वीषाणू म्हणती कितवा दिवस?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
1 May 2020 - 9:17 am
गाभा: 

परवाच्या धाग्यात गविंनी काही चांगले प्रश्न उपस्थित केले. एकच विषय चघळण्याच्या क्षमतेबाबत मानसिक मर्यादा पडतात ते समजण्यासारखे आहे. पण तरीही घोंघावणार्‍या मुख्य विषयांवरही चर्चा महत्वाची असावी.

येत्या काही दिवसात लॉकडाऊन शिथील होत जातील, माझा पहिला प्रश्न आहेत लॉकडाऊन सोबत वीषाणूंचे दिवस सर्वथा संपत आहेत का? नसतील तर पुढे काय काय काळजी घेतली जावयास हवी ? तुम्ही कोण कोणती काळजी घेणार आहात ?

दुसरे लॉकडाऊन काळात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी खटकल्या / खुपल्या आणि का ?

*** मला खटकलेले प्रश्न आणि गोष्टी ***

१) COVID -19 चे वीषाणू जगात इतरत्र वावरत नव्हतेच याचा नेमका पुरावा कोणता ?

२) समजा COVID -19 यापुर्वी अस्तीत्वात नव्हते ? पण उर्वरीत संक्रमणजन्य श्वसन विकारांना (आधुनिक) वैद्यक क्षेत्र पुरेशाने गांभीर्याने घेत आले आहे का की मृत्यूदर कमी असतो म्हणून गौण समजत आले आहे ?

३) (आधुनिक) वैद्यक क्षेत्र पुरेशाने गांभीर्याने घेत आले आहे का की मृत्यूदर कमी असतो म्हणून गौण आणि गृहीत धरले नाही असा वैद्यकक्षेत्राचा दावा असेल तर, शारिरीक अंतर आणि मास्क या दोन विषयात वैद्यक क्षेत्राची वैचारीक धरसोड का झाली ?

४) माझ्या पुण्यातील एका परिचितांनी एका श्वसन विकार बाधीत रुग्णास शेजारधर्म म्हणून (सुदैवाने कोविड-१९ नव्हता आणि आठवडा भरात सुखरुप परत आला) (खर्चिक) खासगी रुग्णालयात भरती होण्यास लॉकडाऊन काळात मदत केली त्याच्या कडून कळलेले अनुभव

अ) संबंधीत रुग्णालयाच्या रुग्ण वाहिकेने येण्यास टाळाटाळ केली, १०८ क्रमांकावरील रुग्णवाहीका सेवा रुग्ण कुठून घ्यायचा आहे त्याचा पत्ता न विचारताच दूरदूरच्या केंद्रातील रुग्णवाहिका केंद्रांचे संपर्क क्रमांक देत होते आणि ते क्रमांकही रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे टाळत होते, शेवटी एका राजकीय समाजसेविकेस विनंती केल्यानंतर तिच्या मध्यस्तीने एक खासगी रुग्णवाहीका आली पण चालकाने मास्क वापरलेला नव्हता ? त्याला मास्क बांधायला सांगितल्यावर तो येत नाही म्हणाला असतात तर काय घ्या म्हणून मास्कविरहीत रुग्णवाहनसेवा स्विकारावी लागली. (माझे परिचीत त्यांच्या दुचाकीवरनं स्वतंत्र पणे सोबत गेले)

आ) रुग्णालयाच्या बाहेर खुर्च्याटाकून बसलेले सुरक्षारक्षक व्यवस्थित मास्कमध्ये नव्हते. रुग्ण वाहिकेच्या वाहकास मास्क नसल्याबद्दल कुणिही हटकले नाही माझ्या परिचितांकडे मास्क वगैरे होता पण कुणाकडे नसल्यास मास्क उपलब्ध करण्याची सुविधा, हँड सॅनिटायझर काउंटरवर उपलब्ध नव्हती

इ) रुग्णास घेऊन जाण्यापुर्वी त्यांची आधीची आरोग्य फाईल सोबत घेण्यास सांगितल्यावरही त्यांनी सोबत घेतली नाही, त्यांचे खासगी रुग्णालय ग्रेट आहे या भ्रमात ते होते, प्रत्यक्षात रुग्णालय प्रशासनाने सॉफ्टवेअर बदलल्याने जुना डाटा उपलब्ध नाही म्हणून हात वर केलेले.

