Skip to main content

[शशक' २०२०] - बातमी

लेखक शब्दानुज यांनी शनिवार, 25/04/2020 20:46 या दिवशी प्रकाशित केले.

बातमी




"पेपर कुठे आहे ग? मला सकाळी चहासोबत पेपर लागतो माहिती आहे ना? " "टेबलवरच आहे. जरा बघत जा आजूबाजूला. " "सापडला एकदाचा. हे काय पुन्हा एक बलात्काराची बातमी ! " "अहो ते रोजचेच झाले आहे आता. आम्हा बायकांना बाहेर फिरायचेच अवघड करुन टाकले आहे ह्या नराधमांनी. अगदी काही महिन्याच्या पोरीपासुन ते जख्ख म्हातारीपर्यंत कोणालाही सोडले नाही ह्यांनी. "अगं पुढे म्हटले आहे की या प्रसंगात खुनापर्यंत गेली आहे त्यांची मजल." "अहो म्हणूनच हे प्रकरण उघडकीस आले म्हणायचे. नाहीतर अश्या कित्येक केसेस बाहेरच येत नाहीत. " "हे मात्र खरे की खुन झाला नसता तर ही घटना उघडकीस आलीच नसती " "का हो ?" "पिडीत व्यक्ती 'ती' नाही , 'तो' आहे !"


वाचने 4201
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

+१ बाबौ ! विचार करण्याजोगे.

आवडली.

+1

हा विचार कोणीच करत नाही

आयपीसीप्रमाणे पुरुष बलात्कार पिडीत असू शकत नाही. शिवाय त्याचा मर्डर केल्यामुळे घटना उघडकीस आली हे फारच गौडबंगाल आहे

+१ चांगली कथा आहे. एका पुरुषाचा खून झाला असता त्याच्यावर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले - हे असे मृतदेहाच्या शारीरिक तपासणीत आढळले का कसे ?

+१

+१

+1

+१

+१