नमस्कार आणि सुसकाळ मिपा मित्र मैत्रिणी सखे सुहृद हो !
बाहेर ऊन आणि कोरोनाविषाणू मी मी, तू तू, तुम्ही तुम्ही म्हणताहेत आणि आत आम्ही आपापल्या वर्तुळात सुखेनैव पण जरासे भेदरलेले , लक्ष्मणरेषा सांभाळत बसलो आहोत.
आज लॉकडाउनचा सातवा दिवस ! आपण म्हणजे जगाचं केंद्र आहोत असं वाटू लागलंय. कारण जगामध्ये घटना इतक्या वेगाने घडताहेत आणि आपण एकाच जागी ठप्प ! अर्थात, वर्क फ्रॉम होम सोबतच बरेच दिवस तुंबलेले होम-वर्कसुद्धा सुरू असल्यामुळे वेळ जात नाही ही बातच नस्से ! काही काही सोप्या पाकृ (उपलब्ध आयटेम्स मध्ये) प्रयोगावून घेतल्या. विशेष म्हणजे टेस्टीही झाल्या. फोटोमधे कलिंगड ज्यूस आणि ब्रेड-पनीर रोल्स जसे दिसले तसे टाकले आहेत. फर्माईश झाली तर पाकृ प्रतिसादात देईन.
अधेमधे चुकून राहिलाच थोडा वेळ मोकळा तर दू.चि. वाणीवरून आणि कायप्पावरून प्रबोधनकार लगेच सरसावून बसले आहेतच.
माननीय मिपाकर मोदक यांच्याशी विनम्रतेने मतभेद व्यक्त करून सांगते. कोरोनाने जगात चालवलेला थयथयाट आणि त्यावर सुचवले जाणारे कायप्पीय तोडगे मी मन लावून पाहते किंवा वाचते. हो, जोपर्यंत कोरोनावर खात्रीशीर इलाज वैद्यकीय धुरंधरांना मिळत नाही, तोपर्यंत यातले सगळे तोडगे, वेळ पडलीच तर, वापरायची आपली तयारी आहे. अगदी मी आजवर कधी चहाची चवही जरी पाहिली नसली तरी दिवसातून चार वेळा गवती चहा आणि चायपत्ती घालून उकळलेला चहा घेण्याची मी मनोमन तयारी करुन ठेवली आहे.
हां नाही म्हणायला मघाशी दूरचित्रवाणी वर दाखवले तसे यूपीतल्या पोलिसांनी मजूर लोकांना सोडियम हायपोक्लोराइटच्या पाण्याच्या फवार्याने धुवून काढले, तितकी मात्र तयारी नाही बॉ !
हे आहेत काही सर्वसंमत प्रतिबंधात्मक तोडगे
१. घरातच रहा, बाहेर अज्जिबात पडू नका.
२. नाईलाजाने पडावेच लागले बाहेर तर मास्क हातमोजे जरुर वापरा.
३. घरी परत आल्यावर शक्यतो बाहेरच साबणाने हात धुवून मग आत या. तोपर्यंत आपल्याला नाक आहे आणि त्याला हात लावता येतो हे विसरून जा.
४. आत आल्यावर बाहेरचे कपडे पर्स पाकिट इ. वस्तू एका बॅगमध्ये घालून ती एका बाजूला उघडीच ठेवा. शक्य असल्यास काही वेळ उन्हात ठेवा. पुन्हा १२ तास त्यांना हात लावू नका. लावलाच तर सॅनिटायझर वापरा.
५. बाहेरुन आणलेल्या वस्तू १२ तास तरी हात न लावता तशाच ठेवा. भाजी वगैरे असेर तर काही वेळ मिठाच्या पाण्यात ठेवा नि मग वापरा.
६. दुधाच्या आणि इतर प्लॅस्टिक पॅकिंग बॅग्ज डेटॉलच्या पाण्याने धुवून घ्या.
औघड वाटतंय हे सगळं ? मग बघा, शत्रू किती बलाढ्य आहे त ! अमेरिका , इटली, यूके, फ्रान्स जर्मनी सगळ्यांची वाट लावलीय त्याने.
आमच्या कोल्हापुरात एक म्हण आहे. तुम्हाला सशाची शिकार करायची असली तरी वाघाच्या शिकारीच्या तयारीने बाहेर पडा !
बोला आता !!

वाचने
14988
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
कलिंगड ज्यूस आणि ब्रेड-पनीर
आम्ही उपवास कचोरी केली पण
केमिस्ट उघडे नाहीत हो. कालच
गृहमंत्र्यांची आवड...
आज ऑफिसचं काम, लॅपटॉप अपग्रेड
ओ भौ
In reply to आज ऑफिसचं काम, लॅपटॉप अपग्रेड by प्रचेतस
ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे?
In reply to ओ भौ by चौकटराजा
८
In reply to ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे? by प्रचेतस
सिस्टम एकदा फुल स्कॅन करा.
In reply to ८ by चौकटराजा
एन पी
In reply to ८ by चौकटराजा
ऊडवल्या तरी
In reply to एन पी by फुटूवाला
NP बरोबर नाही. QH वापरा
In reply to एन पी by फुटूवाला
तुमच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना धडा शिकवा .... ;-)
In reply to ओ भौ by चौकटराजा
धन्यवाद !!
In reply to तुमच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना धडा शिकवा .... ;-) by गामा पैलवान
एन पी
In reply to धन्यवाद !! by चौकटराजा
कलिंगड ज्यूस, ब्रेड-पनीर
काम, करमणूक ,इ....
एका ग्रुपवर गप्पा मारताना
धन्यवाद.
वेतन कपात करण्यात आलेली नसून,
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्यांदा बातमी दिली....
In reply to वेतन कपात करण्यात आलेली नसून, by चौथा कोनाडा
क्वारंटाईन डायरीज
पाकृ हव्या!
कलिंगड ज्यूस
In reply to पाकृ हव्या! by जुइ
धन्यवाद!
In reply to कलिंगड ज्यूस by सस्नेह
छान
आणखिन पाकृ येऊ द्या...