(त्याच चकरेत इन्श्युरन्स कार्ड आणि एटीएम कार्ड घेतले नाही - त्यांचे जे नातेवाईक मदतीस म्हणून येणार होते ते फिरकले नाही माझ्या परिचितांना एटीअम कार्ड आणि इन्श्युरन्स कार्ड साठी मध्यरात्री दुसरी चक्कर करावी लागली तेवढे करुन त्यातील एटीएम कार्ड चालले नाही- आपण याच रुग्णालयाचे पेशंट हा पेशटंचा विश्वास होता आणि पैशावरुन हॉस्पीटल प्रशासन कर्मचारी प्रत्यक्षात वैताग येईल एवढा असहकार्यपुर्ण होता ड्युटी डॉक्टरांच्या हस्तक्षेपानंतर जरासा नरमून त्याने रुग्णास विलगीकरण आयसीयू कडे पाठवू दिले)

ई) रुग्णाचे बाजूच्या गल्लीतील (जवळचे!) नातेवाईकही (पोलीस पास अनुपलब्धतेचे कारण देऊन) नंतरच्या आठवड्याभरातही रुग्णालयाकडे फिरकले अथवा कोणतीही मदत देते झाले नाही.

उ) घरी पोहोचल्यावर सोसायटी स्वच्छता कर्मचार्‍यास विश्वासात घेऊन अधिक स्वच्छता आणि व्यक्तिगत सुरक्षा करण्याची सुचना केली त्या कर्मचार्‍याने सोसायटीत बोभाटा केला पण स्वच्छता आणि व्यक्तिगत सुरक्षा विषयक सांगितलेली सुचनांचे किमान चार दिवस पालन केले नाही.

ऊ) रुग्णाच्या घरी एकटी ज्येष्ठ नागरीक पत्नी संधीवाताने चालू शकत नव्हती तिचे घर स्वच्छ केले जाण्यात मदतीची गरज होती पण सोसायटीच्या बाहेरच्या व्यक्ती नको म्हणून घरकामगारांचे सोसायटीने प्रवेश बंद केलेले तर दुसरीकडे सोसायटीचा स्वच्छता कर्मचारी भितीने त्यांच्या फ्लोअरवरही जाण्यास नकार देत होता.

ए) माझ्या परिचितांच्या घरीही संधीवाताने अंथरुणाला धरुन असलेल्या ज्येष्ठ नागरीकाच्या सेविकेनेही नंतर आठवडाभर दांडी मारली.

ऐ) सोसायटीतील इतर सभासद मानभावीपणे दुरुन मदत देण्यास तयार होते पण त्यांच्या फ्लोअरवर जाऊन स्वतः चौकशी करण्याची कुणाचीही तयारी नव्हती. त्यांनी हॉस्पीटल मध्ये मदत साहाय्य घेऊन जाण्यासाठी कुणा दुसर्‍या सेविकेचा मुलगा पैसे देण्याच्या बोलीवर शोधला पण त्याला पोलीस परवानगी मिळावी म्हणून सोसायटीचे पत्र हवे होते, आणि सोसायटीला पत्र देण्यासाठी रुग्णाच्या पत्नीचे पत्र हवे होते आणि तसे पत्र लिहून घेण्यासाठी स्वतःच्या घरच्या तरुण मुलांना पाठवण्यास मात्र सोसायटीतील मानभावी मंडळी तयार नव्हती!

ओ) अ‍ॅडमीट केलेल्या ज्येष्ठ नागरीक रुग्णाचा परदेशातील कुणाही व्यक्तीशी संपर्क येण्याचा संबंध नव्हता पण तेवढाच एक प्रश्न हॉस्प्टीटल प्रशासन माझ्या परिचितांना खोदून खोदून विचारत होते एकतर शेजारी तेही वेगळ्या फ्लोअरवरचे या पलिकडे त्यांच्या बद्दल त्यांना कल्पना नव्हती आणि लॉकडाऊनमध्ये तरुणाईला घरात बसवून स्वतः बाहेर भटकणार्‍या म्हतार्‍यांमध्ये या बोलघेवड्या रुग्णाचाही समावेश होता तरीही २००-३०० मीटर अंतरातील किराणा भाजीपाला दुकान आणि वाटेत भेटलेले लोक या पलिकडे त्यांच्या संपर्काची शक्यता नव्हती

औ) कोविड निघाला नाही (ह एनंतर कळले) तरी आयसीयु पर्यंत पोहोचवणारे जिवाणू/वीषाणू कमी गंभीर असतात का ? किराणा भाजी पाला औषधी दुकानदार डॉक्टर या मंडळींनी सर्वप्रथम मास्क वापरावयास नको का ? त्यांनी वृद्ध नागरीकांना घरपोच सेवेची व्यवस्थाकरुन त्यांचे बाहेर फिरणे बंद करावयास नको का ?
रुग्णाच्या परिवारास वाळीत टाकण्यापे़क्षा परिसरातील इतर फिरणार्‍यांचे आणि विशेषतः एका पेक्षा अधिक व्यक्तिंना भेटणार्‍या किराणा भाजी पाला औषधी दुकानदार डॉक्टर यांना मास्क बंधनकारक करावयास नको का ? हे माझ्या परिचितांना पडलेले प्रश्न असो

५) नोटा, एटीएम, लिफ्ट्स जिन्यांचे रेलिंग्स दरवाज्यांचे हॅंडल्स, ते बटणे अशा छोट्या पण महत्वाच्या गोष्टींच्या निर्जंतुकीक सातत्यपुर्ण प्रयत्न आता पर्यंत किती झाले असतील आणि पुढे किती होतील ते देव जाणे पण पुण्या मुंबईतला मध्यमवर्गीय कोरोना केवळ झोपडपट्ट्यात फोफावतोय आपल्याकडे वापस येणार नाही या भ्रमात वावरत नाहीए ना? काही देशांचे राजपूत्र आणि पंतप्रधानही कोरोनाच्या विळख्यात आल्याचे भारतीय मध्यमवर्गीयास विसर पडत नाहीएना ?

