मनी वॉलेट आणि add money to wallet

कंजूस's picture
कंजूस in काथ्याकूट
1 Apr 2020 - 10:47 am
गाभा: 

Mobiqwik, paytm वगैरे वॉलेट सेफ आहेत का?
------
मोबाइल/डिटीएच वगैरे रिचार्ज त्यांच्या app मधून करायला गेल्यास नेट बँकिंग पर्याय निवडल्यास ते फक्त आपल्याला हव्या असलेल्या बँकेची साइटला डिरेक्ट करतात. आपला नेट बँकेशी जोडलेला फोन नंबर विचारत नाहीत. ही चांगली गोष्ट आहे. पुढे साइटवरून आपण लॉगिन करून पेमेंट confirm करतो.

---------
Mobiqwik, paytm वगैरे वॉलेट मध्ये मात्र Add Money करायला गेल्यास मात्र ते नेटबँकिंग साईटला रिडिरेक्ट न करता आपला कनेक्टेड फोन नंबर द्या म्हणतात. तो मिळवून वॉलेट app वाले काम करणार. असे का? काही धोका?

--------
असं ऐकलं/वाचलं की मोबाइलवरून पेमेंट करायचे असल्यास वॉलेट वापरावे आणि त्यात थोडे पैसे ठेवावेत. काही गडबड/ hacking झाल्यास तेवढेच पैसे उडतील. नेट बँकिंगचे अकाउंट सेफ राहील. दुसरी एक खबरदारी म्हणजे थोडी गैरसोय झाली तरी अकाउंटशी कनेक्टेड रेजिस्टर्ड फोन नंबरचे सिम कार्ड त्याच स्मार्टफोनात ठेवू नये. म्हणजे पेमेंटसाठी येणारा ओटीपी दुसऱ्या फोनात येतो तो hackers ना कॉपी करता येत नाही/ ढापता येत नाही. पण वॉलेटवाले तो नंबर मिळाल्याशिवाय add money करू देत नाही. काही दुसरा मार्ग?

रेल्वेचे UTS app वापरण्यासाठी एटिएम कार्ड डिटेल्स/किंवा UPI प्रकारचे गूगल पे वगैरे active ठेवावे लागते. फोनातलाच नंबर वापरून ओटिपी वापरावा लागतो.
तुमचा अनुभव/सल्ला काय?

प्रतिक्रिया

मी गूगल पे वापरते. आतापर्यंत तरी काही विपरीत अनुभव नाही.
पण बॅंकेने ECS charges या नावाखाली हजारभर रुपये कापले. मीही याला पर्याय शोधते आहे.

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2020 - 11:19 am | चौथा कोनाडा

गुगल-पे हे युपीआय अ‍ॅप आल्यापासुन पेटीएम वापरणे बंद केले आहे. आता लवकरच माझे पेटीएम खाते अ-कार्यन्वित होईल.

गुगल-पे मित्रांना पैसे देण्यासाठी, सर्व प्रकारचे रि चार्ज, बील पेमेंट साठी वापरतो, अजुन कोणताही वाईट अनुभव आलेला नाहीय.

Nitin Palkar's picture

1 Apr 2020 - 12:49 pm | Nitin Palkar

भीम युपीआय येण्यापूर्वी पेटीएम वापरत होतो, पेटीएम अद्याप काढून टाकले नाही पण क्वचितच वापरतो. भीम अँप हे National Payments Corporation of India (NPCI) ने लॉन्च केले आहे, जी भारतीय रिझर्व बँकेची अंगीकृत कंपनी आहे. यामुळे यात जोखीम कमी असे वाटते. या बरोबरच एका राष्ट्रीय बँकेचे व एका सहकारी बँकेचे अँप देखील वापरतो. वापरताना योग्य ती काळजी घेत असल्याने अद्याप तरी कोणताही गैर प्रकार घडलेला नाही. ही चारही अँप एकाच मोबाईल (हँडसेट) मध्ये असून त्यामुळे कोणतीही अडचण येत नाही.

चौथा कोनाडा's picture

2 Apr 2020 - 9:01 pm | चौथा कोनाडा

मी देखिल गुगल-पे पुर्वी भिम हे अ‍ॅप वापरले आहे. चांगले अ‍ॅप आहे.

पेटीएम वापरताना मला कोणताही वाईट अनुभव आला नाहीय.

Bhim किंवा गूगल पे हे युपिआई इंटरफेस पेमेंट करतेवेळी आपल्या नेट बँकिंगचे लॉगिन करूनच पैसे ट्रान्सफर करवतात.

चौथा कोनाडा's picture

2 Apr 2020 - 9:06 pm | चौथा कोनाडा

अगदी सहमत. पण फसवाफसवीचे प्रकार लिंक पाठवून वै होतात असे वाचण्यात आहे.
किंवा कुठला तरी क्युआर कोड स्कॅन करायला लावून खात्यतले पैसे काढून घेतले जातात.

