आणि...

"राम राम मरा मरा"
अगं मिना हे काय तु उलटं बोलायला लागलीस आणि एव्हढी का घाबरतेस मी आहे ना ?
आणि भुतभीत काहीही नसतं गं.
मिना तशी पहिल्यापासुन घाबरटच मुळी. आज तालुक्याला दाताचं दुखणं दाखवुन ती ताईसोबत पुन्हा गावात परतत असताना संध्या ७.३० वाजले .
काळोखात एकच मिणमिणती बॅटरी घेवुन दोघी घराकडे निघाल्या. वाटेत पिंपळाचा पार लागला तशी मिनाने रामाचा धावा चालु केला होता.
"अगं ताई चल ना लवकर"
"हो तु चल मी येतेच आहे मागे मागे"
एकदाचा तो पार मागे पडला आणि मिनाने हुश केले.
बस ताई सुटलो असे मागे वळुन तिने म्हंटले आणि
आणि बघतो तर ताई गायब झाली होती….

वाचने
3422
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
+1
+1
+१
+१
+१
+१ आवडली कथा
+१