६) भारतात प्रत्येक नागरीकास रेशनकार्ड आणि संकटात साहाय्य मिळण्याची गरज असताना अडचणीतील नागरीकांकडे साहाय्य पाठवण्याएवजी स्थलांतरीतांचे आणि प्रवाशांचे (मग परदेशी गेलेले असो वा भारतीय ) प्रवासाचे हट्ट गळी का उतरवले जाताहेत ? तथाकथित ग्रीन झोनमधील नांदेडहून शीख यात्रेकरुंचा जथा वाजत गाजत पंजाबात पाठवला शहाण्यांनी त्यांना आधी घरी जाऊ दिले मग वापस बोलवून चाचण्या घेतल्या बहुतेक पॉझिटीव्ह निघाले ! नेमके काय चालू आहे ?

७) अनावश्यक प्रवासाचे प्रमाण प्रवासाचे दर वाढवून कमी करणे या एवजी प्रेमाने फुकटात प्रवास का उपलब्ध करुन दिले जात आहेत . ज्यांचे प्रवास खरेच अत्यावश्यक असतील त्यांना सरकार परतफेड देऊ शकेल हे अधिक सुयोग्य होणार नाही का ? मार्केटचे तास कमी केल्याने गर्दी कमी होईल कि वाढेल? गर्दी होणार्‍या वेळते मार्केट बंद करावे आणि शारिरीक अंतर आणि मास्क वापरुन नंतर रात्रं दिवसही चालू ठेवल्याने असे किती बिघडणारे होते ? (शारिरीक अंतर आणि मास्क या दोन गोष्टींच्या भरवशावर चीनच्या बाजूचे हाँगकाँग आणि तैवान बर्‍यापैकी व्यवस्थीत चालू आहे!)

७) पुणे महापालिका :- विलगीकरण म्हणून वसहतीतून वेगळे काढलेल्यांतील संशयीत रुग्ण आणि सामान्य तब्येत असलेल्यांची रहाण्याची व्यवस्था एकत्र ठेवत होती ! (हसावे कि रडावे?) नेमके काय चालू आहे ?

झोपडपट्ट्यात किती परदेशवारी करणारे रहातात ? अजूनही आजार समाजात पसरत नाहीए हे क्लेम कशाच्या बळावर केले जात आहेत ? झोपडपट्टीत नेमक्या कोणत्या प्रकारच्या सेवकांमधून आजार पसरला जातोय याचा शोध घेण्याचा जरासाही प्रयत्न कसा होत नाही? पुण्या मुंबईत परदेशी प्रवास करुन आलेले व्यवस्थीत आहेत त्यांना घरी पोहोचवणार्‍या ड्रायव्हर ते त्यांच्या घरच्या सफाई कर्मचार्‍यांची स्थिती माहित नाही हे नेमके काय गणित आहे ? घरपोच सेवा देणार्‍या कुरियर सेवकांची काय स्थिती आहे त्यांना लागणारे मास्क इत्यादी बद्दल फारसे बोलले लिहिले जाताना का दिसत नाहीए ?

८) शेवटीपण शेवटचा नव्हे असा प्रश्न, पिईपी टेस्टींग किट्स आणि पॉलीप्रॉपीलीन बेस्ड मास्कच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण का नाही ?

* चर्चा सहभागासाठी , अनुषंगिका व्यतरीक्त विषयांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

1 May 2020 - 10:06 am | चौकटराजा

आपल्या देशातील आरोग्य स्थिती " भयानक" अशीच आहे .एरवी सुद्धा ! सरकारी रुग्णालये तर सोडाच पण खाजगी रूग्णलयात आलबेल आहे असे काही नाही ! माझ्या मते रुग्णालयात न जाता घरीच पटकन मरण येणे हाच यावर उपाय आहे जो मानवाच्या हातात नाही.

