपास , वेळेवर टाळेबंदीकेली म्हणून नाहीतर मृत्यू ८ हजार च्या घरात असते ! अर्थात भारतशी तुलना कारेन चुकीचे होईल लोकसंख्येचाह इतकं दबाव असल्यामुळे भारतात कोणत्याही सरकारला काहीही केलं तरी हे आवरण अवघडच झालं असता

In reply to by चौकस२१२

चौकस२१२, हे करोनामुळे झालेले मृत्यू नाहीत. हे करोनासोबत झालेले मृत्यू आहेत. काळजी घ्यायला हवी, याविषयी दुमत नाही. पण टाळेबंदी हा उपाय नाही. विशेषत: धडधाकट माणसांना घरात डांबल्याने कसलाही फायदा नाही. आ.न., -ग.पै.

In reply to by कपिलमुनी

टाळेबंदीच्या नावाखाली भयावडंबर ( = fear mongering ) माजवलं जातंय. रोग्यांना अलग / विलग ठेवलं गेलं तर ते समजू शकतो. निरोगी व धडधाकट लोकांवर टाळेबंदीची सक्ती कशासाठी? कसला करोना व्हायरस? करोनाच्या अनेक जातीआहेत. या सगळ्या विषाणूंसाठी बेमुदत टाळेबंदी करायची का? -गा.पै.

In reply to by चौकस२१२

चौकस२१२, अगदी बरोबर बोललात पहा. मीडिया काय वाट्टेल ते बरळतेय. मी त्यावर विश्वास ठेवू म्हणता? शक्य नाही. आ.न., -गा.पै.

रेल्वेमध्ये प्रवासासाठी आरोग्य सेतू अॅप बंधनकारक, आवाहनानंतर मध्यरात्री अचानक सक्ती : https://marathi.abplive.com/news/india/aarogya-setu-app-is-mandatory-fo… याला मनमानी म्हणतात. हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे. यालाच घटनेतल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली असंही म्हणतात. मुकी बिचारी कुणीही हाका रे! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मूलभूत हक्कांची पायमल्ली ! हे फक्त रेल्वे प्रवाशांना च लागू केलाय सगळ्या जनतेला नाही असेच अप ऑस्ट्रेलियन सरकारने चालू केलं अजिबात सक्ती नाही पण आजपर्यंत २७ मिलियन पैकी ६.५ मिलियन लोकांनी वापरयाला सुरवात केली आहे आणि हो इथे जनता जागरूक आहे तरी सुद्धा चांगला प्रतिसाद सुरु झालाय

सध्य काळातले सगळ्यात मोठे स्थलांतर आपल्या देशात होत असुन परिस्थिती दयनिय,चिंताजनक आणि भयावह देखील दिसत आहे. याच स्थितीचा एक व्हिडियो देउन जातो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Soniye... :- Aksar

In reply to by मदनबाण

बिहारी मजूरांच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटते पण एक प्रश्न विचारावासा वाटतो हे सगळे मजूर बिहार आणि उत्तर प्रदेश मधलेच का आहेत हा . इतकी वर्षे हा प्रश्न सर्वच राजकीय पक्षानी सोयीसाठी टाळला आहे. एकटे राज ठाकरे या बद्दल बोलले होते. बिहारी उत्तर प्रदेशी भय्याना इतक्या दूर कामासाठी जावे लागते याचे त्या प्रदेशातील पुढार्‍यांना काहीच देणेघेणे नाहिय्ये. या कडे हिंदी न्यूज चॅनेल्स दुर्लक्ष्य करीत आहेत. बिहारी लोकांना तिकडे काम मिळत नाही हा त्या मजूरांचा दोष नाही. बिहारी नेत्याना उत्तर प्रदेशच्या नेत्याना याबद्दल त्या मजुरानी जाब विचारायला हवा. ते विचारणार नाहीत पण देशाने त्या लबाड खादाड भ्रष्ट लोकांच्या लालची पणाची किम्मत किती दिवस मोजायची? कृपाशंकर सिंग , लालु यादव , मुलायम , ममताबाई , मायावती , अखिलेश ,हे त्यांचे इतरवेळचे कैवारी हे कोणी या मजुरांची मदत करताना दिसत नाहियेत. त्यांचे पक्षही जीव गेलेल्या पोपटासारखे झाले आहेत का?

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ माझ्याही मनात हाच प्रश्न आहे... उत्तर प्रदेशातुन तर देशाला ८ पंतप्रधान मिळाले आहेत तरी त्यांची प्रजा इतर राज्यात लोंढ्यांच्या स्वरुपात जात राहिली आहे ! जिथे रोजगाराची संधी उपलब्ध असणार तिथे लोक जाणारच ! महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण फारच मोठे आहे. तुम्ही क्षणभर विचार करुन बघा कि याच प्रमाणात मराठी लोक पंजाब, दिल्ली किंवा बंगळरु मध्ये जाउन वसली असती तर ! उत्तर प्रदेश, बिहार इथे गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड आहे, त्यामुळे तिथली मोठी लोकसंख्या महाराष्ट्रात विस्थापीत झाल्याने महाराष्ट्रातील गुन्हेगारी देखील अर्थातच लक्षणीय प्रमाणात वाढली. हे नेते मंडळी नक्की कधी आणि काय काम करतात त्याचे अवलोकन करण्याची व्यवस्थाच नाही,हीच स्थिती सरकारी कर्मचारी वर्गाची देखील आहे. मोदी सत्तेत आले तेव्हा कुठे हापिसात वेळेवर येणेचे सक्तीचे झाले कारण फिंगर प्रिंट सेंसर ने हजेरीची नोंद करणे आवश्यक केले गेले, म्हणजे इतके वर्ष बाबुलोक जेव्हा इच्छा होइल त्यावेळी हापिसात येत होते हे उघड आहे. बरं अनेक राजकारणी, मंत्री संंत्री, आमदार खासदार नगरसेवक वगरै देशसेवा करण्यासाठी म्हणुन राजकारणात येतात, जनतेची सेवा करतात असे भासवले जाते ते मोठ्या प्रमाणात सत्य नाही,कारण यांच्या संपत्तीचे आकडे बघितले तर राजकारणासारखा दुसरा पैसे जमवण्याचा मार्ग आपल्या देशात दुसरा नाही हे लगेच कळुन येइल. कोव्हीड- १९ व्हायरस ने आर्थिक संकट आले असताना सामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात जसे शक्य असेल तसे दान केले, परंतु देशातील किती राजकारण्यांनी मदत म्हणुन पैसे दिले ? आपला देश भ्रष्ट राजकारण्यांनी पोखरुन काढला असुन त्यांचे संपतीचे आकडे पाहता त्यांनी त्यांच्या पुढील २५ पिढ्यांना पुरुन उरेल इतका पैसा चरुन ठेवला आहे, आपला देश गरीब नाही तो राजकारण्यांनी गरीब करुन ठेवला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये विकास करण्याची इच्छा तिथल्या राजकारण्यांना झाली नाही त्याचा परिणाम देशातील इतर राज्यांना विशेषत: महाराष्ट्राला भोगावा लागलेला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mile

आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !!
एवढं ही निराश होऊ नका हो, साहेब. अशी संकटे जगात यापूर्वीही आलेली आहेत, आणि त्यातून आपण मार्ग काढला आहे.

In reply to by वामन देशमुख

यापूर्वीची खर्या अर्थाने साथ आली होती 1920 साली ! म्हंजे 100 वर्शापूर्वी. त्यावेळी मानवी जीवनात माणूस मरायचाच अशी समाजाची मानसिकता होती. कारण एकूणच मानवी प्रगती निदान वैद्यकात नगण्य होती. आता वैद्यकात टेस्ट ट्यूब बेबी, स्टेम सेल थेरपी, क्लोनिंग, डी एन ए ई चा शोध लागल्याने विषाणू मुळे होणारा नरसंहार मानवी मनाला बोचक ठरू लागला आहे. खरा धक्का तो आहे ! जेंव्हा वादळे ,भूकंप ,पूर अशी संकटे येतात त्यावेळी तीच एकाच वेळी जगावर कधीही कोसळत नाहीत , पण जैविक संकटाचा आवाका मोठा असतो.तुम्ही म्हणता ज्या संकटाना तोंड मानवी समाजाने दिले ती संकटे कधीही जागतिक नव्हती. एका देश दुसर्याला मदत करू शकत होता . आता तसे आहे काय ?

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी तुमचे रिप्लाय पाहून मला आता वाटते आहे. India deserves better चा हा नविन भाग मी लिहायला पाहिजे होता. देशात सगळी फेकू गिरी चालू आहे, पण या संकट समयी नको हेवेदावे म्हणून गप्प बसलो.. पण टाळ्या, थाळ्या, दिवे, आत्मनिर्भर अर्र काय र गड्या.. तरी cosara news and test kit, त्याचे पॉलिटिक्स पोहचले नाही लोकांच्यात

In reply to by गणेशा

कपिल मुनी यांच्या प्रतिसादा ला हा रिप्लाय होता. असो. शेवटचे एक वाक्य जाहीर बोलणे मला ही मान्य नव्हते, पण पूर्ण प्रतिसाद योग्यच होता, योग्य बोलले होते.. चालायचेच..

