लॉकडाऊन: एकोणीसावा दिवस
"कळावे, लोभ असावा,
पण इकडे येऊन पायधूळ झाडण्याचे कष्ट घेण्याचे टाळावेत ही विनंती".
असा पत्राचा मायना सुरुवातीचा घेण्याचे दिवस आले आहेत. भीती कोपऱ्याकोपऱ्यावर उभी आहे. भूताखेतांपेक्षाही भयंकर. सर्वांचा माज उतरला आहे. श्रद्धावंत आणि अश्रद्ध, गरीब आणि श्रीमंत, अलिकडचे आणि पलिकडचे सर्वांचा.
धीर देणारे, उपदेश देणारे निष्प्रभ. वारा पडल्यावर उंच गेलेला पतंग खाली येतो ती स्थिती.
अमचा एक सहकारी एक हिंदी कहावत सांगायचा. 'आशा' ही जीवन है, लेकिन आशा की माँ हमेशा खटिया पे बिमार सोई रहती है। तर ही उठणार कधी? विज्ञान की गाडी का पहियाँ पंचर। जल्दही ठीक होना जरुरी है।
तर काय सांगत होतो की हे ही दिवस जातील आणि हिंडू फिरू केव्हा लागू इकडे लक्ष ठेवून पुस्तकं वाचणे, टीवी पाहाणे, मुलांचे खेळ घेणे यामध्ये सर्व जण एकेक दिवस पुढे ढकलताना दिसत आहेत.
मला घरात बसण्याची सवय लागून बरीच वर्षं झाली. सकाळी/संध्याकाळी फेऱ्या मारण्याचं केव्हाच सोडलं आहे. आता आजुबाजूचा भाग खूप शहरी झाला आहे आणि खूप दूर गेलं तरीही बदल होत नाही. त्याच त्याच प्रकारच्या इमारती, दुकानं बघायला कंटाळा येतो. तीस वर्षांपूर्वी गावासारखा मोकळा ढाकळा भाग, घरं दोन किमि गेल्यावर दिसत. तसं नाही. तिथे उलट तीसमजली इमारती आहेत. त्यामुळे बाल्कनीची पिटुकली बाग हीच हिरवाई. आता भटकंतीला गेल्यावर डोंगरात जी काही होईल तेवढीच उरली. एरवी पुस्तकं/ मासिकं वाचतो. ओनलाईन पेपर्स इ -पेपर्समुळे घरातली रद्दी उगाचच वाढत नाही. पुराणं डाउनलोड केली आहेत. ती वाचायला बराच वेळ जातो. जियो-टिवी वर भरपूर चानेल्स आहेत. घरच्या डिटिएचवरही कार्यक्रम डाउनलोड करून हवे तेव्हा बघतो. मला हवी असलेली बरीच इंग्रजी मासिकं ( इंडिया टूडे, डिस्कवर इंडिया, लोनली प्लानिट, वगैरे) जिओ-न्यूज app वरून डाउनलोड करता येतात. ती वाचतो.
हल्ली पावसाळा आणि थंडीतली डोंगर भटकंती न करता मे महिन्यातली सुरू करून पाच वर्षं झाली. ते या वर्षी बुडीतमध्ये जमा आहे. कुटुंबाबरोबर फेब्रुवारी आणि सप्टेंबर या महिन्यांत दुसऱ्या राज्यांत सहली होतात. पण या वेळी का कुणास ठावूक 'आता यापुढे हातपाय धड नसले तर फिरता येणार नाही' या विचाराने दिवाळी २०१९ ते मार्च २०२० तीन सहली पटापट केल्या. शेवटची सहल आटपून घरी आलो आणि सात दिवसांत सर्व वाहनं ठप्प झाली. योगायोग म्हणा.
आता जमावबंदी/संचारबंदी आहे. पण जरा एक तास फेरी मारून कुठे काय परिस्थिती आहे पाहून येतो. काही भागांत इमारतींत रुग्ण सापडल्याने रहिवाशांचा वावर अडकवला आहे. सकाळी नऊला भाजीवाला, दूध येते. कचऱ्याची गाडी येते. मग सर्व बंद. पण इतर ठिकाणी लोक बाजारहाट करत फिरत आहेत.
कठीण प्रसंगी लोकांनी समजून उमजून मदत करण्यातच शहाणपणा आहे.
हॉस्पिटल, बँक, आरोग्यखाते कर्मचारी तसेच दूध आणि भाजी आणणारे सतत काम करून इतरांची सुखसोय पाहात आहेत. त्यांना चांगली प्रतिकार शक्ती मिळो हीच इच्छा व्यक्त करूया
छान लिहिलंत काका.
छान ! आवडले
छान लिहिलंय.
वाह
पहीला परिच्छेद अगदी रोखठोक
In reply to पहीला परिच्छेद अगदी रोखठोक by सतिश गावडे
सगासर.
In reply to सगासर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्पर्य, परमेश्वर सर्वत्र
In reply to तात्पर्य, परमेश्वर सर्वत्र by सतिश गावडे
हा हा
देव पाण्यात घालणे, वगैरे काही
In reply to देव पाण्यात घालणे, वगैरे काही by कंजूस
गरूड आणि साप मावसभावंडे.
छान लिहिलंय.
In reply to छान लिहिलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद प्रा डॉ ..
छान!
नमस्कार !
In reply to नमस्कार ! by धर्मराजमुटके
भारीच !
धर्मराजा, हे करा.
सकाळी साडेनऊ ते साडेदहा चार
विमान सेवा
In reply to विमान सेवा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कार्गो (मालवाहतूक) सुरू आहे
In reply to कार्गो (मालवाहतूक) सुरू आहे by प्रचेतस
हौ
लॉकडाऊन चं पुराण लिहिता
आज पहिल्यांदा कुणीतरी
@ सान्वी, खरं आहे. सर्वात
आशा' ही जीवन है, लेकिन आशा की
चांगले लिहिले आहे.