Nitin Palkar's picture

1 May 2020 - 7:46 pm | Nitin Palkar

+१११

Prajakta२१'s picture

1 May 2020 - 2:33 pm | Prajakta२१

आपल्या एकंदर जीवनपद्धतीत आणि संस्कृतीत sanitization हा विषय गौण आहे
फक्त पूर्वीच्या सोवळ्याओवळ्याचे दाखले देऊन त्यात रमणाऱ्या लोकांची संख्या वाढत चाललीये
esakal मध्ये सध्या जपान मध्ये असलेल्या व्यक्तीच्या अनुभवानुसार तिथली लोक साध्या सर्दीसाठी देखील बाहेर मास्क लावून पडतात आधीपासून असे वाचले असेच आपल्या इथे लागू केले तरी बराच फरक पडेल पण असे होण्याची शक्यता कमीच
सध्या १०-१२ ह्या वेळेमुळे फार त्रास होतोय दुकानदारांना आणि ग्राहकांना. गर्दी कमी करायच्या उद्देशालाच हरताळ फासल्यासारखे होते
तसेच आमच्या भागात आत्तापर्यंत एकदाही औषधफवारणी झाली नाहीये घरपोच जीवनावश्यक वस्तू देणे तर लांबच राहिले आमच्या इथे नुसतेच बंद करून ठेवले आहे सगळे आणि काही काही लोक तर मास्कशिवाय च फिरत आहेत
इथे sanitization साठी आवश्यक साधने पण मेडिकल मध्ये मिळायची मारामार आहे (dettol गेले १ महिना मिळत नाहीये आणि अजून १५ दिवस येणार नाही असे मेडिकल वाल्याने सांगितले आहे तेच वेट wipes आणि डिसइन्फेक्टन्ट स्प्रे बाबत )
इथे ह्यात पण राजकारण आणण्याचा प्रयत्न चालूये कि काय असे वाटायला लागते
सोशल डिस्टंसिन्ग हे तर इथे चैनीची गोष्ट वाटेल अशी परिस्थिती आहे आणि इथल्या लोकांना नुसतेच सगळे बंद आहे म्हणून घरी बसावे लागतेय असे वाटतेय
त्यामुळे इतक्या वर्षांच्या हाडीमासी खिळलेल्या सवयी तशाच आहेत अजून

माझ्याकडे सुद्धा अंथरुणातील ज्येष्ठ नागरीक असल्यामुळे डेटॉल अथवा सॅव्हलॉनची मोठी बाटली लागते आणि स्टॉक संपतोय कुणि डेटॉल / सेव्ह्लॉन ला पर्याय सुचवू शकेल का ? कपडे वॉशकरताना एकदा साबण आणि म्ग गरमपाणी आणि डेटॉल असा आमच्याकडे सिक्वेन्स असतो. कुणी पर्याय सुचवू शकेल का ?

सोशल डिस्टंसिन्ग हे तर इथे चैनीची गोष्ट वाटेल अशी परिस्थिती आहे आणि इथल्या लोकांना नुसतेच सगळे बंद आहे म्हणून घरी बसावे लागतेय असे वाटतेय

बरोबर आहे. जिथे सोशल डिस्टन्सींग शक्य नाही जसे की छोटी घरे अरुंद बोळी तिथे मास्क जास्त वापरला जावयास हवा. पण शक्य तेवढे सोशल डिस्टन्सिंग पाळावयास हवे. स्वयंस्फुर्त पण कंप्ल्शन नसलेलेले २१ दिवसाचे लॉकडाऊन दर दहा वर्षांनी केल्यास संक्रमणशील वीषाणू आणि जिवाणूं वर अधिक चांगले नियंत्रण मिळवता येईल का असा प्रश्न मनात येतो.

औषध फवारणी न झालेल्या सार्वजनिक पदपथांवर कोरडे डिटर्जंट टाकण्याचा निर्जंतुकीकरणात फायदा होईल का असा एक प्रश्न मनात येतोय कारण माझ्या परिसरात एका ठिकाणाहुन महापालिका कचरा उचलते तेथे नंतर निर्जंतुकीकरण होताना दिसत नाही नुसते कोरडे डिटर्जंट टाकल्यास फायदा होईल का ते जाणकारांकडून जाणून घेणे आवडेल.

esakal मध्ये सध्या जपान मध्ये असलेल्या व्यक्तीच्या अनुभवानुसार तिथली लोक साध्या सर्दीसाठी देखील बाहेर मास्क लावून पडतात आधीपासून असे वाचले असेच आपल्या इथे लागू केले तरी बराच फरक पडेल

सहमत आहे, एवढी इकॉनॉमी बंद करण्यापेक्षा मास्कचा वापर बरा शिवाय केवळ कोविड -१९ वर लक्ष्य केंद्रीत करण्या पेक्षा एवढी इकॉनॉमी पणाला लावलीच तर इतर श्वसन विषकय संसर्गजन्य आजारा नियंत्रणाचा सर्वसमावेशक प्रयत्न झाला असता तर बरे झाले असते पण तसे होताना दिसत नाही.

आपल्या एकंदर जीवनपद्धतीत आणि संस्कृतीत sanitization हा विषय गौण आहे
फक्त पूर्वीच्या सोवळ्याओवळ्याचे दाखले देऊन त्यात रमणाऱ्या लोकांची संख्या वाढत चाललीये

सहमत आहे केवळ तेवढेच पुरले असते तर यापुर्वीच्या बर्‍याच साथींना तोंड द्यावे लागले नसते.

