Skip to main content

[शशक' २०२०] - लव्हमॅरेजचा किडा

लेखक डोरू यांनी सोमवार, 20/04/2020 14:48 या दिवशी प्रकाशित केले.

लव्हमॅरेजचा किडा




ऑफिसात मुली सतत माझ्याबरोबर बोलण्यासाठीचं एकही कारण सोडत नसत. कारण कुणाचं ठाऊक जिभेवरची साखर की, सर्व कामं चुटकीसरशी करण्याची करामत. त्यातच आईबाबांची माझ्या लग्नासाठी असलेली घाई. पण बहाद्दरच्या डोक्यात लव्हमॅरेज करण्याचा किडा. नेहमीप्रमाणे बसमधून घरी जाताना माझ्यासमोर एक सुंदर, लोभस, कुणीही बघताचक्षणी प्रेमात पडावं अशी विशीतील मुलगी उभी होती. त्या दिवसापासून बसमध्ये समोरासमोर येण्याचा आमचा रोजचाच दिनक्रम सुरू झाला. नजरानजर भिडली की, हळूच एकमेकांचं गालातल्या गालात हसणं सुरू झालं. एकेदिवशी मी तिच्याबरोबर स्टॉपवर उतरलो. काही अंतर पुढे गेल्यावर मी तीला थांबवले आणि विचारले, ' माझ्याबरोबर मैत्री करायला आवडेल काय?' ती क्षणाचाही विलंब न करता उत्तरली... "हो साहेब पण पाचशे रुपये घेईन."


वाचने 13084
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

=)) शेवटचं वाक्य हिंदीत हवं होतं. मजा आली असती. +१

+१

+१ सं - दी - प

भारीय. +१ -दिलीप बिरुटे

Impact मस्त

+१ भोळा रे भोळा, नाही ओळखू आली !

सेठ, पाचसौ रुपये लगेंगा! एकदा मंगला सिनेमा समोर (नव्या पुलाची सुरुवात) गाडीवर जात असताना भ्रमनिरास झालेला ;) मी वळून बघत होतो अन् मागे बसलेल्या मित्राने वस्तुस्थिती सांगितली.

In reply to by तुषार काळभोर

सेठ, पाचसौ रुपये लगेंगा! किंवा "ए चिकने, पाचसौ लेगी मै.." (टाळी वाजवत). हे लै फिट बसलं असतं. =))

+१

भारी म्हणजे भारी आवडली गोष्ट पैजारबुवा,

+१

:ड

+१

+१

+१

मस्त

कथानायक एकदम वरणभात नसता तर सदरहू कथा घडलीच नसती लॉळ

+१ कथानायक फारच चम्या आहे बहुतेक.

+१ आवडली! फक्त कथेत "एक सुंदर, लोभस, कुणीही बघताचक्षणी प्रेमात पडावं अशी विशीतील मुलगी" असल्याने पाचावर तीनाच्या ऐवजी चुकून दोनच पूज्य पडली असावीत का? अशी एक शंका उगीचच मनात आली 😜 कृपया हलके घेणे!

+१

+१

+१

+१