बांधकाम क्षेत्रातील मजूर , मॅसन वगैरे लोक आणि अगदी रिलायन्स आणि तत्सम कंपन्यांच्या प्लांट मध्येही ही असली आधुनिक वेठबिगारी अगदी बेमालूम चालू असते .... मला एक कळत नाही शेअर बाजारात अब्जावधी रुपयांचे कॅपिटल उभारणाऱ्या आणि हजारो करोड चा नफा कमावणाऱ्या कंपन्या ज्यांच्या जीवावर ह्या उलाढाली करतात त्यांना त्यांच्याच कंपनीत काम करणाऱ्या मजुरांची ही अवस्था दिसत नाही ? उदाहरण द्यायचे तर रिलायन्स फाउंडेशन कडून अनेक सेवाभावी प्रोजेक्ट हाताळले जातात मग त्यांना त्यांच्या कामगारांची हलाखीची परिस्थिती दिसत नसेल काय ? की दिसूनही ही सगळी सामाजिक संस्थांची नाटकं CSR हडपण्यासाठीच असतात ¿

सल्लूभाई ची बीइंग ह्युमन वगैरे थोथांड अशीच आहेत . 100 रुपयाचा टी शर्ट 500 नी 1000 ला विकून तो पैसा जमवलेला पैसा नक्की जातो कुठं ? अशा आपत्ती काळात या संस्था कुठं दडून बसल्यात ? सल्लू स्वतः एक पैसा तरी देतो काय दान म्हणून ?

चर्चा वाचत आहे. यावेळेस मुद्दाम करोना, lockdown, सरकारी यंत्रणा, आणि आरोग्य खाते या बद्दल लिहिले नाही.. कारण केंद्राच्या असंख्य गोष्टी आपल्याला पटल्या नाही. आणि ही वेळ नाही म्हणून नाही लिहिले. पण येथील चर्चा वाचत आहे.. चांगला आहे धागा

फक्त मजुरच नाहीत तर बरेच लोक ह्या lockdown ची शिकार होणार असे वाटते. माझ्या एका मित्राची बायको एका आघाडिच्या दैनिकात आहे. दरवर्षी कंत्राट रिन्यू व्हायचे ते यंदाहोणार नाही. त्याचा जॉब अगोदरच गेलाय. (ह्यात मात्र कंपनीकारणीभूत आहे.). अजूनपर्यंत बायकोच्या आधारावर चालू होते, आता काय? होम लोनचे पुढे काय? त्याला आता जॉबमिळणेअवघड आहेच. अजून एका दैनिकाने आपले कोल्हापूर युनिट बंद केल्याचे कळले. त्यातील स्टाफचे काय? बाकीच्यानी अर्धा पगार चालू केलाय. बऱ्याचशा आय टी कंपन्याही लोकांना घरी बसवू लागल्या आहेत. मुलांच्या अवाढव्य फियांचे काय? सर्वच अधांतरी होवून बसलय. कालच मला एअरटेल कढून मेसेज आलाय-"तुम्ही ज्या एअरटेल फ्रेंड शी बोलला..." , फ्रेंड काय? कर्मचारी का नाही. अचानकच कंपनीच्या मेसेंजर वर काहीजणांची एक्झीट दिसू लागलीय. सर्वच संभ्रमित करणारे आहे. मजूर निदान रस्त्यावर उतरून मिळेल ते खातात, तशी सवयही आहे पण ज्यांनी अशा कॉर्पोरेटमध्येच काम केलय त्यांचे काय? होम लोन चे काय? ज्यांची शेती आहेत ते थोडे बहुत तग धरतील पण बाकीच्यांचे काय? लोन कसे फेडणार? बँका बुडतील काय? आहे टी पुंजी ज्यांनी बँकेत ठेवलीय ती पण जाईल का? हजारो प्रश्न आहेत.

एक उदाहरण , लोकडाऊन सुरु झाल्यावर काही दिवस दुकाने बंद होती .. त्यापैकीच एक , रवी टेलरचे दुकान.. साधा टेलर , कुणाची पॅन्ट फाटली, चैन तुटली , उसवली कि दुरुस्त करून जेमतेम टिसचाळीस रुपये कमावणारा माणूस .. काय अवस्था झाली असेल त्याची कल्पनाही करवत नाही .. वीस दिवसांनी , मला इतर दुकाने सोडून फक्त तोच दुकान उघडून बसलेला दिसला .. मी कामावर निघायच्या आधी चहाचे घोट पीत , त्याला न्याहाळत बसायचो .. अर्धा दरवाजा उघडा आणि स्वारी आत मशीनवर बसून असायची . बघून बघून मीच एके दिवशी त्याच्याकडे उगाचच जुने कपडे दुरुस्त करायला दिले आणि चौकशीही केली .. त्याची अवस्था ऐकून वाईट वाटले आणि काही मदत हवी का तेही विचारले .. पण त्याने खरंच ती मदत नाकारली .. थोडे दिवस अजून गेले .. आणि अचानक त्याच्या दुकानावर लाईन दिसायला लागली . रवीशेट बाहेर लोकांना ओरडून लांब उभे राहा , गर्दी करू नका म्हणून मोठ्या उत्साहाने सांगत होते .. मला आश्चर्य वाटले .. मीही नक्की काय गडबड आहे ते बघायला गेलो . बघतो तर काय , छोट्या छोट्या पॅकेटमध्ये ( १/४ किलो ) हे साहेब डाळी कडधान्य विकतायत .. आता मला सांगा , हातपाय गाळून काय होणार आहे का ,, नाही ना .. मग जे होतंय ते बघायचं , कुणाला शक्य असेल तेवढं द्यायचं आणि हळूहळू पुढे सरकत राहायचं .. तो करोना जसा आला तास जाईलही पण आयुष्यभर असाच काहीतरी सकारात्मक बघून जगायचं ,, काय बोलता , बरोबर कि नाही ...

In reply to by खिलजि

काही मदत हवी का तेही विचारले .. याबद्दल अभिनंदन. सध्या हाच उपाय आहे. आपण आपल्या मित्रांना / परिचितांना त्यांच्या परिस्थितीबद्दल विचारणे आणि या कठीण प्रसंगात त्यांच्यासोबत उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by मोदक

मला आवडते राव , हे असं काहीतरी करायला .. अगदी मनापासून आवडते .. बायकोला जाम राग येतो पण तिला माझे कौतुकही वाटते .. तसे तिने कित्येकदा बोलूनही दाखवले आहे .. आतापर्यंत किती दुबळे याचा हिशेब ठेवला नाही पण शक्यतो मदत १०००० च्यवर असेल तर बायकोला नक्की सांगतो आणि मगच करतो .. सबब , सध्या हाती फक्त एक फ्लॅट आहे आणि एक दुकान , पण स्वतःच्या हिमतीवर घेतलेले आणि दुसरे काही नाही .. आणि हो हे सर्व मी लोकांना मदत करत आणि रोजचा दानधर्म करत घेतलेले आहे .. मोह आणि माया दोन्ही नश्वर या जगी सुखांची पेरणी करत जावी दुःख तर आपसूक उगवलेलेच असते , गवतासारखे त्यात फक्त पुण्याईची दुर्वा शोधावी कधी कोण कसे आणि का देऊ ? याचा लोभ नसावा पशुपक्षी मित्र साधुसंत यांच्या भल्यातच देव मानावा खिडकीशेजारी येतील मग राघुमैनाचिमण्या कावळे सारे ऐकत राहा नाद तयांचे , मिळेल वैभव प्यारे

अत्यंत असंवेदनशील होऊन अडचणीचा प्रश्न विचारू का..? करोनामुळे पगार / नोकरीधंद्यावर परिणाम झाला म्हणून किती लोकं आत्महत्या करतील..? नोकरदार- व्यावसायिक वर्गाला सरकार लगेच पॅकेज / मदत वगैरे जाहीर करेल..? हे प्रश्न बर्‍याच जणांना आवडणार नाहीयेत याची कल्पना आहे तरीही भावभावना बाजूला ठेऊन याचा विचार करावा.

जेडी,
मजूर निदान रस्त्यावर उतरून मिळेल ते खातात, तशी सवयही आहे पण ज्यांनी अशा कॉर्पोरेटमध्येच काम केलय त्यांचे काय?
अगदी नेमका प्रश्न विचारलात पहा. म्हणून मी करोनास थोतांड मानतो व सोबतच्या टाळेबंदीस महाथोतांड. आ.न., -गा.पै.

मी पी एम निधीत पैसा घालायचा नाही असे ठरवले कारण मी व्होट बॅन्क आधारित पॅकेज कल्चरच्या विरोधात आहे. ती ही कशी ? तर डी एस के ना तात्पुरते लोन मिळू द्यायचे नाही. एच ए ला मदत न करता तिला विकायचा घाट घालायचा. बी एस एन एल ला बुडवायचे,जेट एअर वेज ला खेळते भाडवल धंदा असतनाही द्यायचे नाही कारण त्यात व्होट बॅन्क नाही. लॉबी नाही . इथे अनेक उद्योगांची लॉबी 2024 मधे निवडनुकीसाठी काहीतरी देईल ना ? सबब कितीही लॉकडाउन वाढला व आपल्याला भांडी घासायला लागली तरी मोलकरणीला दर महिन्यास निम्मा पगार द्यायचा .अधून मधून ज्या सुताराने आपले गेले वर्शी फर्निचरचे काम केले त्याला मदत करायची असा निर्णय मी घेतला आहे. स्वार्थी मदत ! आता न्हाव्याकडे गेल्यावर जरी त्याने पैसे वाढवले नसले तरी दुप्पट पैसे देणार. आपल्या परीने स्वार्थी सामाजिक कार्य !

