Skip to main content

[शशक' २०२०] - पिंजरा

लेखक गुल्लू दादा यांनी शनिवार, 18/04/2020 13:56 या दिवशी प्रकाशित केले.

पिंजरा




दहा बाय दहाच्या खोलीत येऊन पडली तेव्हाही तिच्या हातात काहीच नव्हतं आणि आजही काहीच नाही. तिचं नाव फक्त बिस्तर गरम करण्यापुरतं मर्यादित असायचं. कोवळी होती तेव्हा पांढरपेशांनी तिचा उपभोग घेतला. थोडी कोमलता काय लोप पावली तो मिळेल त्याच्या खाली ती झोपली. वेळ पडल्यास दोन-दोन जणांना उरावर घ्यावं लागायचं. श्वास घ्यायचीही उसंत मिळत नसायची. हुंकार, उसासे, खोट्या आणाभाका, उग्र वास, नवीन-जुने गिऱ्हाईक, भांडणे एवढंच तिच्या नशिबी. तिला सकाळच्या कोवळ्या उन्हात अंग शेकायला विशेष आवडे पण तिच्या वाट्याला होता फक्त अंधार. याच अंधारात निपचित पडून मोजत होती ती शेवटच्या घटका. . . . ....शारीरिक भुकेल्यांची भूक भागवून भागवून जीर्ण झालेली कमाठीपुऱ्यातील एक गादी...


वाचने 6154
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

+१

+१. कथेला चांगली म्हणवंत नाही. -गा.पै.

+१

+१

आवडली

वेळ पडल्यास दोन-दोन जणांना उरावर घ्यावं लागायचं.
दोन जण तर नॉर्मल च ना? वेळ पडल्यास तीन तीन जणांना उरावर घ्यावं लागायचं. असं हवं. (गादीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने)

अनपेक्षित शेवट

+1

+१

+१

+1

+1

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार...