Skip to main content

[कविता' २०२०] - वाटा....

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/05/2020 15:01 या दिवशी प्रकाशित केले.

वाटा....




ठरलं अनंत वाटाच,अंती ध्येय, कसली सिद्धता, कुठले प्रमेय? दाही दिशांची यात्रा दरमजल, नव्या वळणावर, नवी गजल, कधी तुक्याची सोपी पायवाट, कधी फंदींची धोपट,वहिवाट, कधी करावी जरा वाकडी वाट, होईल कुण्या गतजन्मीची भेट, वाट जिथे संपवशील तू प्रारब्धा, नवी वाट शोधेन मी आरब्धा, पुन्हा मग अनंत वाटा अंती ध्येय, कसली सिद्धता, कुठले प्रमेय?


वाचने 12874
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

+१आवडली

+१ आवडेश

पुन्हा मग अनंत वाटा अंती ध्येय, कसली सिद्धता, कुठले प्रमेय?
सब माया है!

+१

+१. कधी तुक्याची सोपी पायवाट, कधी फंदींची धोपट,वहिवाट, हे फार मस्त आहे आरब्ध शब्द आवडला.

In reply to by पलाश

कधी तुक्याची सोपी पायवाट, कधी फंदींची धोपट,वहिवाट,
हेच आवडले. -दिलीप बिरुटे

+१ छान

सुंदर

वाटांवाटांची माहिती आणि महती सांगणारी कविता! +१ एक प्रश्नः आरब्ध हा शब्द मराठी की हिंदी? सं - दी - प

+1

वेव्ह फंक्शन ची आठवण झाली.... दाही दिशा एकदम आक्रमायला लागेलंच वेव्ह फंक्शन, छान प्रयत्न.

खरंय! कसली सिद्धता,कुठले प्रमेय! अनिश्चितता असतेच तरंगत कुठेतरी अधांतरी!