Skip to main content

[शशक' २०२०] - सूड

लेखक तेजस आठवले यांनी मंगळवार, 14/04/2020 17:12 या दिवशी प्रकाशित केले.

सूड




त्याचे असंख्य नातेवाईक त्याच्या डोळ्यासमोरच मारले गेले होते. मृतदेह जळतानाचा तो विचित्र वास स्मृतीत साठून राहिला होता. त्या आठवणींनी त्याला भडभडून आलं. सूडाच्या उद्देशानं तो पेटून उठला होता. पण त्याचा एकही प्रयत्न यशस्वी ठरत नव्हता.शत्रूकडे त्याच्या सगळ्या हल्ल्यांना परतवून लावण्याची ताकद होती. आजचा दिवस काही निराळाच उजाडला. त्याची एका नव्या खेळाडूशी ओळख झाली. माणसं मारण्यात हा नवखा भिडू तरबेज होता. शांतपणे, कुठल्याही हालचालींशिवाय तासनतास सावजाची वाट पाहण्याचा संयम त्याच्याकडे होता. दोघांनी हातमिळवणी केली. ह्या जोडीनं थंड डोक्याने शत्रूला गारद करायला सुरवात केली. दणादण मुडदे पडू लागले. कोणाला पुसटशीही शंका अजून आलेली नव्हती. करोना विषाणू आता डासांमार्फत पसरायला लागला होता.


वाचने 8042
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

+१ हे कथाबीज डोक्यात होतं. आम्ही पेरायच्या आत तुम्ही उगवून मोकळे. पण लिहिलंय भारी, शेवटच्या बॉलवर सिक्सर! सं - दी - प

वाटली. फार धक्कादायक शेवट वगैरेही वाटला नाही. दोष तुमच्या लेखणीत नसून आमच्या अति कॉरोना अवेअर्नेसचा आहे.

+१

+१

+१ वा! मस्त! शेवटचा धक्का एकदम जबरी!!

पण हे कथेपुरते ठीक आहे ओरिजिनल असलं काही झालं तर जगाचे वाईट हाल होतील.

+१

+१

+१

+1

+१ जरि ...मृतदेह जळतानाचा तो विचित्र वास स्मृतीत साठून राहिला होता..याचा सन्दर्भ लागला नाहि तरिहि.

+१

मला आधी वाटलं कॉरोना ला नाव भिडू मच्छर मिळाला. संदिपदादांची प्रतिक्रिया वाचून कळलं, उलट आहे. मच्छर ला नवा भिडू कोरोना मिळाला.

+१

+१ आवडली.. खरोखर असं घडलं असत तर आत्तापर्यंत जगातले निम्मे लोक गेले असते.

+1