Skip to main content

ओसाड राजमार्ग

लेखक जयवी यांनी सोमवार, 30/03/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
सोपं जगायची सवय झाली की .... कठीण उत्तरं नकोशी होतात थोडीशी बेरीज, वजाबाकी करुन उत्तरं कशीबशी जुळवता येतात. उगाच ती क्लिष्ट आकडेमोड कशाला सापडतोच कुठला तरी वशिला चढ उतार नकोच असतात आडवळणं मग शोधली जातात तीच वाट दाखवतो पुढच्या पिढीला नकळत आडवळणाचेच बनत जातात..... राजमार्ग नकळत मिरवत जातो दिमाखात त्याच मार्गावरुन खरी वाट सोयिस्करपणे विसरुन सवयी त्याच अंगवळणी पडतात आणि खरे राजमार्ग ओसाड पडतात. जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2312
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

खुप छान कविता -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

कविता आवडली. मात्र ह्यावर थोडा प्रकाश कविच्या नजरेतून टाकाल काय? सोपं जगायची सवय झाली की .... कठीण उत्तरं नकोशी होतात हे, आणि आडवळणाचेच बनत जातात..... राजमार्ग नकळत हे, परस्पर विरोधी वाटते कां?

In reply to by अरुण मनोहर

कविता छान आहे. राजमार्ग = श्रेयस्कर मार्ग आडवळण = भ्रष्ट मार्ग त्यानंतर आडवळणाचा झालेला राजमार्ग = रुळलेला भ्रष्ट मार्ग ..येथे राजमार्ग अवतरणांत ! असे मी समजलो. -- लिखाळ.

सोपं जगायची सवय झाली की .... कठीण उत्तरं नकोशी होतात हम्म्म्,,सत्य... मदनबाण..... जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीला अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. जालावरुन सभार...

चढ उतार नकोच असतात आडवळण मग शोधली जातात अगदी खर आहे. खास कविता जयुताई. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}