Skip to main content

[शशक' २०२०] - मेजवानी

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 25/04/2020 17:16 या दिवशी प्रकाशित केले.

मेजवानी




परवा एक वटवाघूळ खाल्ले. झकास होते. च्याऊंग गुहेच्या आतल्या भागात सापडले. मेजवानीच. पण काहीही म्हणा, डोंगराखालच्या मातीत वळवळणाऱ्या गांडूळाची सर कशालाच नाही. संध्याकाळी अजगराची कातडी सोलताना ठसका लागला. मग दोन उंदीर खाल्ले तेव्हा कुठे आराम पडला. रात्री सुग्रास कुत्रं खाऊन निवांत झोपलो. सकाळी खोकतंच उठलो. बागेत जाऊन दोन लुसलुशीत सुरवंट गिळले. मग दोन मांजरी पकडून, कापून, फोडी फोडी करून, मिरची आणि कोथिंबीर लावून बरणीत मुरवायला ठेवले. कच्च्या फोडी म्हणजे स्वर्गसुखच. मग बेडुक फ्राय आणि झुरळांची चटणी असा खमंग नाष्टा केला. पण खोकला थांबेचना. मग माकडाचे सुप पिलो. संध्याकाळी ताप आला आणि डोके दुखायला लागले. तेव्हा समजले, खाण्यात काहीतरी चुकलंय जरूर..


वाचने 6091
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

-1

+१ चिनी लोक असेच काही खातात पितात असं ऐकून आहे.

+१

+१

फक्त एक सल्ला, हिंदी चमगादड वापरणे ते ही चमकादड म्हणून काहीच अर्थ नाही, हे शशक असल्यामुळे शब्दाशब्दाला महत्व आहे तरीही तुमची मर्जी असल्यास संपादकांकडून त्याजागी वटवाघूळ हा शब्द योजून घेण्याचे करावे.

खाण्यात काहीतरी चुकलंय जरूर
काहीतरी? एकतरी बरोबर आलंय का खाण्यात!! Corona var आजारपण थांबलं ते नशीब!!

+१ आवडली! ढेकणांची उसळ आणि सुकवलेल्या पालींच्या पिठापासून बनवलेले घावन खाल्ल्यास हा आजार नक्की बरा होईल 😜


कोरोना तयार करण्याची पाककृती