* आपल्यासोबत चौकट राजांनाही प्रतिसादासाठी अनेक आभार

Prajakta२१'s picture

2 May 2020 - 12:01 am | Prajakta२१

धन्यवाद

मराठी कथालेखक's picture

1 May 2020 - 5:19 pm | मराठी कथालेखक

लोकसत्तातील हा लेख वाचण्याजोगा आहे.

लोकसत्ता लेखातील अगदीच '‘गणपती दूध पितो..’ वातावरणाशी अथवा डोळे येण्याच्या साथीशी तुलनाही पटली नाही अगदीच हलक्यात घेणे झाले. एकंदर लेखावरुन लेखक काही गोष्टींबाबत अनभिज्ञ असावा अथवा सजग नसावा असेही वाटले. पण लेखातील शेवटच्या परिच्छेदातील खालील निरीक्षण योग्य वाटते.

दुसऱ्या टप्प्यातली लढाई एवढय़ा मोठय़ा व्याप्ती व लोकसंख्येमुळे आपल्यासाठी दीर्घकालीन असणार आहे. आणि अशा दीर्घकालीन लढाईच्या या दुसऱ्या टप्प्याच्या वेळी सध्याची आपली इतकी ‘हाइप’ व ‘ओव्हररिअ‍ॅक्शन’ यांनी आपली ‘लांडगा आला रे आला’ सारखी गत होऊ शकते. दीर्घकालीन लढाईसाठी एवढया मोठय़ा लोकसंख्येचा धीर, पेशन्स टिकवायचा असेल, तर सुरुवातीचा असा अतिरेक आपल्या अंगलट येऊ शकतो.

* लस किंवा औषध उपलब्धतेसाठी किमान वर्षाभराचा अवधी आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत उपचार पोहोचण्यासाठी आणि हर्ड इम्युनिटी उपलब्धतेसाठी किमान २ वर्षे किमान येत्या तीनेक वर्षांचा तरी लढा म्हणता येऊ शकेल असे वाटते.

आशुतोष शेवाळकरांचे खालील प्रश्न मुद्दे पहा

कुठल्याही विषाणूचं आयुष्य ७२ तासांपेक्षा जास्त नसतं असं आधुनिक वैद्यकशास्त्र सांगतं. विषाणू अन्य कुठल्या सजीव पेशींखेरीज जिवंत राहात नाहीत, मग अशा वेळी मानवी पेशीपासून संबंध तुटलेला विषाणू निर्जीव पृष्ठभागावर काही तास तग तरी कसा काय धरू शकत असेल? आणि तरीही सगळीकडे इमारतींचं सॅनिटायझेशन, विविध पालिका/ महापालिकांच्या फवाऱ्यांनी रस्ते धुणे कशासाठी सुरू आहे?

>>मग अशा वेळी मानवी पेशीपासून संबंध तुटलेला विषाणू निर्जीव पृष्ठभागावर काही तास तग तरी कसा काय धरू शकत असेल? >> काहीच तग धरला नसता तर असंख्य वीषाणू जन्य संसर्ग आपोआपच टळले असते आणि आजची महामारीची परिस्थिती आलीच नसती.

पृष्ठभाग प्रकार आणि इतर प्रकारांवर अवलंबून काही तास / दिवस वीषाणू नक्कीच तग धरतात आणि तग धरलेल्या काळात कोणत्याही मार्गाने शरीर प्रवेश मिळाल्यास वीषाणू चक्र नव्या सजीवाच्या आधारे पुन्हा चालू होते. जसे की आपल्याकडे ९९ टक्के घरे ही वाकून झाडली जातात , रस्त्यावरील वीषाणू कुणाच्या पायाने घरी गेला कुणीतरी झाडले आणि सशक्त असल्यामुळे लक्षात नाही आले पण घरातील इतरांना संसर्ग झाला असे होणार नाही ह्याची गॅरंटी घेऊन एखाद्या जीवाला धोका झाला तर आयुष्य परत करण्याचे आश्वासन आशुतोष शेवाळकरां देऊ शकतात काय ?

संसर्गित व्यक्तीचे हे ‘ड्रॉपलेट्स’ उडून कुठे पडले असतील व त्याला आपला हात लागला व तोच हात चुकून आपल्या नाकातोंडाला लागला तर हा अप्रत्यक्ष संसर्ग होऊ शकतो. व त्यासाठी सतत हात धुण्यासाठी सुद्धा सांगितलं जातं आहे. पण ‘प्रत्यक्ष संसर्गा’पेक्षा अशा अप्रत्यक्ष संसर्गात लागण होण्याची शक्यता स्वाभाविकच कमी होत असेल ना?

