साहित्यः
- कांदा (२)
- खोबरं (अर्धी वाटी)
- काजू (१५/२०)
- गोडंबी (१५ /२०)
- अदरक ( दोन मोठे तुकडे)
- लसूण ( ७/८) पाकळ्या
- कोथिंबीर
- तिखट १ चमचा
- मीठ १ चमचा
- हळद १ चमचा
- गरम मसाला १ चमचा
प्रथम गॅस सुरु करुन त्यावर ३० सेकंद खोबरं भाजून (अर्धवट जाळून घ्यायचे), तव्यावर थोड्या तेलात कापलेला कांदा परतून घ्यावा, नंतर काजू आणि गोडंबी सुद्धा परतून घ्यावी.
वाटणं १: कोथिंबीर, आलं, लसूण मिक्सर मधून बारीक करुन घ्यावा
वाटण २ : भाजलेल्या खोबर्याचे छोटे तुकडे करुन कांदा, काजू आणि गोडंबी सोबत मिक्सर मधे बारीक करुन घ्यावे (शक्यतो पाणी टाकू नये)
हुश्श तयारी झाली आता भाजी बनवूया...
- पॅनमधे तेल गरम झाले कि गॅस कमी करुन (मंद आचेवर) त्यात थोडी मोहरी टाकायची.
- मोहरी करपण्याच्या आत हिरवे वाटण टाकायचे आणि साधारण अर्धा मिनिट मिक्स करावे.
- काळं वाटण टाकून २ मिनिट मिक्स करत राहावे (आधीच भाजून घेतल्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही)
- तिखट, मीठ, हळद, गरम मसाला टाकू्न २ मिनिट मिक्स करत राहावे.
- अर्धा ग्लास पाणी टाकावे, (तुम्हाला करी कशी पाहिजे त्याप्रमाणे कमी/अधिक)
- उकळी आली की गॅस बंद करावा .
गार्लिक नान.
करी बनवण्यापूर्वी कणीक (६ चपातीला लागेल एवढी), २ चमचे दही, बेकिंग सोडा (थोडा) , मीठ (चवीनुसार) टाकून मिश्रण के्लं आणि दूध टाकून भिजवली होती.
ही पाकृ बघून नान बनवण्याचा प्रयत्न केला.
केडी सारखे तवा उलटा करुन नान भाजायला जमलं नाही, म्हणून चिमट्याचा सहारा घेवून नान शेकले ;)
नान झाल्यावर वरच्या बाजूला थोडं तूप/बटर लावावे.
( शु. शा. लोकांनी अंड्याऐवजी पनीर किंवा शेव वापरले तरी चालेल.)
पाकृमधे केले तसे वाटण घेऊन आम्ही शेतात चिकन/मटण बनवायचो, तेव्हा घरी गॅस , मिक्सर नव्हते. आई हे वाटण बनवून द्यायची. कांदा, खोबरं चुलीत भाजून घ्यायची आणि पाट्यावर वाटून द्यायची. त्याची चव काही औरच.....!
वाचने
19595
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
लॉक डाउन नंतर मी घरी येणारे
पनीर वापरून ही पाकृ बनवून
आगोबा, तुला येईल नान..
In reply to पनीर वापरून ही पाकृ बनवून by प्रचेतस
बुवा आता अगदी पाककृत्यदक्ष
In reply to आगोबा, तुला येईल नान.. by अत्रुप्त आत्मा
=))
In reply to बुवा आता अगदी पाककृत्यदक्ष by सस्नेह
काय छळ आहे.
तुम्ही नगर चे आहात काय?
In reply to काय छळ आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तों पा सू
तों पा सू
क्या बात है!
हो..
In reply to क्या बात है! by मिसळपाव
ज्ञानात भर
In reply to हो.. by प्रशांत
वा!
छान झालेला आहे नान, हिरवे पांढरे डिजाइन मस्त. आमच्याकडेही कढईत करण्याचा प्रयत्न झाला आणि यशस्वी झाला. कढईला हँडल असले तर बरे होईल.
झकास रेसिपी.
__/\__
जोरदार बॅटिंग चालू की
उत्तम. आवडली पाककृती.
फोटो झकास
भारी हो सरपंच!
सरपंच
गोडंबी नसल्यास शेंगदाणे वापरा..
In reply to सरपंच by जेम्स वांड
आभार सरपंच
In reply to गोडंबी नसल्यास शेंगदाणे वापरा.. by प्रशांत
वाह.. झकास पाकृ..!!
लय भारी नान तर एकच लंबर !!!
मस्त