नमस्कार मंडळी...
गेले 5 वर्षे इथला सदस्य आहे, पण ऍक्टिव्ह लिखाण कधी केले नाही...
पण आता सध्या आजूबाजूला चाललेल्या घडामोडी पाहून, आणि आमचा त्यात सहभाग पाहून, हा धागा काढावा, अशी सूचना आली...
गेल्या महिन्यात भारतात कोरोना चा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर जगभरात या विषाणूने जे थैमान घातले, ते पाहता शासन आणि प्रशासनाने वेगवेगळे निर्णय घेत, अखेर देश लॉकडाऊन करण्यापर्यंत परिस्थिती आली आहे...
या काळात मला पोलीस प्रशासनासोबत काही काळ काम करायची संधी मिळाली आहे...
त्या निमित्ताने अनेक तर्हेच्या लोकांशी संबंध येतो आहे...
मनुष्यस्वभाव आणि विचित्रपणा या कडे जरा तिरक्या नजरेने पाहायचा हा प्रयत्न...
पण या सोबतच या धाग्याच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट करूयात...
बऱ्याच लोकांना नवे नवे नियम, बंदी याबाबतीत वेगवेगळ्या समाज माध्यमांतून निरोप येत असतात...
त्याची शहानिशा प्रत्येकाला करणे जमेलच, असे नसते...
त्या शंका, अडचणी इथे मांडा...
त्यांचे यथाशक्ती निरसन करण्याचा प्रयत्न करेन...
उदघाटन म्हणून कालचा एक किस्सा टाकतो...
सकाळी लवकर फुलबाजारासाठी गर्दी झालेली...
सामान्य लोकांनी लोकल लोकांकडून घेणं जास्त प्रीफर केलेलं, पण बंगले वगैरे सजवायची हौस असलेल्या लोकांची गर्दी होती...
फुलवाल्यांना एकमेकांपासून किमान 15 फूट अंतर सोडून बसवलेलं.. त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या पार्किंगच्या जागांवरून भांडणे चालू झाली...
सगळ्या गाडी मालकांना हाकलून लावलं.. बाजारापासून लांब 4-5 किमी लांब गाड्या लावून चालत यायला लावलं... जेणेकरून कंटाळा करून परत येणे टळतील... पण नाही...
त्यातपण नेहमीची हॉटेलं चालू आहेत का, हे पाहत येणारे महाभाग होते...
फुलबाजारात लोकांना रांगा करायला लावल्या, तर आधी माल पाहू, आणि मगच खरेदी करू म्हणणारे सुद्धा सापडले... त्यांना समजावलं, भाऊ मिळतेय ते घे, आणि घरी पळ...
यावर ग्राहकाचे हक्क वगैरे भाषण झोडायला लागले...
त्यांना कलम 144 आणि 3 महिन्याची कैद यावर प्रवचन द्यावं लागलं...
जर सुशिक्षीत लोकांकडूनच असे वर्तन होणार असेल, तर सामान्य लोकांनी काय करायला हवे?
वाचने
10097
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे मी पण observe केले,
चैन आणि जीवनावश्यक यातला फरक
In reply to हे मी पण observe केले, by palambar
ग्राहकाचे हक्क वगैरे...
अगदी
In reply to ग्राहकाचे हक्क वगैरे... by Nitin Palkar
जगण्याचा प्राधान्यक्रम...
काही विचित्र निर्णय ...
केस घरीच कापा. ट्रीमर असल्यास
In reply to काही विचित्र निर्णय ... by चौकस२१२
केस कापणे ..
In reply to केस घरीच कापा. ट्रीमर असल्यास by तेजस आठवले
.
In reply to काही विचित्र निर्णय ... by चौकस२१२
.
रामदेव भक्त
सरकारने बिग बास्केट ,
बोलणी चालू आहेत ..
In reply to सरकारने बिग बास्केट , by उगा काहितरीच
सहमत
In reply to सरकारने बिग बास्केट , by उगा काहितरीच
सहमत
In reply to सरकारने बिग बास्केट , by उगा काहितरीच
.
In reply to सरकारने बिग बास्केट , by उगा काहितरीच
+१००
In reply to सरकारने बिग बास्केट , by उगा काहितरीच
टॉइलेट पेपर्सचे दुर्भीक्ष्य
गोऱ्या लोकांनी किमती नाही
In reply to टॉइलेट पेपर्सचे दुर्भीक्ष्य by सौन्दर्य
या मागील शास्त्र!
(खुप वर्षानी लिहितोय.)