हि कमी कशी असेल ? या पुर्वी पर्यंतची पहिली शिंक खोकला रुमाल हाताशी नसल्यास स्वतःच्या तळ हाता वर घेण्याची पद्धत होती, लिफ्ट मधून जाताना एखाद्याने असा स्वतःचा हात बटनाला लावला त्याच बटनाला अजून दहा जणांनी येता जाता हात लावले तर नेमके काय होईल ? हिच गोष्ट दरवाजाची हँडल्स बेल पंखे एसीची बटने अशा असंख्य ठिकाणाहून होऊ शकते. हाताच्या मुठीला एक दिवस बांधुन ठेवले तर आपण किती ठिकाणी हात नेतो ते नेमके लक्षात येऊ शकेल.

असाच एक वाद एका ज्येष्ठ नागरीक इंजिनीयर सोबत झाला त्यांचे म्हणणे कुणी शिंकले / खोकले तर ते थेंब लागलीच जमिनीवर जातात. आता थुंकीतील सुक्ष्म थेंबांचे वजन ते कितीसे असणार जमिनीवर पोहोचण्यासाठी काही मिनीटे तरी जातील आणि कोणत्याही १०० स्क्वेअर मीटर मधून पाच दहा मिनीटातही अनेक माणसे पहाता पहाता जाऊ शकतात आणि त्यांच्या श्वसनात वीषाणू जाऊ शकतातच शिवाय आधी म्हटल्या प्रमाणे आपल्याकडे घरची जमीन पुसण्यापुर्वी आवर्जून वाकून झाडली जाते त्यातील काही धूण श्वसन मार्गे गेली तर नेमका इफेक्ट काय असू शकेल ?

मी माझ्या घरी रात्री झोपताना मॉपींग इन्सीस्ट करतोय म्हणजे सकाळी झाडतानाची धूळ डिसैफेक्टेड असण्याचे चान्सेस अधिक असतील..

करोनाचा विषाणू हा थुंकी, शेंबूड यांच्यामधून संसर्गाने पसरू शकतो असंच सगळीकडे सांगितलं जात आहे. हा प्रत्यक्ष संसर्ग टाळायला एक मीटरचं अंतर राखायचं असंही सांगितलं जात आहे

हे १ मीटरचे अंतर सांगताना 'किमान' ह्या शब्दाकडे दुर्लक्ष करून १ मिटरला 'कमाल' शब्दा प्रमाणे वागणूक मिळते आहे. प्रत्यक्षात काही अभ्यास मानवी शिंक खोकला थुंकी अगदी ५/६ फुटांपर्यंत प्रवास करू शकते असे सुचवताना दिसताहेत. कदाचित १ मीटर वरील भरवसा घातक ठरत नाहीएना अशी मला शंका वाटते.

आपल्याला त्रास होण्याची शक्यता कमी असली तरी या संसर्गाने वृद्ध आणि मुलांना धोका होऊ शकतो, त्यांच्यासाठी आपल्याला असं उद्योगधंदा सोडून घरी बसणं आवश्यकच आहे असं स्वत:ला समाजावणं मग भाग पडतं.

होय ह्या धोक्यात फक्त इतर आजारांनी ग्रस्त तरुणांचाही समावेश करणे आले

करोनाचा मृत्युदर हा याआधी येऊन गेलेल्या सार्स इत्यादि विषाणूच्या मृत्युदरापेक्षाही कमी म्हणजे दोन टक्केच असल्याचंही दहा दिवसांपूर्वीपर्यंत सांगितलं जात होतं. संख्याशास्त्राच्या अशा अंदाजात घराबाहेर पडल्यावर रस्ते-अपघातात मरण्याची शक्यतादेखील दोन टक्केअशीच सांगितली जाते. मृत्यूची शक्यता इतकी कमी असतानाही याचं एवढं मग ‘पॅनिक’ का केलं जात आहे हे कळलं नाही.

:)) टक्केवारी कमी वाटली तरी फैलाव अधिक असल्याने प्रत्यक्षात मृत्यूची आकडेवारी अधिक आहे. ज्यां आजारांचा तत्काळ मृत्यूदर अधिक असतो त्यांचा फैलाव शक्यता कमी होतील पण ज्यांचा तत्काळ मृत्यूदर अधिक नाही त्यांचा फैलाव अधिक असेल आणि एकुण मृत्यूंची संख्या वाढेल.

शिवाय, संसर्ग होऊनही ‘काहीच त्रास न झालेले’ ८० टक्केलोक हे ‘कॅरियर्स’ असतात का? त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ शकतो का? असा संसर्ग होऊ शकण्याचा धोका किती दिवस पर्यंत असतो? या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. ८० टक्केलोकांना काहीच त्रास होणार नाही आणि २० टक्के लोकांपैकी पाच टक्क्यांनाच अधिक त्रास होणार असेल तर मग आपण या रोगाला एवढे घाबरतो का आहोत?

