"हॅलो...अगंss सग्गssळ्या सोसायटीत बभ्रा झालाय.
कुणाला म्हणून तोंड दाखवायची सोय ठेवलेली नाही ह्यांनी आता."
.
.
"पण असं केलं तरी काय जावईबापुंनी...म्हणते मी???".
.
"अग्ग..सत्तत नजर ठेऊन असायचे त्या शेजारच्या चीचुंद्रीवर..सवितावर!!
.
आता त्या सटवेला...सासरचेही नाहीत अन् नवराही परगावी!!
म्हणजे ह्यांना रान मोकळं!!
.
बरं, कुठं होतात म्हणून विचारलं तर कावरे बावरे व्हायचे नुसते!!
मी काय दिलं नसतं करून??
.
काssयबाई...मेला आचरट प्रकार!!.. शी...!"
.
.
"पण झालं तरी काय??"
.
.
.
"अगss..काल रात्रीची गोष्ट.
मी झोपेत आहे अस समजून हे हळूच गच्चीची किल्ली घेऊन सटकले.
मलाही वास आला होताच...
मी ही गेले मग वर तरातरा!!! गाऊन वरच..."
.
.
.
"मssग???"
.
.
.
"आता रंगेहाथ पकडाव म्हणून फाssट्टकन दिवा लावला गच्चीचा...
.
.
.
बघते तर काय??
.
.
.
टाकीच्या एका बाजूला, समोरचा तो मेला आगाऊ चंद्या अन् त्याची चांडाळ चौकडी दारू पीत बसलेली...
.
.
.
अन् दुसऱ्या बाजूला...
हे...हे...
.
.
ओणवे होऊन मांजरासारखे...त्या सवितानं वाळत घातलेल्या
.
.
.
.
.
.
.
.
.
ओल्या पापड्या आणि कुरडया खाण्यात मग्न.
.
.
.
लोकं हसतायत गsss आता आमच्यावर ...फिदीफिदी...!!!
वाचने
4990
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
अरे व्वा! फेसबुक आणि व्हॉट्सप
अतृप्त आत्मा साहेब, ही कथा मी
In reply to अरे व्वा! फेसबुक आणि व्हॉट्सप by अत्रुप्त आत्मा
एला आत्म्य्या, आधी proof दे.
In reply to अरे व्वा! फेसबुक आणि व्हॉट्सप by अत्रुप्त आत्मा
(No subject)
:D
हा .... हा ..... हा .....
पण