गामा पैलवान, मी तुमच्या विचारांशी बहुतांशी सहमत आहे. पण सोशल वा फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे असे मात्र मला वाटते. कारण जर एक दीड मिटरचे अंतर ठेवून आणि मास्क लावून जर रोगापासून दूर राहता येणे शक्य असेल तर रहावे. आणि त्याकरिता फार काही खर्च वा मेहनतही नाही. पण लॉकडाऊन हा अनाठायी आहे. आणि त्यातही तो ज्या पद्धतीने केला गेला/जातोय ते जास्तच संदर्भहीन ठरतो आहे. लॉकडाऊनशी निगडीत प्रमुख मुद्दे जे माझ्यामते हुकलेले आहेत १) फक्त चार तासांचा अवधी देवून लॉकडाउन करणे. कुणी कुठल्या दुसर्‍या शहरात काही कामा कर्रिता अगदी दोन-चार दिवसाकरिता गेलेला असेल तरी तो ही अडकला. २) लॉकडाऊन का करतोय याचे उद्दिष्ट स्पष्ट नसणे - असे सांगितले की कोरोनाची साखळी तोडायची आहे. कोरोनाला हरवायचे आहे म्हणून लॉकडाउन केले जात आहे. पण ५५० वरुन ७८ हजारांवर केसेस मिळाल्यात मग साखळी तोडण्याचे उद्दिष्ट पुर्ण झाले का ? सामान्य जनतेच्या मनात सुरवातीला आशा निर्माण झाली की २१ दिवसाच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचे संकट टळेल वा अगदी थोडक्यात निभावेल. तसेही कोरोनाची लक्षणे दिसण्याकरिता जास्तीत जास्त १४ दिवस लागू शकतात असे सांगितलेले असल्याने २१ दिवसात सर्वच्या सर्व कोरोना रुग्ण नक्कीच सापडतील आणि त्यांना एकदा वेगळे केले आणि बरे केले की संकट टळले असे मानण्यास काहीच हरकत नव्हती. त्यामुळे अनेक सामान्य लोकांनी "स्टे होम, स्टे सेफ" चा नारा देत लॉकडाऊनला बर्‍यापैकी पाठिंबा दिला. पण त्यानंतरही रुग्ण मिळतच राहिले. पुन्हा लॉकडाउन २.० (हा .० का दिला जातो माहीत नाही.. एखाद्या सॉफ्टवेअरच्या मेजर/ मायनर वर्जन असतात म्हणून सॉफ्टवेअर रिलीज करताना २.० वा २.१ , २.२ ई दिले जाते. इथे काय संबंध ? उगाच नक्कल ? की लॉकडाउन ३.० मध्ये पुन्हा नवीन अध्यादेश , सुचना निघाली की - जे रोजच निघत राहते - ते लॉकडाऊन ३.१, ३.२ ई मानावे ? असो.) तर नवीन रुग्ण मिळत राहिल्याने लॉकडाउन पुन्हा पुन्हा वाढवण्यात आले. आणि "तारीख पे तारीख" च्या खेळामुळे लोकांना अंतिमतः "लॉकडाऊन कधी संपणार" याबद्दल काहीच भरवसा उरला नाही. मग अफवांना उत येवू लागला. कुणी म्हणतोय जून पर्यंत चालेल, कुणी म्हणे जुलै वा ऑगस्ट.. शिवाय नवीन रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नव्हते. म्हणजे सरकारने आधी सांगितलेले उद्दिष्ट अजून साध्य झाले नव्हते किंबहूना आधीपेक्षा जास्तच कठीण झाले होते. म्हणजेच तार्किकदृष्ट्या उद्दिष्ट सफल होईपर्यंत लॉकडाउन सुरुच राहणार हाच अर्थ कुणीही घेणार ना ?त्यामुळे लोकांचा संयम सुटू लागला , लोक जमेल त्या पद्धतीने गावी निघालेत. ३) याउलट "कोरोनाची साखळी तोडणे वा कोरोनाला हरवणे" हा लॉकडाऊनचा उद्देश न न ठेवता, लॉकडाउनचा उद्देश कोरोनाला तोंड देण्याकरिता सज्ज होणे आणि अशी सज्जता येईपर्यंत फक्त संकटाला फार मोठे होण्यापासून लांबणीवर टाकणे इतकाच ठेवला असता आणि त्याची योग्य आकडेवारीनीशी माहिती दिली असती तर ते अधिक योग्य झाले असते.म्हणजे असे की "कोरोनाचे संकट आले आहे आणि त्याकरिता वैद्यकीय सुविधा वाढवायच्या आहेत. जसे अमुक इतके हॉस्पिटल्स, अमुक इतक्या व्हेंटिलेटर सुविधा , टेस्टींगच्या अमुक इतक्या सुविधा / केंद्रे निर्माण करायचे आहेत, मास्कची मोठ्याप्रमाणात निर्मिती व वितरण करायचे आहे. तसेच कोरोनाला तोंड देण्यास योग्य असे बदल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत, सरकारी व खासगी कार्यालयांत करायचे आहे आणि हे सर्व होईपर्यंत कोरोनाचे रुग्ण लाखांत असणे खूप धोकादायक होईल म्हणून जास्तीत जास्त अमूक इतके दिवसांचा लॉकडाउन घेतला जाईल." असे उद्दिष्ट ठेवून , तसेच ते अगदी स्पष्टपणे जनतेपर्यंत पोहोचवले असते, व वेळोवेळी ठरवलेल्या उद्दिष्टांची कितपत पुर्तता झाली याचे आकडे लोकांपर्यंत पोहोचवले असते तर लोकांचा धीर कायम राहिला असता. ४)चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी (यात राज्यांचा वा स्थानिक प्रशासनाचाही दोष असेल)- सुरुवातीस सांगण्यात आले की जीवनावश्यक वस्तूंची दुकाने नेहमीप्रमाणे चालू राहतील. आणि खरेच सुरुवातीचे अनेक दिवस किराणा मालची दुकाने नेहमीप्रमाणे चालू असायची. त्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा सामान आणता यायचे. दुकानात गर्दी होत नसे. पण नंतर रेड झोन, कन्टेनमेंट झोन ई ई विभागणी करत दुकानांना वेळा ठरवून देण्यात आल्या. सकाळी १० ते दुपारी २ दुकान चालू. जणू १० ते २ वेळात कोरोना विषाणू झोपलेला असतो काय ?. मग लोक सकाळी १० वाजता दूध वा इतर सामान घेण्यास गर्दी करु लागलेत. संध्याकाळी चपाती ऐवजी ब्रेड खावासा वाटला तर त्याचे नियोजनही सकाळीच करायचे !! आणि म्हणे जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत राहील. तसेच व्हॉट्स अ‍ॅपवर अनेक आदेशांच्या पीडीएफ प्रति फिरु लागल्यात. केंद्र वा राज्य शासनाशिवाय, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त इतकेच काय पोलीस स्टेशनच्या पी आय च्या सहीचेही आदेश फिरु लागलेत. कोणी आदेश काढावेत याचा काही धरबंदच उरला नाही. ५) जीवनावश्यक काय काय असू शकते याचेही भान सरकाराना उरले नाही. पाणी जीवनावश्यक आहे ना मग प्लंबिंगचे सामान मिळते ते हार्डवेअरचे दुकान बंद का ? आणि जीवनावश्यक सामान खरेदी करण्याकरिता वा वैद्यकीय कारणांकरिता खाली उतरावे लागते मग तरीही लिफ्ट दुरुस्ती करणार्‍या तंत्रज्ञांना पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच अनेक उत्पादन कंपन्या बंद असल्याने दुरुस्तीकरिता लागणार्‍या सुट्या भागांची पुरवठा साखळीही विस्कळीत झाली. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक वा वैद्यकीय कारणां करिता वाहने रस्त्यावर फिरत आहेत पण मग वाहने दुरुस्त करणारी व्यवसाये बंद ठेवून कसे चालेल ? वर्क फ्रॉम होम चालू आहे पण इंटरनेटसाठी नवीन सिम, वा मोबाईल घ्यायची वा मोबाईल दुरुस्त करायची वा इतर काही आवश्यक वस्तू घ्यायची गरज पडली तर त्याची सोय नाही ६) सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास देणे- पोलिस साधे मॉर्निंग वॉकला जाणार्‍या नागरिकांनाही त्रास देवू लागलेत. कुठे कुणाला उठाबशा काढायला लाव तर कधी त्यांच्या गळ्यात चित्रविचित्र पाट्या अडकवून त्यांचे फोटो /विडिओ प्रसिध्द केले गेले. पण एक दोघे जण , ते ही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून , मास्क लावून पायी फिरत असतील तर त्याने काय बिघडणार होते ? स्वास्थ्य नीट राखण्याकरिता ते ही गरजेचे आहेच ना ? की लोकांनी मधुमेह, हृदयविकार जडवून घ्यावा ? सगळ्यांनाचा काही घरगुती व्यायाम वा योगासने येत नाहीत ना. ७) या कालावधीचा उपयोग करुन सर्व वाहतूक व्यवस्थामध्ये, वाहतुकीच्या साधनांत (बस , टॅक्सी, ट्रेन ई) वा कार्यालयांत कोरोनासोबत जगण्याकरिता काय आवश्यक बद्दल केले पाहिजेत याच्या सूचना प्रसिद्ध करुन ते बदल करवून घ्यायला हवे होते. पण याबाबत फारशा हालचाली झाल्याच नाहीत ,आता अगदी अलिकडे होवू लागल्यात बहूधा. ८) चार पाच दिवसापुर्वी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी "कोरोनाच्या संकटासोबत जगण्याच्या कलेचा" उल्लेख केला.. हे खरे तर खूप आधी बोलायला हवे होते पण अगदी लॉकडाउन ३ पर्यंत सरकार "कोरोनाला हरवू, साखळी तोडू.. तुम्ही घरी बसा म्हणजे साखळी तुटलीच समजा" असे स्वप्न बघत होते आणि जनतेलाही दाखवत होते आणखीही काही मुद्दे असू शकतील. मी मला सभोवतालि जे दिसलेत ते लिहलेत. ग्रामीण , निमशहरी भागातले, मुद्दे वेगळे असतील. अर्थिक मुद्दे, बेकारी , छोटे व्यावसायिक यांचे मुद्दे आणखी वेगळे. या सगळ्यांबद्दल एखादी लेखमाला होवू शकेल.

