Skip to main content

[शशक' २०२०] - प्रपोज

लेखक शब्दानुज यांनी सोमवार, 20/04/2020 09:50 या दिवशी प्रकाशित केले.

प्रपोज




आज आभाळ भरून आले होते. कोणत्याही क्षणी पाऊस चालू होईल अशी परिस्थिती. अश्या रम्य वातावरणात ती माझ्यासमोर उभी होती.

'आज विचारूनच टाकतो. नाहीतर ही सल आयुष्यभर मनात तशीच राहिलं. इतके दिवस ती माझ्यासोबत आहे ,ती का म्हणून नाही म्हणेल ? '
माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. अनेक दिवसांपासून मी ज्या क्षणाची मी वाट पहात होतो तो क्षण जवळ आला.

मी तिच्यासमोर गुडघ्यावर बसलो आणि "माझ्याशी लग्न करशील ?" हा प्रश्न तिला विचारला. तिच्या चेह-यावर आश्चर्याचे भाव स्पष्ट दिसत होते. कातर आवाजात ती म्हणाली, "
.
.
"अहो भाजी आणता ना ?"
"हो. आणतो आता" असे म्हणत मी पेन टाकून डायरी बंद केली.गोष्ट अधुरीच राहिली.

कल्पनेतही !



वाचने 4132
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया