दि. १८ मार्च २०२० : पंतप्रधान मोदींनी रविवार २१ मार्च या दिवशी जनता कर्फ्यु चं आवाहन केलं आणि तेव्हाच भविष्यात हे असे कर्फ्यु किंवा लॉक डाऊन होतील अशी खात्रीच पटली.
२४ मार्च २०२० : वेळ संध्याकाळी ८ वाजता : मोदींनी लॉक डाऊन ची घोषणा केली आणि सोसायटीच्या व्हाट्सअप्प ग्रुपमध्ये खळबळ उडाली. तातडीने सेक्रेटरीनी एक मिटींग बोलावली आणि येणाऱ्या लॉक डाऊनच्या दिवसात आपण सोसायटी, त्यातील लोकं आणि सोसायटीत काम करणारे ह्यांची कशी काळजी घ्यायची त्याचा प्लॅन ठरवला गेला. मी सोसायटीमध्ये कोणत्याही घटनात्मक पदावर नसलो तरी लॉजिकल सूचना सर्वजण पाळतात असा अनुभव आहे..
मी पुढाकार घेऊन पुढील बाबी ठरवल्या..
१. सोसायटीतल्या जेष्ठ नागरिक ज्यांची मुलं दूरदेशी/ दुसऱ्या गावात राहतात त्यांची यादी आणि त्यांना लागणारी औषधे वगैरेची यादी करण्यात आली.
२. सोसायटीतल्या तरुण किंवा बाहेर जाऊ शकणाऱ्या लोकांना ते राहत असलेल्या मजल्यांवर राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांची जबाबदारी देण्यात आली.
३ सोसायटीतल्या बायकांचा अजून एक ग्रुप करण्यात आला आणि सोसायटीत राहणाऱ्या आणि मूळ गांवी घरी जाऊ न शकणाऱ्या लोकांकरता जेवण बनवणं आणि ते त्यांना पोहोचवणं ह्याचं प्लॅनिंग झालं.
४. रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांमध्ये पाणी आणि डेटॉल चं मिश्रण करून ते सोसायटीच्या वॉचमनला देण्यात आलं आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर स्प्रे मारायला सांगितला. जेणेकरून सोसायटीत येणाऱ्या प्रत्येकाचे हात तरी स्वच्छ होतील.
५. सोसायटी जवळच्या किराणामालाच्या दुकानाशी बोलून ऑर्डर आणि डिलिव्हरी पॅटर्न ठरवला.
६. घरीही डेटॉल आणि पाण्याचे मिश्रण करून ठेवले आहे आणि चुकून कोणीही घरातून बाहेर पडले किंवा बाहेरचे घरी येत असेल तर त्याने कंपल्सरी हात व पाय त्या पाण्याने साफ करूनच यायचे असा नियम बनवला आहे.
आज १ एप्रिल २०२०, लॉक डाऊनचा आठवा दिवस.. सर्व काही सुरळीत चालू आहे. संभाव्य गोष्टींची आधीच काळजी घेतल्यामुळे धावपळ करावी लागत नाहीये. कुठल्याही गोष्टीचं shortage झालेलं नाही.
आत्ताचे दिवस भविष्याचा कुठलाही जास्त विचार न करता घालवायचे आहेत, पुढचे जे कठीण दिवस येतील ते पण निघून जातील असा विश्वास आहे.
घरात मुलांबरोबर पत्ते खेळणं, चित्रपट बघणे त्यांच्याबरोबर काहींना काही ऍक्टिव्हिटी चालू आहेत. जवळपास ४५% टक्के जग बंद असल्याने ऑफीसचं काम कमी होत चाललं आहे. मला लाकूडकाम करायला खूप आवडते त्यामुळे त्याच्या जमेल तशा वस्तू बनवणे सुरू आहेच..!!
घरी बनवलेला टेबललँप.
आणखी एका अँगलने..
महाराष्ट्र मंडळ बेंगलोरच्या एका कार्यक्रमासाठी बनवलेली पालखी..
*************************************************
लॉकडाऊन मधले किस्से..
मी पुढाकार घेऊन सोसायटी मध्ये सुरू केलेल्या गोष्टी आणि त्याच्या सर्वांना दिलेल्या सुस्पष्ट सूचना यांमुळे सिक्युरिटीवाले लोक्स भलतेच इम्प्रेस झाले.. एकाने न राहवून मला विचारले.. "सर आप आर्मी में हो क्या..?"
असेच आणखी एकदा एका भोचक काकांनी "मी नक्की काय करतो..?" असे विचारले होते.. त्यांना "मी पोस्ट्मन आहे" असे सांगितल्यावर आजही ते "अरेरे हा कसा काय आपल्या सोसायटीत राहतो" अशा दयार्द्र नजरेने माझ्याकडे बघत असतात...
करोनाची भीषणता वाढण्यापूर्वी.. लॉकडाऊन वगैरे स्वप्नातही नव्हते तेंव्हा एकदा माझा मुलगा त्याच्या मित्रांसोबत सोसायटीमध्ये खेळत होता. त्या दंग्याचा एकाला त्रास झाला असावा.. त्याने मुलांना रागावून सांगितले की "इथे खेळू नका, मला करोना झाला आहे" मुले घाबरली आणि आपआपल्या घरी पळाली. माझ्या मुलाने घरी येऊन सांगितल्यावर मी त्याला भेटायला गेलो व म्हणालो.. "आपको करोना हुआ है तो चलो हॉस्पिटल चलते है... जाते जाते पोलिस स्टेशन रूकते है..!" मग तो इमाने इतबारे सॉरी म्हणाला.
**********************************************
तुम्ही तुमच्या घरी / सोसायटी मध्ये काय काय उपाययोजना केल्या आहेत आणि काय काळजी घेतली याची माहिती येऊद्या..!!
धन्यवाद - प्रसाद दाते.
वाचने
15783
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा !
आमच्याही सोसायटीत कोरोनाशी
सुरेख नियोजन!
सुरेख नियोजन!
टेबल लँप दिसत आहे. दुसरे दोन
आता हे फोटो दिसत आहेत का ते
In reply to टेबल लँप दिसत आहे. दुसरे दोन by कंजूस
हो, दिसत आहेत फोटो.
In reply to आता हे फोटो दिसत आहेत का ते by मोदक
रचना ( डिझाईन )
लेसर कटिंग
In reply to रचना ( डिझाईन ) by चौकस२१२
रचना ( डिझाईन )
In reply to रचना ( डिझाईन ) by चौकस२१२
३डी कॅड
In reply to रचना ( डिझाईन ) by दाते प्रसाद
वापरून बघतो
In reply to ३डी कॅड by चौकस२१२
टेबललॅम्प सुंदर
आज १ एप्रिल.
कंजुसकाका.
In reply to आज १ एप्रिल. by कंजूस
फोटो पाहून जळजळ झाली आहे.
In reply to आज १ एप्रिल. by कंजूस
थोडंसं ऑफिसचं काम केलं आणि
तु बॅटमॅन चा पंखा
In reply to थोडंसं ऑफिसचं काम केलं आणि by प्रचेतस
व्हय जी. डिसीचा पंखा.
In reply to तु बॅटमॅन चा पंखा by प्रशांत
कंकाका आज वाल, पावटा आणी कारल्याच्या दोन दोन
वाह !
धन्यवाद
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दंडवत
In reply to धन्यवाद by दाते प्रसाद
सोसायटीतील उपक्रम खूपच छान.
आज
रामायण
कलम १४४
अगदी खरे
किस्से आवडले..