जगात ९५ टक्के लोकांचे तरी इम्युनिटीच्या दृष्टीने आहार १०० % फुलप्रुफ तेही एकदा साठी नाही नेहमीसाठी असतात का ? ८० टक्के लोकातीलही नेमकी कुणाची इम्युनिटी कोणत्या दिवशी कमी पडेल आणि त्यांचा समावेश धोकापोहोचु शकणार्‍या व्यक्तीत होणार नाही हे कसे सांगणार ? बरे इम्युनिटीने साथ दिली तरीही त्यांच्या नकळत त्यांच्याकडून संक्रमण होणार नाही याची गॅरंटी कशी देणार. सर्वच आलबेल असते तर इटली इराण न्युयॉर्क इत्यादींची एवढी वाट लागली नसती.


व्हेंटिलेटर’ लागले म्हणजे शेवटचा प्रवास अशी जी आपली ‘व्हेंटिलेटर’ विषयी सर्वसाधारण कल्पना आहे, तसा तो प्रकार नसावा असंही मला वाटलं.

मला वाटते व्हेंटीलिएटरचा उपयोग होऊन बरे होणारेही रुग्ण असतात.

Prajakta२१'s picture

2 May 2020 - 12:07 am | Prajakta२१

सुथॉल वापरू शकतो
पण ते डिसइन्फेक्टन्ट नाहीये बहुतेक

कडुनिंब कॉन्सन्ट्रेटेड प्रकारात वापरले तर किती प्रभावी होऊ शकते ?
पण त्याचे किती आणि कसे कॉन्सन्ट्रेशन करायचे यावर गूगल वर काहीच समाधानकारक माहिती मिळत नाहीये
आयुर्वेदात ह्याच्यावर काहीच संशोधन सुरु नाहीये सध्या
ह्याच्यावर औषध कुठेतरी आहे पण लपलेय असे वाटते काखेत कळसा आणि गावाला वळसा

चौकटराजा's picture

2 May 2020 - 2:51 pm | चौकटराजा

विषाणू सॅनिटायझर मुळे मरतो ( तो जिवंत जीव नाहीच ) ही बाबा खरी नसावी . फक्त विषाणू शी लढताना माणूस जीवाणू , बुरशी तसेच परजीवी यांच्य सारख्या संधीसाधु शत्रूंचा हलला शरीरावर होऊन नये म्हणून त्याचे ही निर्दालन कारण गरजेचे असते टाकायचं फवारणीचा उपयोग !

अवांतर :

लोकहो,

'करोनाची भानगड' हा माझा धागा ( https://www.misalpav.com/node/46631 ) होता. होता अशासाठी म्हंटलं की तो आता उडवला गेला आहे. त्यात करोना व टाळेबंदी याविषयी अनेक अडचणीचे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

धागा उडाल्याचं दु:ख नाही. माझी भीती कसली आहे ते सांगतो. करोना सारख्या क्षुद्र व फालतू कारणासाठी नरेंद्र दामोदरदास मोदी हा भारताला भरपूर शतकांनी मिळालेला नेता मोडीत निघू नये, इतकीच माझी इच्छा आहे. धागा गचकला तर गचकूदे.

आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

5 May 2020 - 12:10 am | मराठी कथालेखक

हे धागा उडवण्याचं प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवे. मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे असे दिसतंय ? कुणाची भिती आहे संपादकांना ?
असो.
तुमचे विचार तुम्ही पुन्हा मांडा. प्रतिसादांतून मांडा.

गामा पैलवान's picture

4 May 2020 - 10:06 pm | गामा पैलवान

गेल्या आठवड्यात ठाण्याच्या सुप्रसिद्ध मामलेदार मिसळीस दुकान उघडून गिऱ्हाईकांना खाण्याची सेवा पुरवायची परवानगी मिळाली. लोकांनी इतकी गर्दी केली की हा परवाना रद्द करून फक्त पार्सल सुविधा चालू ठेवली.

बरोबरे. गर्दी जमूनही करोनाची लागण होत नाही, हे उघडकीस आलं असतं. एकंदरीत करोनापेक्षा टाळेबंदीची जास्त चिंता आहे.

-गा.पै.

माहितगार's picture

7 May 2020 - 7:31 am | माहितगार

या टाइम्स ऑफ इंडिया वृत्तात ससून आणि पुण्यातील इतर सरकारी दवाखान्यांच्या दुरावस्थेचे चित्र स्पष्ट होताना दिसते आहे. खोकला असलेला पेशंट खोकला नसलेल्या पेशंटांसोबत कमी अंतरात निजवून अधिक आजाराची लागण होणे ते टॉयलेट्स बाथरुम, गैरव्यवस्थेचे बरेच वर्णन आले आहे.

अगदी घरात एखादाच पेशंट निघाला तर खासगी दवाखान्यांचे खर्च झेपणारे असू शकतात, जेव्हा अख्ख्या कुटूंबाला लागण होते तेव्हा अगदी मध्यमवर्गीयांची हालतही खस्ता होईल आणि सरकारी व्यवस्थापन विश्वासार्ह स्थितीत नाही असे दिसते हे चित्र आदर्श म्हणता येत नाही.

