Skip to main content

((देवानं विडंबकांना असं का बनवलं?))

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 29/03/2009 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
(मूळ प्रेरणा : मिपा वरील समस्त विडंबने) देवानं विडंबकांना असं का बनवलं? दिसली कविता की तिला झोडावं सगळ्याच विडंबनायोग्य वाटतात पण मिपाकरांना उठसूट वेठीला का धरावं? कधी गळे दाबावे, कधी छाताडावर नाचावे प्रत्येक विडंबन का इतके अवगुणी? दळभद्री मेली प्रतिभा, एकीवर बसत नाही दर पाच धाग्यांनंतर यांचीच तुणतुणी! कुणी हसून प्रतिक्रिया देतं कुणी नाइलाजानं कौतुक करतं कुणी शालजोडीतले हाणत असते पण "जनाची ना मनाची' तरी यांना कुठे असते? कुणी "लिहू नका' सुचवू पाहतं क्वचित कुणी थेट हल्ला करतं किती प्रकारे त्रास दिला, तरी विडंबनाच्या व्यसनात मन फसतं सगळ्याच कविता विडंबनयोग्य असतात? "नको नको' म्हणूनही विडंबने का होतात? कोणाकोणाचे हात धरावेत? "दुर्गुणा'लाही अलीकडे "प्रतिभा' म्हणतात! (टीप : प्रस्तुत (कथित) कवितेतील मते, टिप्पण्या, टोले काल्पनिक नसून, त्यांचा वास्तवाशी संबंध आढळल्यास तो योगायोग अजिबात समजू नये!) (आणखी एक टीप : वरील (कथित) कवितेत मात्रा, यमक, रचना, गेयता, अलंकार वगैरे काव्यशास्त्राचे नियम धाब्यावर बसविण्यात आले असून, ते शिकवू पाहणार्‍यांचे ज्ञानही आम्ही धाब्यावर बसवतो!)
लेखनविषय:

वाचने 1633
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

काही मनातल्या लाईन्स .. झकास .. लैच आवडल्या कुणी हसून प्रतिक्रिया देतं कुणी नाइलाजानं कौतुक करतं कुणी शालजोडीतले हाणत असते =)) =)) बेष्ट आपला टारझन

सर्क्युलर रेफरन्स असलेले विडंबन वाचायाला मजा आली. अभिज्ञ.

अभिजित दा... लै भारी... मस्तं जमलंय! -अनामिक