Skip to main content

[शशक' २०२०] - समाधी

लेखक मोहन यांनी रविवार, 26/04/2020 14:46 या दिवशी प्रकाशित केले.

समाधी




दोन तपांच्या अविरत योग साधने नंतर त्याच्यावर गुरूकृपा झाली. निर्विकल्प समाधी अवस्थेपर्यंत तो शेवटी पोहोचला होता. गुरू आज्ञा घेवून तो झपाट्याने निघाला. त्याला आता साधने करता एकांत हवा होता. "भोवतालच्या भौतिक नियमांच्या विपरीत अनेक गोष्टी तू करू शकशील, त्या मोहा पासून दूर राहीलास तरच आनंदावस्थेत राहून अंतीम ध्येयापर्यंत जाशील". हे शब्द त्याच्या डोक्यात घुमत होते. समोरचे शांत सरोवर. काठावरच्या वटवृक्षाने त्याला खूणावले. लगेच सिध्दासनात ध्यानमुद्रा लावून तो समाधिस्थ झाला. अंगुष्ठमात्र जीव, शरीर सोडून सरोवराच्या पृष्ठभागावर सहज विहार करू लागला , स्थळ - काळाच्या बंधना पलीकडे जाऊन. . . . . त्या रानात दबा धरून बसलेली लांडग्यांची टोळी सुखावली . प्रतिकार करू न शकणारे सावज आयतेच गावले होते.


वाचने 6123
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया