मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शशक' २०२०] - कजाग

बिपीन सुरेश सांगळे · · स्पर्धा

कजाग




मी निवांत बसलो होतो .चंद्या आला .शंकर गेल्याचं सांगायला. शंकर आमचा जवळचा मित्र. निर्व्यसनी माणूस. आमच्यासारखं नव्हतं ! अन असा माणूस एकाएकी गेला होता. खूप वाईट वाटलं . आम्ही त्याच्या घरी पोचलो. लोक जमले होते. रडणाऱ्या बायका. त्यात त्याचीही बायको . नंतर आम्ही बाहेर जाऊन शांतपणे बसलो. लोकांची बडबड आणि गडबड पहात! थोड्या वेळाने सारं पार पडलं. आता निघायचं - आणि त्याच्या बायकोने आकांत मांडला. ते पाहवत नव्हतं. “बघ, कशी रडते साली ! आयुष्यभर नवऱ्याला रडवलं आणि आता स्वतः रडतेय . कजाग बाई ! “ चंद्या म्हणाला. मी मान डोलवली . बायका असंच करतात. अहो खरंच ! मी गेलो होतो - तेव्हा माझीही बायको अशीच रडली होती. पार माझ्या अंगावर पडून !


वाचने 8814 वाचनखूण प्रतिक्रिया 22