घरात एखादा पाळीव प्राणी असणे म्हणजे मोठी गम्मत असते. मांजरी तश्या स्वावलंबी असतात पण कुत्र्यांचे मात्र बरच करावे लागते. त्यातून कुत्रे जर अती एनर्जी असणारे असेल तर त्याला खेळवावे लागते. नाहीतर घरातल्या फर्निचरची वाट लागलीच म्हणून समाजा.
बायकोला अनेक वर्षे विनवण्या वैगेरे करून शेवटी आम्ही एक लॅब्रॅडुडल कुत्रे घरी आणले. फार एनर्जी असते बाबा या कुत्र्यांच्यात, घरात खेळून काही दमेना.
मग थोडी शोधाशोध केल्यावर घरापासून २-४ मैलांवर एक डॉग पार्क सापडले. अगदी मस्त आहे, लहान आणि मोठ्या कुत्र्यांसाठी वेगवेगळे भाग आहेत. आमच्या "कुकीला" सुद्धा हे डॉग पार्क फार आवडले. तिच्या आकाराची बरीच कुत्री तिथे खेळायला आलेली असतात.
मग काय दार आठवड्याला कुकीला डॉग पार्कमध्ये घेऊन जायचे हा नियमच झाला.
थोडी विचित्र गोष्ट घडली ती काही आठवड्यांपूर्वी. मी कुकीला खेळायला सोडून गम्मत बघत उभा होतो. एक मध्यमवयीन "गोऱ्या" बाई माझ्याशी गप्पा मारायला आल्या.
आम्ही गप्पा मारत असताना कुकी मधूनअधून माझ्याजवळ येऊन परत पळून जाणे हा खेळ खेळात होती.
गोऱ्या बाईं: "हे तुमचे पपी का? फार गोड आहे हो. काय नाव आहे?"
मी: "कुकी"
गोऱ्या बाईं: "अगदी माझ्यासारखी आहे कुकी, गुटगुटीत (चबी)."
आणि काय झाले कोणास ठाऊक पण त्या चपापल्यासारख्या एकदम गप्प बसल्या.
गोऱ्या बाईं खजील स्वरात: "सॉरी, मी तुमच्या पपीला चबी म्हणाले. माझा उद्देश तिला जाड वैगेरे म्हणण्याचा अजिबात नव्हता."
मी: "अहो त्यात काय झाले, तुम्ही काही चुकीचे बोललात असे मला अजिबात वाटत नाही. सॉरी वैगेरे म्हणण्याची अजिबात गरज नाही, कुकी आहेच तशी चबी."
पण या संवादाने मी थोडासा अंतर्मुख झालो. त्या बाईंना एका शब्दामुळे माझी माफी मागावी असे का बरं वाटावे? सामाजिक परिस्थिती अशी झाले आहे की आपल्याला बोलताना प्रत्येक शब्दाचा विचार करावा लागावा?
हे असेच राहणार असेल तर माणसांमधला निखळ संवाद कुठेतरी हरवरूनच नाही का जाणार?
वाचने
2900
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही केलेलं वर्णन बहुधा अमेरिकेतील असावं
पोलिटिकल कररेक्टनेसच्या छटा असतात
वरील छटा "धवल" प्रकारात येतील
In reply to पोलिटिकल कररेक्टनेसच्या छटा असतात by सर टोबी
हल्ली सगळीचकडे "कुठल्या
संस्थळावर संपादकांनी काही
आणखी काही उदाहरणे