In reply to by मराठी कथालेखक

अतिशय मुद्देसुद आणि व्यवस्थित लिहिले आहे. मुळात अजिबात प्लॅनिंग न करता लादलेलं लॉकडाऊन बहुतेक पहिल्या धाग्यापासून आणि लॉकडाऊनपासून हेच सांगत आलोय. आता याही फसलेल्या लॉकडाऊनपासून मजुरांच्या स्थलातंर आणि त्यांच्या जीवघेण्या प्रवास आणि इतर मुद्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पॅकेजचा फॉर्मूला आणला आहे, त्यातही काही नवीन नाही. आता काहीही सांगण्यासारखं आणि सरकारकडे सरकारचं म्हणून ऐकण्यासारखं राहीलेलं नाही हेच खरं आहे. आता लॉकडाऊन ४.०ची वाट पाहणे आहे. नव्या स्वरुपात. (कपाळ मोक्ष करुन घेणारी स्मायली) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता काहीही सांगण्यासारखं आणि सरकारकडे सरकारचं म्हणून ऐकण्यासारखं राहीलेलं नाही हेच खरं आहे
अगदी मार्मिक. सरकारकडे खर्‍या अर्थाने जमिनीवरील परिस्थिती समजून घेवून आणि सांख्यिकी, वैद्यकशास्त्र, समाजशास्त्र , अर्थशास्त्र, व्यवसाय ई विषयातील तज्ञ असून त्यांनी एकत्रितपणे काम करणे अपेक्षित आहे , पण अशा तज्ञांची टीम सरकारकडे आहे का किंवा असली तरी त्यांनी दिलेल्या सल्ल्यांची सरकाराकडे किंमत आहे की नाही याची शंका यावी अशी परिस्थिती आहे. IAS दर्जाचा अधिकारी (त्यातही मर्जीतला असलेला) म्हणजे सर्वज्ञ असा तर सरकारचा समज नाही ना ?

In reply to by मराठी कथालेखक

मराठी कथालेखक, सोशल डिस्टन्सिंग वगळता तुमच्या प्रत्येक मुद्द्याशी सहमत आहे. सुरक्षित अंतराची धडधाकट माणसाला जरुरी नाही. जे करोनाचे पीडित आहेत त्यांना विलग करून ठेवावं म्हणजे इतरांना सुरक्षित अंतर पाळायची गरज उरणार नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हीच तर मेख आहे कोरोनाची. तुम्हाला कसे कळणार कोण कोरोनाचे रुग्ण आहेत ते? asymptomatic रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं नसूनही ते कोरोना पसरवू शकतात. याचाच अर्थ जोपर्यंत १००% लोकांची तपासणी होत नाही तोपर्यंत कोण रुग्ण आणि कोण नाही हे कळणे अशक्य आहे. आता भारतासारख्या देशात १००% चाचणी कितपत शक्य आहे? बरं असं समजू कि सगळ्यांची चाचणी झाली आणि कळलं कि साधारण ९०,००० लोक कोरोनापीडित आहेत. या लोकांना कुठे वेगळं ठेवणार? का यांच्यासाठी निर्वासित लोकांसाठी असतात तश्या छावण्या उभारणार?

In reply to by सोन्या बागलाणकर

सोन्या बागलाणकर, करोनाचे रुग्ण म्हणजे नेमकं काय? करोना अंगात असणे, त्यामुळे बाधित असणे, त्याची सौम्य लक्षणं दिसणे, ती लक्षणं तीव्र बनणे आणि त्यांच्यापायी मृत्यू होणे या पाच स्वतंत्र बाबी आहेत. तर करोनाचा रुग्ण म्हणजे ज्याला करोनाचा त्रास होतो आहे अशी व्यक्ती. सरसकट सगळ्यांची चाचणी करायची नाहीये. कारण की, जर सगळ्यांची चाचणी केली तर करोनासोबत त्याच जातीचे चरोना, फरोना, मरोना, गरोना, ढरोना, टरोना, हेही विषाणू सापडतील. मग प्रत्येक मनुष्यास इतरांपासनं विलग करून ठेवावं लागेल. तेही अमर्याद काळासाठी. कारण की हे विषाणू सतत माणसाच्या शरीरात वास करून राहणारे आहेत. माझा आक्षेप केवळ सरसकट टाळेबंदीसच आहे. बाकी कशासही नाही. टाळेबंदी हे महाथोतांड तगवण्यासाठी करोना नावाची बेडकी प्रमाणाबाहेर फुगवण्यात येते आहे. तर ही फुगवलेली बेडकी हे थोतांड आहे. नैसर्गिक स्थितीतली बेडकी हे थोतांड नव्हे, ती सत्यांश आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by मराठी कथालेखक

मराठी कथालेखक आपण मांडलेले मुद्दे योग्य आहेत शंका नाही पण काही मुद्दे मात्र खटकले -साधे मॉर्निंग वॉकला जाणार्‍या नागरिकांनाही त्रास देवू लागलेत" अहो जर घरबंदी आहे तर असे बाहेर जाण्याचा प्रश येतो कुठे ? -संध्याकाळी चपाती ऐवजी ब्रेड खावासा वाटला तर त्याचे नियोजनही सकाळीच करायचे ! नका खाऊ मग .. भागवा कि चपाती त , हा कसला हट्ट -ठरवलेल्या उद्दिष्टांची कितपत पुर्तता झाली याचे आकडे लोकांपर्यंत पोहोचवले असते यासाठी जनतेची पण मदत लागते ना.. डेटा गोळा कार्याला गेलं (रेल्वे ऍप) तर लगेच मानव अधिकार वाले बोंब मारणार ) -पण ५५० वरुन ७८ हजारांवर केसेस मिळाल्यात मग साखळी तोडण्याचे उद्दिष्ट पुर्ण झाले का ? अहो एवढया मोठया देशात आणि इतरांत हि जर आलेख पाहिलात तर सुरवातीला अशीच वाढ होत होती // खाली फ्लॅटनिंग कर्व बद्दल चे वाचा. तुम्ही मधेच असा आलेख थांबवला तर चित्र वाईट दिसणारच -जास्तीत जास्त १४ दिवस लागू शकतात असे सांगितलेले असल्याने २१ दिवसात सर्वच्या सर्व कोरोना रुग्ण नक्कीच सापडतील आणि त्यांना एकदा वेगळे केले आणि बरे केले की संकट टळले असे मानण्यास काहीच हरकत नव्हती हि तुमची समजूत..जगातील इतर सरकार असे कोणीच म्हणते नव्हेत किंवा समजत नवहते .. येथेही सरकारने ४ आठवडे बंदी घोषित केली तेव्हा असे ना सरकार म्हणले कि ४ आठवड्यात हे संपणार आहे ना जनतेने तसे मानले.. " प्रयत्नांत पहिला भाग " असेच सगळे बघत आहेत सरकार कडे काय जादूची कांडी आहे का? काय वाटेल त्या अपेक्षा आणि समजूत ठेव्याची आणि मग खडे फोडायचे या जगभरच्या अतिशय अवघड परिस्थिती सध्या भारतात आणि अमेरिकेतील काही राज्यात या सर्व बांधांना जो सरसकट विरोध चालू दिसतोय त्यात हे सर्व टीकाकार फक्त प्रश्न उभे करीत आहेत उत्तरे त्यांचं कडेही नाहीत आणि काहीजण तर केवळ विरोधाला विरोध करीत आहेत , (जणू काही दुसऱ्या पक्षाचे सरकार असते तर सगळे २१ दिवसात आलबेल झाले असते ) काही मुद्दे पूर्ण विसरले जात आहेत - अंतर ठेवून रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येईल / पसरण्याचा वेग कमी करता येईल ( फ्लॅटनानिंग द कर्व) - हे केल्याने आरोग्य व्यस्थेला एकदम ताण येणार नाही - हे करीत असतं पूर्णतः व्यवस्थवार अघोरी परिणाम होणार हे सगळ्यानं माहित होते कोणाला माहित नवहते असे नाही - यौद्धात जसा सेनापती रचना करतांना आपले कमीत क्कमी सैनिक आणि साधन मारले जातील असे नियोजन करण्याचा प्रयत्न करतो असेच आहे हा ( निर्दय वाटेल पण करणार काय? - नियंत्रण करताना इंग्लड आणि अमेरिकेसारखी यंत्रणा पण कमी पडली तर भारतासारख्या अजस्त्र देशात ते किती अवघड आहे याचा विचार करा सोशल डिस्टंसिन्ग वैगरे उपायांचा इतर देशात निश्चितच फायदा झाला आहे आणि ते करताना कधी चुका हि झाल्या आहेत , सगळेच जण शिकत आहेत त्यामुळे या उद्या सगळ्यांनी साथ देऊन लढणे क्रमप्राप्त आहे , मिळाली संधी कि कर टीका हे उबग आणताय .. पण असलं काही घडणार नाही असा दिसतंय .. याचा राजकारण , स्वार्थकारण चालणार आता पुढील घोषणांची वाट पाहतोय.. - हि जमावबंदी / घरबंदी केलीच नसती तर काय फरक पडला नास्ता , यात सी आय ए / आय एम एफ चा हात असणार , विकसित देशांची आर्थिक व्यस्था दुबळी करणे हा हेतू वैगरे ) - बारामती जाणते राजे असते तर यांनी हे सगळं घडूच दिला नसते - हा संघाचा डाव आहे ..(हाःहाःहा ) असो .. तर मी असे म्हणत नाही कि सरकारचे काहीच चुकले नाही .. नियोजन चुकले असणारच काही ठिकाणी ( जे तुम्ही काही मुद्यातून दाखवले आहेत ) यावरून अजून एक आठवले: इतिहासाची नोंद करण्याची इन्वेस्टिगेटिव्ह जर्नालिसम प्रथा ( म्हणजे गंभीर सनसनाटी नाही ) भारतात फारशी नसल्याने या काळात सरकारी/ विरोधी/ आणि शासकीय अधिकारी यांनी काय काय केले त्यावर काही माहितीपट यायची शक्यता दिसत नाही... इतर देशात असे माहितीपट बनवणे चालूही झाले/ जेणेकरून जनतेला काय घडले कसे घडले याचं दोन्ही बाजू दिसू शकतील..

