Skip to main content

[कविता' २०२०] - क्वारंटाईन!

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/05/2020 12:43 या दिवशी प्रकाशित केले.

क्वारंटाईन!




आलो तुझ्याचसाठी सेव्हन समुद्रावरून कंटाळून प्रेमाला, सदा करून ऑनलाईन सखये आलो कमवून बंडल काही डॉलरांचे निवांत फिरूया दोघे सारे स्पॉट टुरिस्टांचे यंदाच करून शुभमंगल पुढच्या वर्षी लिटल सन पाहतो उघड्या डोळ्यांनी हे ड्रीम फ्लाईटात बसून हाय! पडला हाती छाप विथ सरकारी डिझाईन तू तिकडे लुकिंग फॉर्वर्ड मी इकडे क्वारंटाईन!


वाचने 8037
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

लिहिते राहा. आवडली रचना. झिंगाट परफ्यूम मारून आलोय असे आठवले. बोहनीचा टायमाला आलो म्हणून +१ देतोय. -दिलीप बिरुटे

मात्र इंग्रजी शब्दांचा अतिरेक खटकला म्हणून कविता आवडली असूनही गुण देत नाही.

अशा कविता येणार असतील तर आमच्यासारखे इतरवेळि क्विता फारशी न वाचणारे लोक देखील वाचतील +१

+१. इंग्रजी शब्द जरा जास्तच प्रमाणात आले आहेत. तरीही ही कविता मस्तच आहे त्यामुळे +१ .

इंग्रजी शब्द असले तरी कविता मराठीच आहे. अन् त्या शब्दांचा वापर 'marathi शब्द न सुचल्याने' असा नसून कल्पकतेने योजलेला आहे. म्हणून आवडली..

In reply to by तुषार काळभोर

+१ प्रतिसादाला.... आणि +१ कवितेला! सं - दी - प