करोना विषाणू COVID-19 भारतातील अपयश साखळी आणि फैलाव
भारतीय मध्यमवर्ग कोविडसाथीला झोपडपट्टीपर्यंत मर्यादीत होणारा अथवा पुण्या मुंबईचा आजार या गैरसमजात अडकून स्वतःचे आणि देशाचे नुकसान तर करुन घेणार नाही ना? आजच्या तीन वृत्तांचा परामर्ष धारावी, पुणे आणि Covid-19 super spreaders
परदेशात अडकलेल्या भारतीय प्रवाशांना भारतात वापस आणण्याची शेखी मिरवण्यापेक्षा तिकडेच आर्थिक आणि वैद्यकीय मदत पाठवली असती तर आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा लगेच स्थगित केली असती तर अधिक चांगले झाले नसते का? विमान तळावरून केवळ टेम्परेचर नाही पाहून प्रवाशांना घरी जाऊ दिले गेले म्हणजे जसे की टेंपरेचर नसलेले प्रवाश्यांच्या नकळत त्यांच्या कडून वीषाणू प्रसार होणारच नाही! ( या सर्वावर कडी म्हणजे जागतिक आरोग्य संघटना जिच्या सल्ल्यांवर जग अवलंबून होते तीच सल्ले देताना बेसिक तार्कीक उणीवात अडकलेली होती, कसे ?)
शिकलेला आंतरराष्ट्रीय मजूर प्रवासी काय अन न शिकलेला मजूर प्रवासी काय वीषाणूंसाठी प्रसार योग्य सारखीच साधने होती आहेत रहातील, एकदा ठेच खाऊन शहाणा होईल तो भारतीय नव्हे एवढी मोठी आर्थीक व्यवस्था डावावर लावून प्रवाशांच्या दबावापुढे जगातली सगळी सरकारे नतमस्तक होतात तशी भारतातली सरकारे नतमस्तक झाली - होताहेत, मनुष्यस्वभावाच्या दोषांना सरकारांनाच फक्त जबाबदार धरता येते असे नाही. भारतीय सामाजिक बेशीस्तीने लॉकडाऊनच्या उद्दीष्टांचा बर्यापैकी पराभव केला आहे . सरकार माध्यमे आणि समाज अजून स्विकारत नसली तरी आज ना उद्या न स्विकारुन जातील कुठे ?
धारावी, पुणे आणि Covid-19 super spreaders
हि मी आज वाचलेली तीन वेगवेगळी वृत्ते. परदेशातून येणार्या प्रवाशांनी क्वारंटाईनची पालने केली नाहीत तबलिगींना लपवणेही महागात पडले हे ह्या वृत्तातून पुन्हा अधोरेखीत होते. मध्यमवर्गाकडे सेवा पुरवणार्या कामगार वर्गाकडून आजार लोकंख्या घनता अधिक असलेल्या भागात पसरला - झोपडपट्टीतील कामगारांशी रोज दररोजचा संवाद असूनही किमान नागरी सुविधांच्या बाबतीत सर्व झोपडपट्ट्या अधिकृत न समजणे याने साथ पसरण्यात मदत झाल्याचे दिसून येते आणि भारतांतर्गत रेशनकार्ड कुठेही सहज न वापरता येणे यामुळे मजुर/कामगार वर्गास मिळणार्या मदतीवर मर्यादा येऊन हा कामगार वर्ग प्रवास करुन आजार भारतभर पसरवत आहे.
हा प्रसार ग्रामिण भागात होऊन शेती माल भाज्या दुध जिवनावश्य्क वस्तु पुरवठादारांसोबत मध्यवर्गीयांपर्यंत लौकरच वापस पोहोचू लागेल. काही मध्य्म वर्गीय आपल्याला आता पर्यंत कोरोना होऊन गेला असेल आणि पुन्हा होणार नाही या भ्रमात असतील तर या कोरोनाचीही अनेक म्युटेशन अस्तीत्वात येत आहेत एखाद्या म्युटेशनला शरीर सरावले असेल तरी दुसर्या म्युटेशना फिरुन हमला होणारच नाही याची शाश्वती काय ?
आता इतर दुकाने आणि सेवाही पुन्हा नाईलाने सुरु होतील आणि या सेवादारांसोबत वीषाणू संक्रमणाची पुढची पुर्नावृत्ती दूर नसावी.
आम्हाला सेवा पुरवणार्या व्यक्ती रोज शेकड्यांनी लोकांना भेटतात आणि वीषाणूंची देवाण घेवाण करतात त्यांना एन ९५ मास्कचा आग्रह आम्ही अजून का धरलेले नाहीत ? भाजी निवडण्यापुर्वी आम्ही हात सॅनिटाईज करत आहोत का ? भाज्या निवडण्याच्या प्लास्टीक बास्केट वेगवेगळ्या हातातून देवाण घेवाण करतात त्या अधिकवेळा साबणाच्यापाण्याने धूऊन निर्जंतूंक करण्याचा आग्रह आम्ही धरतो आहोत का ? कॅशचा वापर न करण्यात किती यश येते आहे येत नसेल तर त्या संबंधातील बारीक सारीक अडचणी कोण दूर करणार ?
आमच्यातले आणि आपल्या आजूबाजूचे कितीजण अजून तीन बोटे दुसरीकडे दाखवत आहेत आणि स्वतः ५ फुटांचे अंतर राखणे, मास्क वापरणे, प्रत्येक गोष्ट साबणाच्या गरमपाण्याने धुणे याकडे गंभीर दुर्लक्ष करत आहेत? आणि दुर्लक्ष करणार्यांकडे दुर्लक्ष करत आहेत ?
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे , शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि विषयास धरुन चर्चा सहभागासाठी अनेक आभार
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मला तर अजुन तेच तेच प्रश्न पडतात
Rajesh188 च्या निसटत्या बाजू
RETROSPECTVELY EVERYONE IS
कोरोनातून बरे होऊन घरी गेलेले
फिअर सायकॉसिस
सोशल डिस्टन्सिंग आणि त्या
+१
चीन मधल्या एका व्यक्ती कडून
तरी विषाणू पसरतो म्हणजे साखळी
चांगली चर्चा
काही प्रमाणात सहमत
ह्या वर विविध स्तरावर लढायला लागणार
आमच्या भागात सर्व बंद
मल एक माहिती कुणी देणार का?
काहीसे उत्तर मिळाले ते असे ....
परदेशातील अनुभव