In reply to by चौकस२१२

चौकसजी , धन्यवाद. तुमच्या प्रतिसादातल्या सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर मी आधी येतो.
(जणू काही दुसऱ्या पक्षाचे सरकार असते तर सगळे २१ दिवसात आलबेल झाले असते )
बाकीच्यांचे माहित नाही पण माझी तरी अशी भूमिका नक्कीच नाही. आणि इथे मी चुकीच्या धोरण व निर्णयांचा विरोध करत आहे. सरकार कोणत्या प़़क्षाचे त्याला महत्व नाही. तसेही राज्यात व केंद्रात वेगवेगळे पक्ष आहेत पण माझा दोन्हींना समान विरोध आहे. आता काही मुद्दे (सर्वच मुद्द्यांवर आता लिहिणं वेळेअभावी शक्य होणार नाही)
-साधे मॉर्निंग वॉकला जाणार्‍या नागरिकांनाही त्रास देवू लागलेत" अहो जर घरबंदी आहे तर असे बाहेर जाण्याचा प्रश येतो कुठे ?
याबद्दल मी आधीच म्हंटलं आहे. पुन्हा तेच लिहितो. स्वास्थ्य नीट राखण्याकरिता ते ही गरजेचे आहेच ना ? की लोकांनी मधुमेह, हृदयविकार जडवून घ्यावा ? सगळ्यांनाचा काही घरगुती व्यायाम वा योगासने येत नाहीत ना.
-संध्याकाळी चपाती ऐवजी ब्रेड खावासा वाटला तर त्याचे नियोजनही सकाळीच करायचे ! नका खाऊ मग .. भागवा कि चपाती त , हा कसला हट्ट
कुणी काय खावे हे पण सरकारने ठरवावे का ? (चित्रपटगृह किंवा बगीचे चालू करा असा हट्ट कुणी करत नाहीये , पण अन्न ही प्राथमिक गरज आहे ना )बर ते पण एक दोन दिवस नाही. आमच्याकडे जवळपास महिनाभरापासून दुकानांना वेळ ठरवून दिली आहे. सध्या फक्त १० ते १२. मग या वेळेत जास्त गर्दी होते आणि सोशल डिस्टन्सींग धोक्यात येते त्याचे काय ?
अहो एवढया मोठया देशात आणि इतरांत हि जर आलेख पाहिलात तर सुरवातीला अशीच वाढ होत होती // खाली फ्लॅटनिंग कर्व बद्दल चे वाचा. तुम्ही मधेच असा आलेख थांबवला तर चित्र वाईट दिसणारच
हो ना. पण मग लॉकडाउनचे नेमके उद्दिष्ट काय होते ? तुमच्या मते काय होते ते तुम्ही सांगा मग पुढची चर्चा करता येईल. लॉकडाऊन नकोच असे मी म्हणत नाही पण मग लॉकडाऊन "का (नेमके उद्दिष्ट), किती (किती दिवसांकरिता) व कसे (नेमक्या कोणत्या गोष्टींना परवानगी द्यायची व कोणत्या गोष्टींना नाही, आवश्यक गोष्टींकरिता पर्यायी वितरण व्यवस्था काय ? - "उगाच मिळेल ते खा" असा पवित्रा योग्य नाही) हे लॉकडाऊन चालू करण्यापुर्वीच स्पष्ट करायला हवे होते, त्यातही किती दिवस हा सर्वात कळीचा मुद्दा. आधी सांगितल्याप्रमाणे इथे "तारीख पे तारीख" चा खेळ नडला आणि अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली.

In reply to by मराठी कथालेखक

मराठी कथालेखक सर्वप्रथम अगदी मुद्याला ला मुदा स्पष्ट मत मांडलेत त्यामुळे चांगले वाटले १) इथे मी चुकीच्या धोरण व निर्णयांचा विरोध करत आहे.. भावना पोचल्या फक्त हा विरोध करितां काही जण ( कदाचित तुम्ही नसाल) एक नकारात्मक सूर लावतात त्या मुले जरा उद्वेगाने मी लिहिले २) सगळ्यांनाचा काही घरगुती व्यायाम वा योगासने येत नाहीत ना. हो पण घरातल्या घरात चालत येते .. निदान साधारण मध्यमवर्गीयाला तरी ,, अगदी छोट्या घरातील माणसांना त्रास आहे हे खार येआहे पण मग सगळ्यांनाच बाहेर पडायची परवानगी दिली तर एकतर अंतर पाळणार नाहीत किंवा पाळण्याची इच्छा असली तरी जग असेल का , आणि दुसरे कोणाला आणि कोणत्याकारणासाठी बाहेर परवानगी द्यायची हे हि एक कोडे म्हणजे एकूणच प्रशासनाची पंचाईत नाही का? ३)कुणी काय खावे हे पण सरकारने ठरवावे का ? अहो तसं कोण म्हणताय मी जेव्हा म्हणले कि "भागवा कि चपाती त " या मागे हेतू हा होता कि अडचणीचं परिस्थिती जुळवून घ्या किदोन्ही वेळा लागली चपाती खायला तर काय बिघडल? .. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात कि "संध्याकाळी चपाती ऐवजी ब्रेड खावासा वाटला तर त्याचे नियोजनही सकाळीच करायचे !" हे जरा समाजाचं लाडवलेलीपणाचे वाटले... मी उयेथील उदाहरण देतो... किरण मालाची दुकाने इथे बंद झाली नवहती आणि ताजा भाजी पाला मिळताच होता पण धोका कमी करण्यासाठी आम्ही थोडे दिवस ताज्याऐवजी फ्रोझन भाजी खायची ठरवली नाही मिळाली २० दिवस अगदी ताजी तर काय आकाश कोसळत नवहते ... हा साधं वसिहर ४)लॉकडाउनचे नेमके उद्दिष्ट काय होते "का (नेमके उद्दिष्ट), सांगतो ( यात मी तद्न्य नाही पण या देशात ज्या सुसूत्रित पद्धतीने या प्रश्नाचा विचार . अभयास आणि टीका केली जात आहे आणि इतर देशातील बातमय सनसनाटी ना करीत त्याचे दाखले दिले जात आहेत त्या अनुभवावरून मांडतो) रोगावर लस यायला आणि उपाय सापडायला वेळ लागणार हे कल्यामुळे प्रशासनाला दोन तीन गोष्टी कराव्या लागलाय - प्रसार थांबवण्यासाठी बाहेरील देशातून येणाऱ्यांना थांबवणे ( येथे प्रथम चीन मग इराण, इटली आणि नंतर अमेरिका आणि मग सर्वच देशातून येणार्यांन्वर बंदी आणली ) - स्थानिक प्रसार कमी करणे कि जेणेकरून जो काही प्रसार होणार आहे तो हळू वेगाने तरी होईल ( आलेख सपाट करणे ) आणि त्यामुळे आहे त्या वैद्यकीय सेवांना ताण सहन करत येईल... हाच सर्वात मोठा मुद्दा आहे . अर्थात याचे पूर्वनियोजन अनेक देशात हुकले अगदी इंग्लड आणि अमेरिकेत सुद्धा आणि भारतात पण.. अहो पण जरा विचार करा कि केवढा मोठा प्रश्न आहे .. लोक जेवहा भांडी का वाजवली असले फुकाचे वाद घालतात तेव्हा काय म्हणायचे? आज माझ्य देशात जगातील सर्वात उत्तम प्रकारे हे हाताळले जातंय , तिथे सुद्धा लोकांनी एका सकाळी दिवे लावले (अँझाक दिवस ) त्यावर लोंकानी असले फुकंचे वाद घातले नाहीत असो यावर बरीच चर्चा झाली आहे किती (किती दिवसांकरिता) हे ब्रह्मदेवाचं बापाला तरी जमले असत का हो? सांगायला सर्वच टप्य्याटप्य्याने झाले आणि आता टप्याय टप्य्या ने परत सुरळीत पणा कसा आणायचा यांच्यात सर्व सरकारे कामात आहेत , घोळ झाले ना ..इथे सुद्धा काही हास्यास्पद निर्णय घेतले गेले आणि घोळ भारतासारखाय देशात तर ना झाले तर नवलच .. त्यामुळे "किती" याला कोण उत्तर denar. कसे (नेमक्या कोणत्या गोष्टींना परवानगी द्यायची व कोणत्या गोष्टींना नाही, प्रथम स्वास्थ्य , आणि ते टिकवण्यासाठी सगळे आणि हळू हळू अर्थ व्यस्था हे समीकरण सगळे जण वापरायचा प्रयत्न करीत आहेत "तारीख पे तारीख": हे काय कोणी मुद्डमून केलाय का? आपण जगातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षच्या जागी असतो तर काय केला असता याचाच पण टिक करण्याआधी विचार करावं मी तर विचार करण्याआधी एक दाभण आणि सुतळी घेऊन बसलो .. असो चेष्टा सोडून देऊ टीका आणि मूल्यमापन हे सर्वच करणार.. पण त्यात प्रत्येक प्रश्न कसा सहज सोडवता आलं असता असा विचार करू नये हीच विनंती दुर्दैवाने जनता लागेचच त्याचे राजकारण करावयाचे मग तो भारतातील मोदी विरोध असो किंवा अमेरिकेतील ट्रम्प यांचा आंधळे पणा असो ( च्यामारी ह्या कारोंना ने मला ( म्हणजे ट्रम्पला ) ला समाजवादी बनवले कि काय? म्हणुत ट्रम्प तात्या डोकं धरून बसलेला दिसतोय अन मग काहीही बरळतोय..असो काळजी घ्या ..

