लॉकडाऊन : सोळावा दिवस
गोडी अपूर्णतेची
प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करुन सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येस परतले. भरताने स्वागताची सगळी तयारी केली होती.राजप्रासादाच्या मार्गावर दुतर्फा असणाऱ्या सुंदर आणि रेखीव वास्तूंच्या गवाक्षात,सौधात नगरजनांनी पुष्पवृष्टी करण्यासाठी गर्दी केली होती. दुंदुभीच्या साथीने रामाचा जयघोष आसमंतात दुमदुमून गेला होता. राजप्रासादात रामाचं भावपूर्ण स्वागत झालं. माता कौसल्या,कैकेयी भेटही झाली. वसिष्ठऋषींच्या मार्गदर्शनाखाली ऋत्विज, ब्रह्मगण, राज्याभिषेकाच्या सिद्धतेत व्यग्र झाले. युवराज्ञी सीता स्वतः जातीने राज्याभिषेकाच्या तयारीत लक्ष घालुन होत्या. न जाणो कोणती कमतरता राहू नये म्हणुन दक्ष होत्या..आणि तो मंगल दिवस उजाडला...
सभामंडपात सर्व निमंत्रितांना रामानं वंदन केलं. वसिष्ठ ऋषींनी रामाला आणि सीतेला रत्नमय सिंहासनावर यथाविधी आसनस्थ केलं. अभिषेकानंतर रत्नखचित मुकुट रामाच्या मस्तकावर विराजमान झाला. शत्रुघ्नानं शुभछत्र धरलं आणि त्रिवार जयजयकार झाला. अयोध्याकुमार राम आता राजा झाला होता.. मात्र सीतेच्या मनात एक हुरहुर दाटुन आली होती. ज्या दिवसाची इतक्या आतुरतेने वाट पाहत होते, ज्याच्या तयारीसाठी दिवसरात्र एक केले होते..तोच विचार..तोच ध्यास..तेच लक्ष्य. .तो दिवस आला आणि गेला देखील..आता पुढे काय..रितेपण..
सिद्धीस कार्य जाता येते सुखास जडता।
जडतेत चेतनेला उरतो न कोणी त्राता।
म्हणुनच की काय वयाच्या अवघ्या एकवीसाव्या वर्षीच ज्ञानेश्वरांनी संजीवनसमाधी घेतली. पण हे झाले लौकिकापलिकडचे. आपल्यालाही हा अनुभव येतोच. आपण तेव्हा काय करावं या विचारात असतानाच टी.व्ही. वर एक जाहिरातीत पाहिली. त्यात अक्षयकुमार सांगतो तसं...तुम्ही थांबू नका..कणीक मळता आलीय ना,पोळी लाटुन बघा..नकाशे बनताहेत,बनु द्या, गोल पण होतील..वरणभात जमलंय ना..पुलाव करुन बघा, आईच्या रेसिपीला तुमच्या स्टाईलने बनवा. तेल गरम आहे ना..भजी बनवा..पण थांबू नका. बस् तेच करायचं.
आज लाॅकडाउनमुळे कित्येक कुंचले रंगात बुडाले, लेखण्या सरसावल्या, वाद्यांवरची धूळ झटकली गेली, अडगळीतली पुस्तके बाहेर आली, सुगरणींची कल्पकता वाढली. काही दिवसांनी हा लाॅकडाउन उठेल तेव्हा फक्त एक करायचं, हे सगळं परत गुंडाळुन ठेवायचं नाही. गरुडासारखी उंच भरारी घेता येत नसेल तर हरकत नाही, म्हातारीचं पीस बनुन उडू या. आनंद उडण्यात आहे. कुणी सांगावं एक दिवस गरुडभरारी पण घेता येईल. फक्त थांबायचं नाही.
पेर्ते राहुन कर्ते बनु या,
क्षणस्थ राहुन मार्गस्थ होऊ या,
शुभास्ते पंथानः संतु ।
-दिपाली ठाकूर
याद्या
11436
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
उत्कृष्ट लेख. एक वेगळा विचार
आवडला...
तुम्ही थांबू नका..+१मस्त लिहिलंय.
नंतरही लिहा काही. थांबू नका.
या लाॅकडाऊन मुळे ९ वर्षांनी
पहिला लेख वाचला, ९ वर्षांनी
In reply to या लाॅकडाऊन मुळे ९ वर्षांनी by शाम भागवत
उत्तम लेख
छान !
क्या बात है.
आजच माझ्याकडे एक व्हिडीओ आला
In reply to क्या बात है. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कठीण आहे.
In reply to आजच माझ्याकडे एक व्हिडीओ आला by सुबोध खरे
मात्र सीतेच्या मनात एक हुरहुर
सुरेख लेख, सीतेच्या
सीतेवरुन सीताफळ आठवले !
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Dil De Diya Hai... :- Cover by Sampreet Dutta [ Masti ]मदनबाण,+१
In reply to सीतेवरुन सीताफळ आठवले ! by मदनबाण
+१
अतिशय सुरेख लिहिलंय.
है रात अन्धेरी पर दिया जलाना कब मना है ......
चौरा साहेब
In reply to है रात अन्धेरी पर दिया जलाना कब मना है ...... by चौकटराजा
खरंय.
गोडी अपूर्णतेची
भारी विचार
लेख आवडला.