Skip to main content

[शशक' २०२०] - कडं

लेखक योगी९०० यांनी शनिवार, 25/04/2020 12:12 या दिवशी प्रकाशित केले.

कडं




बँकेत ती "कुठे आहे तो" हेच शोधत होती. "तो कोण?" ते तिला माहीतही नव्ह्ते. रोज लोकलच्या डब्यातील मधल्या जाळीतून एकमेकांकडे पहात नयनमटक्का खेळायचे. एकदम रुबाबदार, नीटनेटके कपडे, थोडासा सावळा असा तो तिच्या मनात पहिल्यांदा पहाताक्षणीच भरला होता. तिच्याकडे हळूच बघताना तो केसांवरून हात फिरवायचा, त्यावेळी त्याचे हातातले कडं तिच्या डोळ्यात मस्त चमकायचे. तो बॅकेत काम करतो हे कळल्यावर मुद्याम काम घेऊन ती आली होती. वाटेत त्याच्याशी लग्न झाले तर रोज त्याचे कडं पुसेन असली स्वप्ने रंगवतच ती आली होती. "शिपाई.... पाणी आणा मॅडमसाठी..." . . . . . . . . . . दुसरे दिवशीपासून तिने लोकलची वेळ बदलली. तिच्या मनातले भरलेले त्याचं कडं त्या शिपायाच्या हातात अजिबात शोभत नव्हतं.


वाचने 11144
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

+१

+१ * नयनमटक्का >>> छान शब्द. अर्थ काय ? ? मिचकावणे .

In reply to by हेमंतकुमार

@ कुमार१ ऑंख मटक्का , नैनमटक्का हिंदीत मुबलक वापरतात. बॉलीवुडी भाषेत तर हमखास. अर्थ = नेत्रपल्लवी :-)

In reply to by अनिंद्य

बराच अनुभव दिसतोय तुम्हाला त्याचा !!

,,+१

+१

+1

+१

श श क स्पर्धेत रोजच्या प्रवासात 'नयनमटक्का' मधून होणारे दोन झोल वाचायला मिळाले. इच्छुकांनी सावध राहावे, अशी विनम्र सूचना.

In reply to by तुषार काळभोर

हे ‘इच्छुकांनी लाभ घ्यावा’ असे पाहिजे ना ? ;-)

In reply to by अनिंद्य

इच्छुकांनी काळजीपूर्वक बघून लाभ घ्यावा.

+1

+१

+१

+१

+१ आवडली.

+१ आवडली

+१ आवडली

+१

+१