In reply to by चौकस२१२

हे जरा समाजाचं लाडवलेलीपणाचे वाटले
लाडावलेपणा कसला ? अन्न ही प्राथमिक गरज आहे. आणि आम्ही आमच्या पैशांनीच विकत घेतोय काय सरकारला फुकट द्यायला नाही सांगत.
आम्ही थोडे दिवस ताज्याऐवजी फ्रोझन भाजी खायची ठरवली
तुम्ही काय खायचे तो तुमचा प्रश्न आहे. आणि इतरांनी काय खावे हा त्यांचा प्रश्न आहे.
त्यामुळे "किती" याला कोण उत्तर denar.
पण त्यामुळे अनिश्चितता वाढली, अनेक लोक (खासकरुन मजूर) मिळेल त्या प्रकारे प्रवासाला निघालेत.
- स्थानिक प्रसार कमी करणे कि जेणेकरून जो काही प्रसार होणार आहे तो हळू वेगाने तरी होईल
जर हे उद्दिष्ट असेल तर ते अजून साध्य झालेलं नाहीच. उलट आणखी दूर गेलंय. आधी म्हणजे मार्चमध्ये रोज रुगण सापडण्याचे प्रमाण दोन वा तीन अंकी आकड्यात होते ते आता चार अंकी झाले. मग जर हे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत लॉकडाऊन चालू ठेवायचे असेल तर कदाचित आणखी सहा महिनेही लॉकडाऊन ठेवावे लागेल. जमणार आहे का ते ? म्हणजेच जे उद्दिष्ट ठरवले वा सांगितले गेले ते चुकीचे होते. मी आधी सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय सुविधा वाढवणे आणि कोरोनाच्या संकटास तोंड देण्याकरिता सज्ज होणे हे उद्दिष्ट असायला हवे होते.
अर्थात याचे पूर्वनियोजन अनेक देशात हुकले अगदी इंग्लड आणि अमेरिकेत सुद्धा
आपण नेहमी अपयशी लोकांचेच दाखले द्यायला हवे असे नाही. द. कोरिया, तैवान यांकडेही बघता येईल. आता तुम्ही म्हणत असाल की ते देश लहान आहेत आणि भारत मोठा आहे तर त्या म्हणण्याला काही अर्थ नाही. देश मोठा असला तर त्याच्या यंत्राणाही त्याच प्रमाणात मोठ्या असणार ना.

In reply to by मराठी कथालेखक

हे जरा समाजाचं लाडवलेलीपणाचे वाटले लाडावलेपणा कसला ? अन्न ही प्राथमिक गरज आहे. आणि आम्ही आमच्या पैशांनीच विकत घेतोय काय सरकारला फुकट द्यायला नाही सांगत. अहो तुम्हाला एक साधा मुद्दा कळत नाही का .. रोज ताजे नसेल मिळत किंवा एक वेळा पाव आणि एक वेळा चपाती नसेल जमत आणि आणीबाणी ची परिस्थिती असेल तर आहे त्यात सामावून घेणे हा साधा समाज नियम आहे त्यात सरकार काय सक्ती करताय..? फोरझन भाजी चे उदाहरण णहणून दिले फक्त माहित आहे कि भारतात रोज ताजी भाजी खायची सवय आहे आणि ते चांगलेच आहे पण अश्या परिस्थिती जर नाही खाता आली तर काय एवढा आकाश कोसळला का?

In reply to by चौकस२१२

आणीबाणी ची परिस्थिती असेल तर आहे त्यात सामावून घेणे हा साधा समाज नियम आहे त्यात सरकार काय सक्ती करताय..?
कसली आणीबाणी ? सरकार म्हणतंय म्हणून केवळ विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं आणीबाणी ? आणि कोरोनाचा धोका आणखी कित्येक महिने राहिल मग काय कित्येक महिने आणीबाणी आहे असं म्हणतच जगायचं ? .

अगदी मुद्देसूद लिहिले आहे . आता तुम्हाला एकच प्रश्न विचारला जाईल, सरकारला स्वप्न पडले होते का असे काही घडेल ह्याचे?

पण सोशल वा फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे असे मात्र मला वाटते. कारण जर एक दीड मिटरचे अंतर ठेवून आणि मास्क लावून जर रोगापासून दूर राहता येणे शक्य असेल तर रहावे. आणि त्याकरिता फार काही खर्च वा मेहनतही नाही.>>>>>>>>>>>>>> कोणीच हे पळत नाहीये म्हणून lockdown जीवनावश्यक काय काय असू शकते याचेही भान सरकाराना उरले नाही. पाणी जीवनावश्यक आहे ना मग प्लंबिंगचे सामान मिळते ते हार्डवेअरचे दुकान बंद का ? आणि जीवनावश्यक सामान खरेदी करण्याकरिता वा वैद्यकीय कारणांकरिता खाली उतरावे लागते मग तरीही लिफ्ट दुरुस्ती करणार्‍या तंत्रज्ञांना पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच अनेक उत्पादन कंपन्या बंद असल्याने दुरुस्तीकरिता लागणार्‍या सुट्या भागांची पुरवठा साखळीही विस्कळीत झाली. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक वा वैद्यकीय कारणां करिता वाहने रस्त्यावर फिरत आहेत पण मग वाहने दुरुस्त करणारी व्यवसाये बंद ठेवून कसे चालेल ? वर्क फ्रॉम होम चालू आहे पण इंटरनेटसाठी नवीन सिम, वा मोबाईल घ्यायची वा मोबाईल दुरुस्त करायची वा इतर काही आवश्यक वस्तू घ्यायची गरज पडली तर त्याची सोय नाही>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>सहमत आत्ता कशातच काही अर्थ वाटत नाहीये सरकारने ज्याला त्याला नशिबावर आणि रामभरोसे सोडून द्यावे सरळ एवढे lockdown करून सुद्धा रुग्ण वाढत आहेत नियम न पाळणाऱ्या लोकांमुळे त्याच्यापेक्षा Lockdown उठवून ज्याला त्याला त्याच्या नशिबावर सोडून द्यावे

In reply to by Prajakta२१

कोणीच हे पळत नाहीये म्हणून lockdown
हे सगळ्यांसाठी पुर्णतः नवीन होतं. त्यामुळे काल सांगितलं आणि आज पाळलं जाईल असं नसतं. त्यातून त्यात सरकारी सूचनांत घोळ होता. मार्चच्या किमान २० तारखेपर्यंत तरी म्हणत होते की सगळ्यांनी मास्क लावणे गरजेचे नाही. आणि कोणीच पाळत नाही असे नाही. पण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार दहा हजार लोकसंख्या असलेल्या भागात (शहरी भागतला एक रस्ता ज्याच्या दुतर्फा काही १०-१२ मजली निवासी इमारती आहेत त्या भागाची लोकसंख्या सहज दहा हजार असू शकेल) जर २% लोकांनी नियम पाळला नाही तरी ते २०० लोक होतील.

