Skip to main content

[शशक' २०२०] - आधुनिक 'सीता'

लेखक Cuty यांनी बुधवार, 15/04/2020 16:10 या दिवशी प्रकाशित केले.

आधुनिक 'सीता'




नोकरी गेल्याने बायकोमुलांसोबत महिनाभर गावीच होता. कालच लेटर आलं. नवी नोकरी आडगावी, सोयसुविधांची वानवा! एकट्या माणसाची खायचीप्यायचीही आबाळ! 'पंधरा वर्षे! मुरलेला संसार! दोन गोंडस फुलं आणि चांगला कमावता नवरा! काय कमी पडलं हिला? पण सांगायचं कोणाला? तोंड दाबून बुक्क्यांचा मार!', तो विचारात गढलेला. 'पंधरा वर्षे! मेलेला संसार! दोन कोमेजलेली फुलं आणि बाहेरख्याली नवरा! काय कमी केलं आपण? पण सांगायचं कोणाला? तोंड दाबून बुक्क्यांचा मार!', तिने निश्वास सोडला. सकाळीच तिने निर्णय दिलेला. 'मुलांची शाळा, दवाखान्याची सोय होईल. सासूसासर्यांकडे लक्ष देता येईल. शेतीवाडी, दुकानात मदत होईल. मी गावीच राहणार!' घरात सर्वजण खूष! तिला उमगले होते, 'सीता ज्याच्यासोबत वनवासात गेली, तो 'राम' होता!'


वाचने 8107
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

+१ सं - दी - प

आवडेश. (प्लसवन नंतरच्या राऊंडला लिहीन. सध्या पोच) -दिलीप बिरुटे

+1

+१

+१

+1

+१

कथा कळली नाही . नायक नोकरी नाही म्हणुन गावी येतो राहतो आणि नविन नोकरी स्वीकारत नाही कारण ती आडगावात असते अशी सुरवात. आणि ती लगेच घरीच राहाण्याच्या प्रयत्न करते. ही काय टोटल लागत नाही.

+१

मस्त

+1

+१

+१

कथा ठीक, पण शेवटचं वाक्य एकदम उच्च कोटीचं!

+१

+१ आवडली!

+१

+1