Skip to main content

एक हजार रुपयांची नोट तुम्हाला सापडली तर तुम्ही काय कराल?

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 29/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1198
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

दुसर्‍या पर्यायाला मत दिले असते ;-) घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

In reply to by अनंता

नोट खरी आहे की कसे त्यावर बरेच अवलंवुन आहे आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

पैसे कुठे सापडतात यावर ते अवलंबून आहे. जर ते माझ्याच खिशात मिळाले तर स्वतःच्या गचाळ पणाबद्द्ल स्वतःलाच २-४ शिव्या घालेन. माझ्या घरच्या पुस्तकात वगिअरे सापड्ले तर घरी कोणी पैसे असे निष्काळजी पणाने ठेवले अशी विचारणा करेन आणि ते आईकडे देईन. पण जर ते पैसे रस्त्यात पडलेले सापडले तर मात्र मी ते उचलणार नाही. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

तिसर्‍या पर्यायाला मत दिले आहे! :) आपला, (कलीयुगातला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

१०००००००००००००००००००००००००१ % सहमत विथ "तात्या". :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

प्रामाणिकपणे ते पैसे माझ्याजवळच ठेवीन. संध्याकाळी आवडत्या स्त्रीसोबत मद्याचे दोन दोन घोट घेईन.

In reply to by सोपान

अरे वा! तुम्हाला आमची ष्टाईल जमायला लागली म्हणायची! :) तात्या.

एक हजार रुपयांची नोट तुम्हाला सापडली तर तुम्ही काय कराल? आणखिन २-३ नोटा जवळ पास सापडतात का याचा शोध घेईल...

In reply to by अविनाशकुलकर्णी

आम्हाला हा प्रश्न गैरलागू आहे कारण आमच्या पाठीत वारा भरला आहे ;-) घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

इतर काहीतरी वेगळे .... उदा. मिपाकरांचं एक छान गटग करु, मग ठरवु त्या हजार रुपयांचे काय करायचे ते? सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

पेपरमधे वैद्यकिय उपचारासाठी कुणी मदत मागितली असेल तर ते १००० रुपये त्यांना पाठवुन देईन.

एक हजार रुपयांची नोट तुम्हाला सापडली तर तुम्ही काय करणार नाही? असा काथ्याकुट काढु. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

बाकी मी नेमक काय करेल सा॑गता येत नाही, हल्ली "फुकट ते पोष्टीक" चा जमाना आहे. सुहास.. (महात्मा गा॑धीचा फॅन(नोटेवरचा))

सर्व पैसे अनाथ आश्रम किवा गोरगरीबांमधे वाटेन अजून पर्यंत तरी सर्वात जास्त मत ह्यालाच आहेत... टोटल ९ मते २० पैकी, म्हणजे मिपाकरांमध्ये माणूसकी पण ठासून भरली आहे हे पाहून अत्यांनद झाला ! लै भारी मित्रांनो / मैत्रिणींनो! लगे रहो ! नेकी कर दर्या में डाल ! चांगले काम केले की विसरुन जावे माणसाने ;)

In reply to by दशानन

चांगले काम केले की विसरुन जावे माणसाने
:) आणि वाईट कामे केली की कुठे तरी लिहून ठेवावे का ? विसरू नये म्हणून ? =)) बालपणी कधीतरी एकदा नकली नोटा रोड वर ठेऊन कुठे तरी लपून "कोण काथ्याकुट काढू" ती नोट उचलतो ते पहायचो .. आणि त्याने ती नोट उचलल्यावर त्यावर बच्चन चा फोटू पाहून त्याच्या तोंडाचा कसा गांधी व्हायचा ते पाहून एकच कल्ला करायचो .. असो जुणी गोष्ट आठवली .. आता नोट उचलण्याआधी कोणी डाव तर केलेला नाही ना हे तपासून पाहावे ..

In reply to by दशानन

नेकी कर दर्या में डाल ! चांगले काम केले की विसरुन जावे माणसाने हा विचार शेअर मार्केट ला व्यवस्थित लागु होतो... (कर्मण्ये.. सारखा).. :) सुहास

शेवटच्या पर्यायास मत दिले आहे. मी त्या पैशांना हात लावणार नाही. रेवती

In reply to by रेवती

मी त्या पैशांना हात लावणार नाही>> मग काय पायाने ऊचलनार का ?? सुहास.. भले-बुरे जे घडुन गेले || विसरून जाऊ सारे क्षणभर || जरा विसावु या वळणावर || या वळणावर ||