In reply to by Prajakta२१

एवढे lockdown करून सुद्धा रुग्ण वाढत आहेत नियम न पाळणाऱ्या लोकांमुळे त्याच्यापेक्षा Lockdown उठवून ज्याला त्याला त्याच्या नशिबावर सोडून द्यावे लोकांच्या बेशिस्तपणा मुळे आपल्याला वैफल्य येते. हा प्रतिसाद त्या वैफल्यातून आला आहे असेच मी समजतो आणि तो बरोबरही आहे. यासाठी अध्यात्म फार महत्त्वाचे ठरते. "कर्मण्येवाधीकारस्ते मा फलेषु कदाचन " असे लोक आजारी पडून वैद्यकीय सेवेसाठी आले तर वैद्यकीय सेवकांनी काय करायचं? त्यांच्यावर उपचार करायचा कि रस्त्यावर मरायला सोडून द्यायचे? उपचार करणार नाही हे म्हणणे शक्य नाही. मग अशांच्या मुळे आरोग्य कर्मचारी आजारी पडले तर त्यांनी काय करायचं? मी एक दिवस सोडला तर पूर्ण २ महिने माझा दवाखाना चालू ठेवला आहे. मी हा धोका पत्करायला तयार आहे. पण माझे वृद्ध आई वडील (८४ आणि ७८ वय) त्यांना मधुमेह रक्तदाब आहे. वडिलांना फुफुसाचा आजार आहे आई कर्करोगातून बाहेर आली तरी अनेक तर्हेच्या जंतुसंसर्गातून अजून पूर्ण बाहेर आलेली नाही. तिला रोज इंजेक्शन द्यायला जावे लागते. त्यांना माझ्यामुळे हा रोग झाला तर? तशीच स्थिती माझी स्वागत सहाय्यिका हिची आहे तिची आई पण ७५ वर्षाची आहे. माझ्या धाडसाची किंमत तिने किंवा तिच्या कुटुंबाने मोजावी का? माझ्याजवळ याचे उत्तर नाही. माझ्याजवळ मला आयुष्याला पुरेल एवढा पैसा नक्की आहे किंवा आजही वैद्यकीय व्यवसाय सोडून देउन मला वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या क्लास मध्ये शिकवणे सहज शक्य आहे जेथे रुग्णांशी संपर्क येणार नाही. तेथे मला सहा आकडी पगार मिळेल. ( कारण माझ्याकडे सज्जड अशा संस्थेतील द्विपदवी आहे आणिहे काम मी अगोदर केलेलले आहे तेंव्हा मला चांगले शिकवता हि येते) परंतु व्यवसाय सोडून ते करायचे ठरवले तरी मी आता या जागतिक साथीत पळून जाणार नाही एवढे नक्की. शेवटी माणसाला वैफल्य येते. बेजबाबदार लोकांच्या बेशिस्तपणाची चीडहि येते म्हणून आपले कर्म सोडून जाणे हे बरोबर नाही.

In reply to by सुबोध खरे

म्हणून आपले कर्म सोडून जाणे हे बरोबर नाही. अगदी बरोबर बोललात डॉक्टर साहेब...आणि त्या कर्माचा एक भाग म्हणजे "फुकाची टीका ना करणे" जगात जे प्रश्न आहेत ते भारतात आहेत, काही जास्त काही कमी ..सगळ्यांनाच तोंड द्ययचंय

> "सुरक्षित अंतराची धडधाकट माणसाला जरुरी नाही." प्रॉब्लेम असा आहे की धडधाकट माणुस हा कॅरीयर असु शकतो, व तो हा विषाणु शेकडो माणसांपर्यंत पसरउ शकतो. असा कॅरीयर सहजा सहजी ओळखु येत नसल्यामुळे सर्वांनीच सुरक्षित अंतर पाळण्याची गरज निर्माण झाली आहे. अमेरीकेत सुरवातीपासुन सोशल डीस्टंसींग कंपल्सरी नसल्यामुळे आहे ८५ हजार लोक करोना होउन मेले आहेत. (यात ईतर कारणांमुळे मेलेल्या लोकांचा सामावेश नाही). अजुनही इकडे सोशल डीस्टंसींग न पाळणार्‍याला काही शिक्षा वगैरे नाही, त्या मुळे हा आकडा वाढतच जाणार. सप्टेंबर पर्यंत ईकडे साधारण दीड ते दोन लाख लोक करोनाने मरायची शक्यता आहे. त्यामानाने भारतात बरीच चांगली परीस्थिती दीसते.

In reply to by चौकस२१२

नेत्रेश सहमत ... सो.डि महत्वाचे आहेच. आदयावत सुविधा आणि कमी लोकसंख्या असुनही इकडे ईंग्लंडात ज्या तर्हेने कोरोना फैलावलाय त्या द्रुष्टीने भारतात सरकारने खुप अगोदर काळजी घ्यायला सुरुवात केली. विचार करा जर भारताने लॉकडाऊन उशीरा जाहीर केला असता तर सध्या जी लोकं सरकारच्या नावाने आता ठणाठणा करत आहेत त्याच लोकांनी परत सरकारला उशीरा लॉकडाऊन जाहीर करण्याबद्द्ल शिव्या घालायला कमी जास्त केले नसते.

In reply to by नेत्रेश

नेत्रेश, ते ८५००० करोनामुळे मेलेले आहेत हे कशावरून? ते करोना अंगात असतांना मेले आहेत. करोनामुळे मेलेत हे कोणी ठरवलं? उगीच कोणीही मेला तर तो करोनामुळे असे छाप मारले गेले आहेत. या मृत्यूंत करोनाचं योगदान नगण्य आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ते मेलेले सर्वच्या सर्व करोना पॉझिटीव्ह होते. मी काही डॉक्टर नाही, पण मला समजलेले ईथे मांडतो: प्रत्येक माणुस वेगळा, त्याची प्रतिकारशक्ती वेगळी, शरीराची बाह्य गोष्टींना प्रतीकार करण्याची पद्धत वेगळी - त्यामुळे एखाद्याला काही गोष्टींची अ‍ॅलर्जी असते, काहींना नसते. करोनाला प्रत्येकाचे शरीर थोडा वेगळा प्रतिसाद देते. साधारण ५०% लोकांना फारसा त्रास होत नाही, ४०% लोकांना जाणवण्या ईतपत त्रास होतो, पण १०% लोकांना टोकाचा त्रास होतो. त्यांचे शरीर खुप ऑव्हर रीआक्ट करते. आणी शरीराची प्रतिकारशक्तीच शरीरातील पेशींचा नाश करते. अशा प्रकारामुळे हॉस्पिटलमध्ये मेलेले लोक ओळखणे सहज शक्य आहे. आणी ते मृत्यु करोनामुळे झाले असे गणले जाते. करोनामुळे मेलेल्या लोकांमध्ये बाकी काही त्रास नसलेल्या निरोगी व्यक्ती, बालके, आणी व्याधीग्रस्त असे सर्व लोक येतात. करोना होउन विशेष त्रास न होता बरे झालेल्या बालकांमध्ये नंतर दुसर्‍या प्रकारचे (आधी न आढळलेले) रोगही दीसु लागले आहेत. त्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सर्वांच्या सुरक्षेसाठी करोनाला दुर ठेवणे चांगले - अगदी आपले स्वतःचे शरीर करोनाला सहज हरऊ शकेल असा आत्मविश्वास असला तरीही! टिपः अत्ताचा अमेरीकेतला करोनाने झालेल्या मृत्युचा आकडा 88,507 असुन जगभरात 3,08,610 लोक करोनाने मेले आहेत.

In reply to by नेत्रेश

पण १०% लोकांना टोकाचा त्रास होतो. त्यांचे शरीर खुप ऑव्हर रीआक्ट करते. आणी शरीराची प्रतिकारशक्तीच शरीरातील पेशींचा नाश करते. आटो इम्युनिटी व बाह्य लागण या दोन्ही गोष्टी माझ्या वाचनानुसार एकमेकाशी सम्बन्धित नाहीत. अक्वायर्ड व कॉन्स्टीटुशनल असे आघाताचे दोन प्रकार असतात असे मी वाचलेय .तुम्ही हे विधान कसे केले ? त्याचा एखादा सन्दर्भ दिला तर बरे होईल. एरवी मिपावर चे डॉ मन्डळी यावर अधिक प्रकाश टाकू शकतीलच !

In reply to by चौकटराजा

https://www.bbc.com/news/health-51214864 थोडे स्क्रोल डाउन करा - Severe disease If the disease progresses it will be due to the immune system overreacting to the virus. Those chemical signals to the rest of the body cause inflammation, but this needs to be delicately balanced. Too much inflammation can cause collateral damage throughout the body. "The virus is triggering an imbalance in the immune response, there's too much inflammation, how it is doing this we don't know," said Dr Nathalie MacDermott, from King's College London.

In reply to by नेत्रेश

आमचा डॉक्टर म्हणतो की तु लो रीस्क आहे, कदाचित करोना झाला तरी फार त्रास होणार नाही. पण तो पसरवण्याला नक्की हातभार लावशील. तेव्हा गप्प घरी बस.

