अर्थतज्ञ

तसा तो सगळे नियम पाळून रहात होता. पण सुरवातीचा काळ गेल्यावर, तरीही लॉकडाऊन चालू ठेवणे कितपत उपयोगी ठरेल याबद्दल साशंक होता.
आपली मते तो नेटवर नेटाने मांडत होता. रोगाच्या प्रसाराएवढेच आर्थिक परिस्थितीचेही भान ठेवले पाहिजे, असा त्याचा आग्रह होता.
पण लॉकडाऊन वाढतच गेला. पुढे पुढे जीवनावश्यक गोष्टींचाही तुटवडा वाढला. सरकारला बर्याच सवलती द्याव्या लागल्या.
आता घरोघरी तपासणी सुरु झाली. त्याचीही झाली.आणि तो बाधित निघाला. तडक रवानगी हॉस्पिटलमध्ये! पण लक्षणे काहीच नव्हती.
तीन आठवड्यांनंतर सुटका झाली. जगाचे व्यवहार बरेच चालू झाले होते. त्याने कंपनीत फोन केला. कोणी उचलला नाही.
तो कंपनीत गेला. नोटीसबोर्डावर ती लिस्ट होती! त्याचेही नांव होते त्यांत!!!

वाचने
5497
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+1
??
मलाही नाही झेपलं...
In reply to ?? by कंजूस
एका सामान्य नागरिकाची कथा
In reply to मलाही नाही झेपलं... by चांदणे संदीप
तो कंपनीत गेला. नोटीसबोर्डावर ती लिस्ट होती! त्याचेही नांव होते त्यांत!!!म्हणजे मृत व्यक्तींंच्या यादीत त्याच नाव होतं!!.
In reply to एका सामान्य नागरिकाची कथा by जव्हेरगंज
कथेला नाही, पण ह्या प्रतिसादाला +१
In reply to . by चांदणे संदीप
बरी आहे! +१
गोष्ट वाचून लगेच कळली नाही.
ती लिस्ट (कंपनीच्या
In reply to गोष्ट वाचून लगेच कळली नाही. by पलाश
ती लिस्ट (कंपनीच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे) कामावरून काढून टाकलेल्यांची असेल का?हैला, हे लॉजिक पटतंय.. असंच असावं... मग जमलीये म्हणावी लागेल कथा..+१
+1
+ १
कंपन्यांनी पगारात काटछाट करु नये
+१