"दूधपावडरचा डबाही घे किमान एक" - मी.
बायकोच्या मते मी खूपच घाबरत होतो. आधीच दोन तीन महिन्याचे रेशन भरायला सांगितल्याने ती वैतागली होती. पण लॉकडाऊन येणार हे निश्चित आहे हे मी तिला पुन्हा पुन्हा सांगत होतो.
"उद्या दुकानातील सगळी पेंडिंग कामं उरकून घे आपण परावापासून दुकान बंद ठेवतोय, अनिश्चित काळासाठी" माझा आणखी एक धक्का त्याच दिवशी तीस एप्रिलपर्यंतच्या फोटोग्राफीच्या सगळ्या ऑर्डर्स रद्द करून झाल्या होत्या .
"अख्ख्या जगाची भीती तुम्हालाच" म्हणून तिने अमूल स्प्रेचा डबा बास्केटमध्ये भरला आणि बिल घेऊन आम्ही वाणसामानाची 'गोण' घेऊन निघालो.
घरातल्या टीव्हीला केबल कनेक्शन नसल्याने रोजच्या बातम्या पाहणे होत नाही आणि एवढे दिवस थोडेफार ऐकून असली तरी मी तिला खरी परिस्थिती सांगितली नव्हती. त्यामुळे तिची चिडचिड स्वाभाविक होती पण माझी भीतीही अनाठायी नाही हे तिला तिसऱ्याच दिवशी कळले.
आम्ही नवरा बायको एक सायबर कॅफे वजा फोटो स्टुडिओ चालवतो, रेल्वे तिकीट, विमान तिकीट, मनी ट्रान्स्फर सारख्या सुविधा देत असल्याने उत्तर भारतीय, कामासाठी प्रवास करणारे हे आमचे मुख्य ग्राहक. त्यामुळे साहजिकच मी इतरांपेक्षा जास्त घाबरलो होतो. आणि माझ्या परिसरातील इतर दुकाने चालू असताना मी दुकान बंद केले. अर्थात हि परिस्थिती फक्त एक दिवसा पुरती रहिलि कारण पोलीस प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी नाक्यावरची सगळी दुकाने बंद करावी लागणार हे जाहीर केले आणि अनेकांची तारांबळ उडाली.
आता एवढ्या मोठ्या सुटीत काय करायचे हे मी ठरवून ठेवले होते. वॉचलिस्टमध्ये असलेले फोटोग्राफीसंबंधित असंख्य युट्युब व्हिडीओ आधी पाहायचे आणि युडेमीवर असलेला फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी कोर्स सबस्क्राईब करून पूर्ण करायचा एवढं लक्ष्य होतं कारण रोजच्या कामाच्या वेळात हे शक्य होत नव्हते. त्याचबरोब फोटोग्राफीमध्ये काही प्रयोग करायचेच होते. पण लॉकडाऊन सुरुवातीलावाटलं तेवढं सोपं नसणार हे पहिल्या दोन तीन दिवसांत कळून चुकलं. नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त दिवसेंदिवस कडक होत असल्याने दुकानात जाणे कठीण वाटू लागले. त्यात मी राहात असलेल्या इमारतीतील लोक अत्यंत बेशिस्त आणि बेजबाबदार वागत असल्याने इथे न थांबता गावातील घरी जावं लागेल एवढं कळून चुकलं. आता गावात इंटरनेटही अगदी स्लो असल्याने फोनवर व्हिडिओ पाहणे कठीण झाले. तसेच घरी असताना मुलाला सांभाळण्याची जबाबदारी आपसूकच माझ्यावर येऊन पडल्याने काही शिकायचं झालं तरी त्यात व्यत्यय येत होता.
आता शेवटचा एकच पर्याय शिल्लक राहिला होता आणि तो म्हणजे फोटो काढणे.
गावात असल्याने एक फायदा झाला होता कि मला मॉर्निंग वॉकला जात येत होते. घरापासून गावचे निवांत असलेले शिवमंदिर दोन किमीवर आहे आणि तिथून नदी एक किमी, येऊन जाऊन सहा किमी चालणं सहज होऊन जातं. सकाळी या अख्या पायपिटीत एकही माणूस भेटत नसल्याने सोशल डिस्टंसिंग वगैरेची चिंता नव्हती. मग सकाळी कॅमेरा, एक १८-५५एमएम ची किट लेन्स आणि एक ५०एमएम लेन्स असं सामान घेऊन रोजची पायपीट सुरु झाली. सुरुवातीला फोटो कश्याचे काढायचे हा प्रश्न होता मन निसर्गाने तो सहज सोडवून दिला. उन्हाळ्यात होणारी वृक्षतोड, वणवे आणि गाव ते नदी असे झालेले रस्त्याचे खोदकाम यामुळे बरीच झाडे तोडली/उपटली गेली होती. आणि या झाडांना आता नव्या जोमाने पालवी फुटत होती. मग मनात तोच थीम ठेऊन रोजचे फोटो काढू लागलो.
(सुरुवातीला काढलेले फोटो)
( सुरुवातीला काढलेले सूर्योदयाचे फोटो) त्यातच मधले काही दिवस ढगाळ वातावरण असल्याने सूर्योदयाच्या वेळी होणारे प्रकाशाचे खेळ टिपता आले.