In reply to by चौकस२१२

माझे वरील विधान जी लोक "या मृत्यूंत करोनाचं योगदान नगण्य आहे" अशी उचलली जीभ लावली टाळ्याला करीत आहेत त्यानं उद्देशून होते . नेत्रेश यांनी उद्देशून नाही ( खुलासा )

लोकहो, मोदींची बिल गेट्स सोबत चर्चा : https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-narendra-modi-video-confer… चर्चा करायला बिल गेट्स काय थोर माणूस लागून गेलाय? हा फ्लंकी इसम आहे. पोलीयोच्या लशीकरणाच्या कार्यक्रमातनं अनुचित प्रभावाच्या शंकेपायी याच्या विश्वस्तनिधीस बाहेर काढलेलं ना मोदी सरकारने? मग आता नेमकी काय जादू झाली की मोदींना याच्याशी परत चर्चा करावीशी वाटते? गेट्स फाऊंडेशनचे व्यवहार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. हा करोनाचा भारतावर झालेला एक महाभयंकर साईड इफेक्ट आहे. आ.न., -गा.पै.

हि १५ एप्रिलची स्थिती होती. https://www.thehindu.com/news/national/coronavirus-without-lockdown-india-would-have-seen-over-8-lakh-cases-by-april-15-says-health-ministry/article31319364.ece Where India stands (१ मे) India has a population of 1.3 billion and a death rate of about 7 per thousand per year, as of 2019. This means that each day, on average, about 26,000 people die in India. As of last week, roughly 60 people a day are believed to be dying of Covid-19. Unless this number is off by two orders of magnitude, the new virus has not yet significantly altered mortality in India. Indeed, during the lockdown, net mortality appears to have gone down due to the decline in accidents. https://theprint.in/opinion/can-india-risk-a-controlled-epidemic-after-… retrospectively every one is wise and right

संचारबंदी आणि टाळेबंदीमुळे अनेकांचे दैनंदिन व्यवहार, रोजगार बंद पडले आहेत. हातावर पोट असणार्‍यांना हालाखीचे दिवस आले आहेत. हे पाहून हळहळ वाटतेच. काही देशांत सरकारतर्फे मासिक पगाराच्या ८०% भत्ता मिळतोय तसं त्यांनाही मिळावं असं एक वाटतं पण लगेच जाणीव होते की सरकारने मदत दिली तरी आपल्याकडचे 'बाबू' लोकच त्यांच्या घशात घालतील. गरीब बिचारा भुकेलाच राहील. हे सगळं खरं असलं तरी सुस्थितीतल्या मध्यमवर्गीय आणि घरून काम चालू असणार्‍या लोकांना घरात अडकून रहायला लागल्याने ते वैतागले आहेत. दर आठवड्याला कुटुंब/मित्रमैत्रिणींसोबत भेटणे, फिरणे बंद झाल्याने लोक उदास झाले आहेत. तसेच संचारबंदी कधी संपणार या बद्दलच्या अनिश्चिततेमुळे त्यांचे मन भरकटलेले आहे. शिवाय प्रसारमाध्यमांनी घातलेली करोनाची 'अतिरिक्त' भीती आहेच. या सगळ्याचा परिणाम म्हणून लोकांना सगळंच थोतांड वाटायला लागलंय आणि हा त्रागा समजण्यासारखा आहे. थोडा जरी भारताबाहेरच्या आणि नेहमी म्हणावल्या जाणार्‍या 'विकसित' देशातल्या घडामोडींचा आढावा घेतला तरी लक्षात येईल की करोना आणि त्याच्या अनुशंगाने आलेल्या संचारबंदीने गांजलेला भारत हा एकमेव देश नाही. मार्चच्या सुरुवातीला अनेक देशांत पहिले 'हर्ड इम्युनिटी' वाढवून संचारबंदी टाळण्याचा प्रयत्न झाला पण ते फार काळ जमलं नाही. जे देश अर्थव्यवस्थेकरता संचारबंदी टाळत होते त्यांनी काही दिवसांत 'बेमुदत' संचारबंदी लागू केली. त्याने करोनाचा संपूर्ण नायनाट होणार नाही हे तर सगळ्यांनाच माहिती होतं, फक्त आलेख सपाट करणं हाच एक उद्देश होता. तसे केले नसते तर 'महामारी'सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असती. शिंक/खोकल्यातून उडणार्‍या तुषारांतून पसरणारा आजार भारतासारख्या दाट लोकसंख्या असलेल्या देशात किती वेगात आणि किती प्रमाणात पसरला असता याची आपण कल्पना करू शकतो. आपापल्या देशातल्या लोकांचे मनोबल कायम राखण्याचा आणि टप्प्या-टप्प्याने का होईना पण व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्रप्रमुख करतोय. सगळ्यांना जनतेचा रोष सहन करावा लागतोय कारण नक्की काय करावं हे कोणालाच माहिती नाही. कमीतकमी जिवीतहानी होवू देवून व्यवहार सुरळीत करणे ही तारेवरची कसरत आहे, इकडे आड तर तिकडे विहीर आहे. अजूनपर्यंत तरी कोणत्याही देशाला यात मार्ग सापडल्याचं वाचलं/पाहिलं नाही. एवढं सगळं लिहिण्याचं कारण एवढंच की भारतात आपण फार चुकीच्या निर्णयांचे बळी आहोत आणि बाहेरच्या जगात नंदनवन आहे असं अजिबात नाही. जे निर्णय जगभरात राबवले जात आहेत तेच भारतातही आहेत. सध्यातरी आशावादी राहून सरकारच्या सूचना पाळणे आणि आपापले कर्म करत राहणे हेच आपल्या हातात आहे.

In reply to by स्मिता.

अजूनपर्यंत तरी कोणत्याही देशाला यात मार्ग सापडल्याचं वाचलं/पाहिलं नाही.
तुम्ही द. कोरिया आणि तैवानबद्दल वाचलं नाही असंच दिसतंय.

In reply to by मराठी कथालेखक

भारतासारख्या खंडप्राय देशाची आणी बाकी लहान देशांची तुलना होउ शकत नाही. तुलना कराचीच तर चीनशी करावी लागेल. त्यांनी तेथे जे उपाय केले, आणी ज्या प्रकारे राबवले, ते भारतात करता येणार आहेत का?

In reply to by नेत्रेश

देश लहान की मोठा त्याने काय फरक पडतो ? तुलना होवू शकत नाहिच असं ठरवूनच ठेवलं तर मग काय बोलणार ? आणि चीनशी तुलना करायला हरकत नाही. पण चीनने सगळं सत्य समोर आणलं आहे याची खात्री आहे का तुम्हाला ? चीनमध्ये फ्क्त वुहान प्रांतातच विषाणू जास्त पसरला, बाकी प्रातांत फारसा नाहिच , हे कसे ? लॉकडाऊनही बहुतांशी वुहानमध्येच झाले. उर्वरित देश विषाणू पासून आलिप्त कसा राहिला ? की कोणती एखादी लस होती जी देशाच्या इतर भागात दिली गेली. दीड दोन महिन्यापुर्वी पुतिनने रशियात कसे कडकपणे लॉकडाऊन केले याच्या पोस्ट आणि पुतीनचे कौतुक व्हॉटस अ‍ॅपवर फिरत होते. इतके कडक लॉकडाऊन होते तरी तिथला कोरोना रुग्णांचा आकडा तीन लाखांच्या जवळ गेलाय. इटलीने ९ हजार रुग्ण असताना लॉकडाऊन केले तरी तिथली रुग्णसंख्या आता सव्वा दोन लाखांवर पोहोचली आहे. खुद्द भारतातही सहाशेच्या आत रुग्ण असताना लॉकडाऊन केले आणि तरीही आतापर्यंत एक लाखांवर रुग्णांची संख्या वाढली आहे. मग लॉकडाउनचे यश ते काय ? न्यूझीलंड ,ऑस्ट्रेलिया वगळता कोणत्या देशाला (चीनबद्दल अनेक संभ्रम आहेत म्हणून त्याला गणत नाही)लॉकडाऊन करुन कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणता आला ? बाकी वाटल्यास हा लेख वाचू शकता. (अनेकांच्या नावडत्या) कुबेरांनी लिहला असला तरी त्यात स्वीडनचे वैद्यकतज्ज्ञ जोहान गिसेक यांनी ऑस्ट्रेलियाच्या स्काय न्यूजला दिलेली मुलाखतीत मांडलेली मते आहेत. (मूळ मुलाखत मी पाहिलेली नाही). काही वाक्ये खाली देत आहे.
‘या विषाणूची खरी साथ अदृश्यच आहे. तुम्ही काहीही उपाय करा, ती पसरणारच. हे असे उपाय केलेल्या आणि न केलेल्या देशांतील परिणाम त्यामुळे एकसारखेच असतील.’’ त्यांच्या प्रतिपादनातला खरा बॉम्ब पुढे आहे. ‘‘टाळेबंदी यशस्वी करून दाखवली म्हणून अभिमान बाळगणारे जेव्हा केव्हा टाळेबंदी उठवतील तेव्हा या साथीचे थैमान वाढेल आणि त्यामुळे मृत्यूंची संख्याही वाढेल.’’