Corona ni sarv स्वच्छ अती पुढारलेल्या देशांची हवाच काढून घेतली आहे.
.
सर्वात जास्त मृत्यू आणि सर्वात जास्त corona badhit .
अती स्वच्छ,आणि अती पुढारलेल्या देशातच आहेत.
आफ्रिकेतील गरीब देश अशिया मधील भारत सारखा देश त्यांची बरोबरी मृत्यू आणि बाधित ह्या दोन्ही बाबतीत करू शकत नाही.
खूपच नगण्य संख्या आहे तुलनेने..
आणि शहाणपण दुसऱ्यांना शिकवण्या पेक्षा स्वतः सुधारा देश समाज आपोआप सुधारतो

....शहाणपण दुसऱ्यांना शिकवण्या पेक्षा स्वतः सुधारा देश समाज आपोआप सुधारतो

म्हणजे नेमके काय केले पाहीजे ते नीटसे समजले नाही, जरासे उलगडून सांगितल्यास बरे पडेल. आधी इतरत्र आपण लेखन केले असेल तर त्याचा दुवा दिला तरी चालेल.

सर्वात जास्त मृत्यू आणि सर्वात जास्त corona badhit .
अती स्वच्छ,आणि अती पुढारलेल्या देशातच आहेत.
आफ्रिकेतील गरीब देश अशिया मधील भारत सारखा देश त्यांची बरोबरी मृत्यू आणि बाधित ह्या दोन्ही बाबतीत करू शकत नाही.

आपला हा ही दृष्टीकोण नीटसा समजून घेऊ शकलो नाही. युरोपीयन आणि अमेरीकन अधिक स्वच्छ असल्याने अधिक प्रमाणात मरत आहेत असे आपल्याला म्हणायचे आहे का ?

आफ्रिकेतून लोक मरण्याच्या कमी बातम्या येत असल्याच्या आणि काळ्या वर्णाच्या लोकांना काही त्रास नसल्याच्या भ्रमात आमेरीकेतील आफ्रीकन आमेरीकन राहीले आणि आता त्यांच्यातच मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. युरोप मध्ये गोरेही मरतात. गरीब मध्यम वर्गीय श्रीमंत सर्व स्तरातून कोविड १९ चे बळी गेल्याचे बघण्यास मिळते.

गरीब देशांकडे टेस्टींगच्या सुविधांचाच अभाव आहे. महाराष्ट्रात टेस्टींगच्या सुविधा उपलब्ध होत आहेत तिथे रुग्ण आढळताहेत. ज्यांना टेस्टींग सुविधाच नाहीत किंवा कमी आहेत त्यांना आपल्याकडे किती मृत्यू अधिक झाले हे कदाचित दशवार्षिक जनगणना अहवालातूनच कदाचित कळाले तर कळेल.

मी वरच का कुठे नांदेडच्या शीख जत्थ्याचे उदाहरण दिले, स्वतःला बाधा नाही या गैर समजात होते. पंजाबात गेल्यावर टेस्टींग झाली तेव्हा पॉझीटीव्ह असल्याचे कळाले.

माहितगार's picture

7 May 2020 - 5:45 pm | माहितगार

हा बिबिसी संदर्भ दुवा देण्याचे राहीले होते

सुबोध खरे's picture

7 May 2020 - 7:52 pm | सुबोध खरे

There has been a surge in deaths in April.
https://indianexpress.com/article/india/malegaon-death-coronavirus-count...

मालेगावात मृत्यूचे प्रमाण दुप्पट झालंय.

पण ते कोव्हीड आहेत कि नाही माहिती नाही

लोकांनी अर्थ समजून घ्यावा.

माहितगार's picture

8 May 2020 - 7:10 am | माहितगार

मी गेल्या २-४ दिवसात वाचलेल्या बातमी नुसार इटलीत सुद्धा मृत्यू दर दरवर्षी पेक्षा ४९ टक्क्यांनी वाढला होता आणि सर्वच मृतांच्या टेस्ट त्यांनाही करता आल्या नाहीत.

बाकी वृत्तातील व्हेंटीलीएशन विरहीत पर्दा पद्धतीची घरे + विस्तारीत एक्त्र कुटूंब पद्धती + तबलिगी कार्यक्रमांतील उपस्थितांचा शोध टाळणे + अंत्ययात्रेत गर्दी करणे अशी काँबीनेशन्स मालेगावात आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक वीषाणू पोषक कॉकटेल बनवत असतील तर नवल नाही.

इंडियन एक्सप्रेस वृत्त मालेगावचा हाय लिटरसी रेट सांगते आहे पण डार्वीनच्या उत्क्रांती आणि जिवाणू वीषाणू जन्य आजार आणि त्यांची उत्क्रांती आणि संक्रमण न सांगणारे उर्दू भाषिक शीक्षण यूजलेस नसेल तरच नवल.

जाताजाता वृत्तपत्र प्रतिनिधींना वीषाणूशी संबंध नसलेल्या हिंदू-मुस्लीम विवाद उगाचच उकरुन उगाळण्याचे कारण काय असावे बरे ?