(बॉटल्सचे फोटो) गावातील एका मित्राने मिनरल वॉटर चा कारखाना सुरु केलाय त्याला काही दिवसांपूर्वी त्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे फोटो फ्लेक्स डिझायनरला हवे तसे काढून दिलेले. त्याचे डिझाईन आल्यावर बाटल्यांची पारदर्शकता मनासारखी नसल्याने थोडे यूट्यूबच्या मदतीने 'रिऍलिस्टिक' वाटतील असे डिझाईन बनवून दिले. त्या निमित्ताने 'प्रॉडक्ट फोटोग्राफी'चा सराव झाला.
मूळ फोटो :
(मॉन्स्टर ट्रकचे फोटो) त्यात अजून प्रयोग म्हणून मुलाच्या खेळण्यांपैकी दोन मॉन्स्टर ट्रक्स घेऊन त्यांवरही प्रोडक्ट फोटोग्राफीचा सराव केला.
(मित्रांबरोबर काढलेला लाईट पेंटिंग फोटो)खूप दिवसांपासून लाईट पेंटिंग करायचे होते त्यासाठी बाजारातून साहित्य आणले होते त्याचे प्रोटोटाइप तयार करून काही फोटोग्राफर मित्रांबरोबर लाईट पेंटिंगचे प्रयोग करून बघितले. तेही बऱ्यापैकी यशस्वी झाले.
(मित्राने काढलेला लाईट पेंटिंग फोटो) आणखी एक फोटोग्राफर मित्राने फोनवरूनच लाईट पेंटिंगबद्दल माहिती घेतली. त्याच्या अडचणी सुधारल्या आणि त्यालाही छानपैकी लाईट पेंटिंग करता आलं.
(दिव्यांचे फोटो)माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला मान देऊन लावलेल्या दिव्यांचेही दोन तीन फोटो काढलेले.
अश्या तऱ्हेने लॉकडाऊनचे उनाड दिवस काही प्रमाणात सत्कारणी लावतोय. जसे जमेल तसे आणखी प्रयोग करीनच आणि नीट जमुन आल्यास त्याचेही फोटो एखाद्या नवीन धाग्यावर टाकेन.
मूळ फोटो :
(मॉन्स्टर ट्रकचे फोटो) त्यात अजून प्रयोग म्हणून मुलाच्या खेळण्यांपैकी दोन मॉन्स्टर ट्रक्स घेऊन त्यांवरही प्रोडक्ट फोटोग्राफीचा सराव केला.
(मित्रांबरोबर काढलेला लाईट पेंटिंग फोटो)खूप दिवसांपासून लाईट पेंटिंग करायचे होते त्यासाठी बाजारातून साहित्य आणले होते त्याचे प्रोटोटाइप तयार करून काही फोटोग्राफर मित्रांबरोबर लाईट पेंटिंगचे प्रयोग करून बघितले. तेही बऱ्यापैकी यशस्वी झाले.
अश्या तऱ्हेने लॉकडाऊनचे उनाड दिवस काही प्रमाणात सत्कारणी लावतोय. जसे जमेल तसे आणखी प्रयोग करीनच आणि नीट जमुन आल्यास त्याचेही फोटो एखाद्या नवीन धाग्यावर टाकेन.
वाचने
22661
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वाह असे फोटो
नक्कीच
In reply to अरे वाह असे फोटो by चौकस२१२
जमेल की
In reply to अरे वाह असे फोटो by चौकस२१२
सुंदर फोटो
वाह... भारी फोटो आहेत.
निसर्गाची कमाल
In reply to वाह... भारी फोटो आहेत. by सतिश गावडे
सर्वच फोटो आवडले. कसे काढले
लाईट पेंटिंग
In reply to सर्वच फोटो आवडले. कसे काढले by कंजूस
फोटो छान आलेत
धन्स
In reply to फोटो छान आलेत by संजय क्षीरसागर
सुंदर फोटो
वाह, सुपरभारी फोटोज !
धन्यवाद
In reply to वाह, सुपरभारी फोटोज ! by चौथा कोनाडा
फोटो सुंदर आहेत,
नक्की
In reply to फोटो सुंदर आहेत, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पाण्याच्या बाटलीचे फोटो खुपच
या धाग्याच्या मदतीने
In reply to पाण्याच्या बाटलीचे फोटो खुपच by अर्जुन
फोटो आवडले.
धन्यवाद
In reply to फोटो आवडले. by प्रचेतस
सुरेख वर्णन!
धन्यवाद
In reply to सुरेख वर्णन! by Nitin Palkar
सगळेच फोटो सुंदर आहेत रे!
नक्की
In reply to सगळेच फोटो सुंदर आहेत रे! by केडी
फोटो सुंदर
In reply to सगळेच फोटो सुंदर आहेत रे! by केडी
खुप छान आहेत फोटो खास करुन
मॅन्युअल किंवा प्रो मोड असेल तर
In reply to खुप छान आहेत फोटो खास करुन by आंबट चिंच
असे एकेकाला धन्यवाद
मस्तच
छान फोटो
फोटोग्राफीची कमाल!
Intelligent photo !
लइच इरसाल कार्टं
वेळ खूप सत्कारणी
मस्त
मोन्स्टर ट्रक फोटोमध्ये
सगळेच फोटो अप्रतिम आहेत.अजून
सुंदर फोटो !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aithey Aa... :- Bharatजाम भारी फोटोज!!!
सुंदर फोटो
धन्यवाद
In reply to सुंदर फोटो by MipaPremiYogesh
क्या बात है.
वा जबरदस्त
छान फोटो
सुंदर फोटो आहेत सगळे आवडले..
बिनधास्त
In reply to सुंदर फोटो आहेत सगळे आवडले.. by गणेशा