Skip to main content

[शशक' २०२०] - सॄजन!

लेखक राघव यांनी शनिवार, 18/04/2020 10:01 या दिवशी प्रकाशित केले.

सॄजन!




"आज काय करणार तो कोण जाणे.. दररोज आपलं इकडचं तिकडे!" "तुझी कौलं तरी शाबूत आहेत.. माझ्या पानांची तर दर दिवशी नवीन झैरात होते! पण कालची चांगली होती जरा." "ख्या..ख्या.. ते बरीक खरं हां.. आधी तर पुंगळ्या होत्या.. समजतंच नव्हतं की नक्की आहे काय!" "बास हां.. आधीच सटकलेलं आहे. काल तर आजुबाजूला पाणीच दिसायला लागलं होतं.. एरवी काही फुलं वगैरे तरी असतात..!" "जाऊ दे रे.. नवीन काय ते पाह्यचं.. वैतागलो तरी आपण वाट बघतोच ना दररोज त्याची?" त्या इवल्या हातांनी हळूच बाबाची स्केचबुक खाली घेतली आणि पलंगाखालच्या नेहमीच्या जागेत स्वारी निघाली.. आज त्या झाडाला घराच्या मागे तो नक्की फिट्ट करणार होता!


वाचने 4870
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

एक लहान मुलगा चित्र काढत असतो. त्या चित्रातल्या दररोजच्या दोन गोष्टी म्हणजे एक झाड आणि एक घर. त्या दोघांचा तो संवाद.

+१ मस्त, वेगळ्याच प्रकारची आहे. समजायला जड गेली होती, उत्खनक यांनी उलगडून दाखवल्यावर समजली.