॥ करोनाष्टके ॥
घरी बैसोनी शिणलो रे , पकलो रे रामराया ।
परमदिनदयाळा, त्वरीत हर रे करोना ॥
कहर याचा जगभर, नावरे आवरीता ।
स्पर्ष होताच पसरे, तूच रे एक त्राता ॥ १ ॥
कुणी तरी अकलेचे, पाजळती दिवे रे ।
करोना वरील उपाये, होई हैराण मी रे ॥
त्याच त्याच फॉर्वर्डनी, नेट ते व्यर्थ जाई ।
रघुपती मती माझी, कुंठीत होत जाई ॥२॥
हापिसा मध्येच रामा, सर्वही जन्म गेला ।
किती एक दिवस रात्री, माझ्या मी एक केल्या ॥
घरून काम करण्याची, सवय कैसी जडावी ।
सकाळी उठून वाटे, हापिसची बस धरावी ॥ ३ ॥
कितीही लाटली तरी, पोळीचा गोल नाहीं ।
दयार्द्र नजरेने, त्या कडे पत्नी पाही ॥
रोजच जेवाणांत, नवनवे अन्न हावे ।
अनुदिनी वरणभाते, मन कैसे भरावें ॥ ४ ॥
नऊ वाजता पहातो, जीवनपट राघवाचा ।
माध्यांन्नी मग दिसे रे, पुढिला जन्म त्याचा ॥
सवयी बदलून गेल्या, मागल्या सर्व काही ।
हॉटेल सिनेमा मॉलची, राहिली गरज नाही ॥ ५ ॥
अजापुत्रा सम भासे, मुखमंडल आरशात ।
मास्कच्या पाठीमागे, ते बरे लपतात ॥
केश संभार माझा, नावरे आवरीता ।
सलून कधी उघडेल, सांग ना लोकनाथा ॥ ६ ॥
जळूनी जळूनी चरबी, ती कितीशी जळावी ।
चार भिंतीच्या आत, काय मॅरेथॉन पळावी ॥
तळमळ होते रे, विशाल ते पोट बघता ।
परंतू जिव्हा ही, नावरे आवरीता ॥ ७ ॥
धनी गेले का आहेत, शर्ट पॅन्टीस विचारे ।
लुंगी उसळून सांगे, हाल माझे बघा रे ॥
अष्टौप्रहर सतत मी, त्यांस चिकटून राही ।
क्षण भर रामा रे, मोकळा श्वास नाही ॥ ८ ॥
प्रभात फेरीस अजूनही, वानरे रोज जाती ।
घरी बसून बसून म्हणे ती, मर्कटे बोर होती ॥
पोलीस होती हैराण, बाळलीलांनी यांच्या ।
काळजी समाजाची, नाही खिजगणतीत त्यांच्या ॥ ९ ॥
निसर्गा पुढे सदैव, मानव बहू थीटा रे ।
नसावा कधी मानसीं, ज्ञानगर्वाचा फुगा रे ॥
लॉकडाउनची सुसंधी, व्यर्थ जाऊ नये रे ।
जळमटे अंतरीची, समूळ घालावी रे, ॥ १० ॥
सबळ प्रभू माझा, राम लावण्यकोटी ।
म्हणवुनि मज पोटीं, लागली आस मोठी ॥
दिवस गणित बोटीं, ठेवूनि प्राण कंठीं ।
झडकरी सोडावी रे, ही कराल मीठी ॥ ११ ॥
अंती एक विनंती , तूजला लोकनाथा ।
नको अति अंत पाहू, आमुचा रे अनंता ॥
झडकरि झड घालीं, धांव पंचानना रे ।
लवकर संपवावी, लॉकडाउनची सजा रे ॥ १२ ॥
पैजारबुवा,
वाचने
18438
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा !
पद्यमय लिखाणाचे स्वागत
अफलातून ..
अफलातून काव्य पैंजारबुवा
वाह ! नंबर एक.