गुगल-पे वापरताना मला आजपर्यंत असा कोणताही अनुभव आला नाहीय.
बँकेचा वेगळा ४ / ६ अंकी पिन कोड असतोच.
कुणा मिपाकराला आला आहे का ?
लोक प्रचंड प्रमाणात गुगल-पे (युपीआय अ‍ॅप) निर्धास्तपणे वापरतात असे पाहण्यात आहे.

संजय क्षीरसागर's picture

3 Apr 2020 - 11:14 am | संजय क्षीरसागर

बरोब्बर !

कंजूस's picture

3 Apr 2020 - 7:55 pm | कंजूस

मला या वॉलेट्सच्या add money to wallet या बाबतचा प्रश्न पडलाय तो सांगण्याचा लेखाचा खटाटोप आहे. App वाले नेट बँकिंगचे पेज उघडून देता अकाउंटशी कनेक्टेड फोन नं द्या म्हणतात. तो देण्याची माझी इच्छा नाही. मी मुद्दामहून वेगळाच नंबर दिल्यावर मेसेज आला की " there is no account connected with this number."

या पद्धतीत काय धोके होऊ शकतात?

जिओमनी मर्चंट ( जिओमनी'चे नवीन नाव) या app मध्येही हाच अनुभव आला. नेट बँकिंग अकाउंटला रेजिस्टर्ड केलेला नंबर हवा आहे.

रविकिरण फडके's picture

2 Apr 2020 - 9:39 pm | रविकिरण फडके

आत्ता जे काही सुरु आहे (कोविद-१९) ते पाहाता, शक्यतो सर्व प्रकारच्या चिनी बनावटीच्या आणि चिनी मालकीच्या उत्पादनांवर आपण संपूर्ण बहिष्कार टाकला पाहिजे. चीन सरकारने जी बेपर्वाई - आणि हा फारच सौम्य शब्द मी वापरतोय - ह्या बाबतीत दाखवली आहे त्याबद्दल खरं तर त्यांना आंतरराष्ट्रीय कोर्टात जबरदस्त शिक्षा झाली पाहिजे पण ती होईल अशी शक्यता धूसर दिसते आहे. जगाचं जाऊ द्या, आपल्यालाही प्रचंड फटका बसला आणि बसणार आहे. सामान्य नागरिक म्हणून आपण किमान एवढं तरी करू शकतो का?

म्हणून, पेटीएम कुणाची हा प्रश्न; अलीबाबा ह्या चिनी कंपनीची का?

रविकिरण फडके's picture

2 Apr 2020 - 9:39 pm | रविकिरण फडके

आत्ता जे काही सुरु आहे (कोविद-१९) ते पाहाता, शक्यतो सर्व प्रकारच्या चिनी बनावटीच्या आणि चिनी मालकीच्या उत्पादनांवर आपण संपूर्ण बहिष्कार टाकला पाहिजे. चीन सरकारने जी बेपर्वाई - आणि हा फारच सौम्य शब्द मी वापरतोय - ह्या बाबतीत दाखवली आहे त्याबद्दल खरं तर त्यांना आंतरराष्ट्रीय कोर्टात जबरदस्त शिक्षा झाली पाहिजे पण ती होईल अशी शक्यता धूसर दिसते आहे. जगाचं जाऊ द्या, आपल्यालाही प्रचंड फटका बसला आणि बसणार आहे. सामान्य नागरिक म्हणून आपण किमान एवढं तरी करू शकतो का?

म्हणून, पेटीएम कुणाची हा प्रश्न; अलीबाबा ह्या चिनी कंपनीची का?

आवडाबाई's picture

3 Apr 2020 - 7:00 pm | आवडाबाई

पेटीएम वापरत होते, उबर मधे लागत होते म्हणून, कोणताही वाईट अनुभव नाही
पण आता
१. के वाय सी चा प्रश्न काढला आहे त्यानी (ते ऑनलाईन करता येत नाही)
२. साईटवरून लॉगिन करता येत नाहिये, app वापरा म्हणे (प्रत्येक गोष्टीचे app फोन मधे ठेवणे अशक्य आहे).
त्यातील उर्वरित रक्कम कशी परत मिळवावी ते शोधावे लागणार.

इथून पुढे जय भिम

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2020 - 12:51 pm | चौथा कोनाडा

जवळ्च्या कुठल्याही पेटीएमच्या अधिकृत केंद्रावर अंगठा उठवून, आधार युआयडी पडताळणी करून केवायसी प्रक्रिया पुर्ण करता येते.
बर्‍याच मोबाईल दुकानात हे केंद्र असते, मी ही असेच केवायसी पुर्ण करून वॅलेट मधले पैसे पुर्ण वापरून टाकले. तुम्हीही असे करू शकता.
आता गुगल-पे वापरतोय. पेटीएमची गरजच नाही.
(सध्या पेटीएमचा मेसेज येतोय, पुनः पेरियडिक केवायसी करा, नाही तर १० दिवसात खाते बंद होईल)

साईटवरून लॉगिन करता येत नाहिये,

- साईटवरून लॉगिन करतो पण लॉगाउट करण्याचा खटाटोप वाया जातो. होतच नाही. शेवटी ब्राउजरच्या सेटिंग्ज मध्ये history >>delete cookies √ >> करून घालवले.