Skip to main content

[शशक' २०२०] - लोचट

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 22/04/2020 17:59 या दिवशी प्रकाशित केले.

लोचट




तिच्या संशयी, विकृत, दारुड्या नवर्याने भर दुपारी तामाशा करत विवस्त्र आवस्थेत तिला घराबाहेर काढली आणि आमच्या उच्चभ्रू सोसायटीच्या खिडक्या सुध्दा बंद झाल्या. “अजून कोणता अपमान होण्याची गरज आहे? एकदांचा तुकडा का पाडून टाकत नाहीस?” तिच्या अंगावर ओढणी टाकत मी विचारले. “ताई मी अनाथ अडाणी बाई कुठे जाऊ? अजून चारपाच वर्षात माझ्या दोन्ही मुली हाताशी येतील मग एक दिवसही या भाडखाऊला सहन करणार नाही. तो पर्यंत मला निमुटच राहावे लागेल” आज सहा वर्षांनी तिचे ते शब्द मला पुन्हा आठवले जेव्हा ती माझ्या समोर रक्ताने माखलेला सुरा घेउन उभी होती आणि सांगता होती “ताई मी परत येई पर्यंत माझ्या मुलींकडे लक्ष ठेवा”


वाचने 9612
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

"आणि आमच्या उच्चभ्रू सोसायटीच्या खिडक्या सुध्दा बंद झाल्या." काय वाक्य आहे हे! वा. सुरेख मांडणी.

In reply to by मनस्विता

माझ्या अंदाजे इतक्या नालायक माणसा बरोबर त्या बाईने आणखीन सहा वर्षे लोचटपणे काढली म्हणून असेल किंवा इथे 'लावसट' अपेक्षित असून चुकून त्याचे 'लोचट' झाले असावे! खरा संदर्भ लेखक/लेखिकेकडून स्पर्धा संपल्यावर मिळेल अशी आशा करुयात.