प्रश्न १ ला. कवीने कवितेतून कोणता आशय व्यक्त केला आहे. सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर : प्रस्तुत कविता ज्ञानोबाचे पैजार उर्फ बुवा यांनी 'माझे मिपाचे साहित्य प्रयोग' या काव्य उर्फ सरसकट साहित्य लेखन संग्रहातून निवडली आहे. या कवितेत कवी लॉकडाऊनच्या काळातील चित्रण करीत आहे. लॉकडाऊनच्य काळातील जनजीवनावर जो काही परिणाम झाला आहे त्याची दाहकता वरील कवितेतून येतांना दिसते. लॉकडाऊनच्या काळातील ज्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याची चित्तर कथा 'करोनाष्टके' यातून आलेली आहे. करुनाष्टके ही कारुण्यपूर्ण भावनेनी भरलेली असतात मात्र इथे 'करोनाष्टके'तून कोव्हीड १९ कडे कवी आपलं लक्ष वेधू इच्छितो. ही कविता अत्यंत हलकी-फूलकी आणि तरल संवेदना जागवणारी आहे. पहिल्या चार ओळीतून वयोमानाने आणि परिस्थितीमुळे थकल्याची भावना कवी व्यक्त करत आहे. जेवण-झोपणे आणि शिल्लक काही मध्यानरात्रीपर्यंत काम-काज उरकून 'पकलो रे रामराया' ही भावना सामान्य माणसाच्या बोथट झालेल्या भावनेचं चित्रण आहे. पुढीच चार ओळीतून जो आशय व्यक्त झालेला हे तो अतिशय सुंदर आहे. 'कुणी तरी अकलेचे, पाजळती दिवे रे' या ओळीतून त्यांनी कोणीही येतो आणि काहीतरी उपाय सांगतो असा आशय आहे. एक चीड एक संताप त्यातून दिसून येतो. दुसरा दिव्यांचा संबंध लोकांनी ज्या रात्री हातात दिवे घेऊन मिरवणूका काढल्या त्या संदर्भात नसला तरी आपण तसे अर्थ काढू शकतो. माध्यमांद्वारे तेच तेच येणारे फॉर्वर्डस याने कवी वैतागून गेला आहे. माझी मती कुंठीत झाली आहे, असे कवी वरील ओळीतून आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. बाकीचं उत्तर दिवसभरात नीवांत किंवा भविष्यात कधीही लिहीनच. सध्या चार गुणांचे उत्तर लिहिले आहे. मोबाईलला एक ओएस टाकायची आहे. मग निवांत येतो इकडे. -दिलीप बिरुटेगुण : १२
=))
In reply to वाह ! नंबर एक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फार सुंदर परीक्षण
In reply to वाह ! नंबर एक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडले...
In reply to वाह ! नंबर एक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जळूनी जळूनी चरबी, ती कितीशी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kya Yahi Pyar Hai (The Unwind Mix) by Meiyang Chang & Shashaa Tirupatiहा .... हा .... हा ......
वाह ..वाह
वा..!
वा, भारी लिहीले आहे पैजारबुवा
Corona Go, Corona Go... Go
हा..हा..हा
+११११११११
In reply to हा..हा..हा by चांदणे संदीप
पैंबू
अगदी मार्मिक कविता, मस्तच...
खल्लास लिहिलंयत करोनाष्टके.
+१
In reply to खल्लास लिहिलंयत करोनाष्टके. by प्रचेतस
भारी.. मस्त लिहिले आहे,
फोटो टाक तुझ्या धाग्यात..
In reply to भारी.. मस्त लिहिले आहे, by गणेशा
"आमचा गणेशा झाला... फोटो दिसत नाहीत"आमचा बदला पूर्ण होईल. :Dमी बदला घेउ देणार नाही.. :)
In reply to फोटो टाक तुझ्या धाग्यात.. by मोदक
लिहितो लवकर साधेसे मी पण
In reply to भारी.. मस्त लिहिले आहे, by गणेशा
पैजारबुवा, __/\__ =))
हेच बोल्तो...
In reply to पैजारबुवा, __/\__ =)) by सस्नेह
छान!
मस्त!!
वा !! अप्रतिम.
खूप छान
वाह काय भारी आहे
खूपच मस्त. आवडली कविता
पैजारबुआ
आज निवांत वाचली पुन्हा.. .
जबराव जबराव जबराव
॥ करोनाष्टके ॥ आवडली हो पैजारबुवा!
एक लंबर..
उत्तम काव्य.