Skip to main content

(खरच आता नको )

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 28/03/2009 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा विशाल कुलकर्णी साहेब. कृपया ह. घ्या. काव्यांचे पसारे खुप झाले कवितांचा खच आता नको ... ! विडंबनाचे रेचक थोडे घेऊया गंभीर कवीतांचे अजीर्ण आता नको ... ! तेच तेच शब्द काव्यांमधे शब्दांची घुसमट आता नको ... ! चला विडंबनकारांनो एक खेळ खेळु गंभीर कवींचा धाक आता नको ... ! हरवले सारे कवीपण माझे ईच्छा कविता लिहिण्याची आता नको ... ! जिथे तिथे सगळीकडे .., ते काव्य हृदयाला छळणारे आता नको ... ! चल दुसर्‍या विभागात जावू मोह काव्य विभागाचा आता नको ... !
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1666
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

लै भारी ! चल दुसर्‍या विभागात जावू मोह काव्य विभागाचा आता नको ... ! आपल्यासाठी तात्याला आता नवीन विभाग करावा लागेल, तडिपार विभाग.... =))

In reply to by दशानन

खरे आहे.. तडीपार किवा विडंबनकारांसाठी नवा विभागच काढावा लागेल बहुदा.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

त्रिवार खरे आहे !!! घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

तुम्ही कविता नको म्हणताय आणि तिकडे कोणीतरी 'कवितेचा आजार' मागतंय. खराटा (रंग माझा वेगळा)