Skip to main content

[कविता' २०२०] - हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 11/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.

हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे




हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे तुजपर्यंत पोहोचण्यास पुष्पक विमान दे घेऊन जा उंच नभी, अंबरात राहू दे गगनातुनी सुंदर वसुंधरा मज पाहू दे हे धरती तू मजला हरितसृष्टी दान दे मुक्तपणे विहारण्यास घनदाट रान दे काम क्रोध मत्सराने व्यापली धरा ऊभी प्रेम क्षमा शांती फुलवण्या देहात त्राण दे हे वरुणा तू मजला चैतन्य वरदान दे झुळझुळ ती ऐकण्यास अंतरी दोन कान दे जीवन तू सृष्टीचे , फुलवतोस धरा सारी कोपू नको कधी पुन्हा, संयमाचे वाण घे हे समीरा तू मजला निर्भयता दान दे कणाकणात पोहोचण्यास वाहण्याचा मान दे पोहोचावे सत्वरी उखडून त्या मत्सरा फुलवुनी चैतन्य जगी , षड्रिपूंचे प्राण घे हे अग्नी तू मजला , दग्धता प्रदान दे वैरभाव हवन सारा आहुतीचा मान घे पंचभूत नमन तुम्हा तुम्हासमोर लहान रे प्रेमसुख न्हाऊ घाला , मम् पंचेंद्रिये दान घे


वाचने 9958
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

प्रचंड आवडली!

+1

कविता आवडली.

In reply to by मीनल गद्रे.

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


In reply to by आगाऊ म्हादया......

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


एकदम १९६० दशकातील कवितांची आठवण करून देणारी

कवितेला + १ सं - दी - प